Open the way for reservation of Dhobi community! The state government tossed the ball to the center
अकलूज : माळशिरस पंचायत समितीचे (Malshiras Panchayat Samiti) आरक्षण भूसंपादन उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, तहसीलदार जगदीश निंबाळकर माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, निवासी नायब तहसीलदार श्रीकांत देशमुख आज 22 पंचायत समितीच्या जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली.
त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण चार जागा त्यामध्ये दोन महिला अनुसूचित जमातीसाठी एकही जागा नाही. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण पाच जागा त्यापैकी तीन महिला व सर्वसाधारणसाठी एकूण 13 जागा त्यापैकी सहा महिला अशा पद्धतीने अकरा पुरुष व 11 आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी चार यामध्ये फोंडसिरस महिला संग्राम नगर महिला तांदुळवाडी कोळेगाव तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पाच जागा त्यापैकी तीन जागा महिलांसाठी त्यापैकी मांडवे महिला मेडद महिला पिलीव महिला धर्मपुरी गिरवी तर सर्वसाधारण 13 जागापैकी सहा महिला खंडाळी महिला, माळीनगर महिला, लवंग महिला, बोरगाव महिला, जांबुड महिला, निमगाव महिला, दहिगाव, पिरळे, तिरवंडी, यशवंतनगर, वेळापूर, खडूस, कनेर अशा पद्धतीने आरक्षण सोडत झालेली आहे.
धर्मपुरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष
दहिगाव- सर्वसाधारण पुरूष
पिरळे- सर्वसाधारण पुरूष
फोंडशिरस- अनुसूचित जाती स्त्री
तिरवंडी- सर्वसाधारण पुरूष
संग्रामनगर- अनुसूचित जाती स्त्री
यशवंतनगर- सर्वसाधारण पुरूष
खंडाळी- सर्वसाधारण स्त्री
माळीनगर- सर्वसाधारण स्त्री
लवंग- सर्वसाधारण स्त्री
जांभूड- सर्वसाधारण स्त्री
बोरगाव- सर्वसाधारण स्त्री
वेळापूर- सर्वसाधारण पुरूष
खुडूस- सर्वसाधारण पुरूष
मेडद- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
मांडवे- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
गिरवी- नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष
कन्हेर- सर्वसाधारण पुरूष
निमगाव- सर्वसाधारण स्त्री
तांदुळवाडी- अनुसूचित जाती पुरूष
पिलीव- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
कोळेगाव- अनुसूचित जाती पुरूष