Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Election : प्रभाग 26 मध्ये कमळ फुलणार? ऐश्वर्या थोरात यांच्याकडून जोरदार तयारी

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २६ मधील भारतीय जनता पक्षाच्या चारही अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेली ‘जनसंवाद’ पदयात्रा अत्यंत उत्साहात पार पडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 10, 2026 | 05:21 PM
प्रभाग 26 मध्ये कमळ फुलणार? ऐश्वर्या थोरात यांच्याकडून जोरदार तयारी

प्रभाग 26 मध्ये कमळ फुलणार? ऐश्वर्या थोरात यांच्याकडून जोरदार तयारी

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रभाग 26 मध्ये कमळ फुलणार?
  • ऐश्वर्या थोरात यांच्याकडून जोरदार तयारी
  • ‘जनसंवाद’ पदयात्रा उत्साहात संपन्न
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २६ मधील भारतीय जनता पक्षाच्या चारही अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेली ‘जनसंवाद’ पदयात्रा अत्यंत उत्साहात पार पडली. या पदयात्रेला घोरपडे पेठ, गुरुवार पेठ आणि समताभूमी परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, यामुळे प्रभागातील राजकीय वातावरण जवळपास भाजपमय झाल्याचे दिसून आले.

शिवांजली मंडळ (काची आळी) येथून या पदयात्रेचा प्रारंभ झाला. त्यानंतर ही पदयात्रा फुलवाला चौक, शिवतेज मित्र मंडळ, कृष्णाहट्टी चौक, आणि किराड गल्ली अशा प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. या प्रवासादरम्यान प्रत्येक चौकात स्थानिक गणेश मंडळांनी आणि कार्यकर्त्यांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले. अंगारक संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून उमेदवारांनी विविध मंडळांच्या आरतीला उपस्थित राहून श्रीगणेशाचे आशीर्वाद घेतले.

या पदयात्रेदरम्यान सामाजिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन अभिवादन करण्यात आले. आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे तालीम येथे क्रांतिगुरूंना, तसेच फुले वाड्यात महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. समताभूमी येथे या पदयात्रेचा समारोप झाला.

मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवारांबद्दल बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, “भारतीय जनता पार्टीची शहरातील ताकद वाढली असून प्रभाग २६ मध्ये भाजपचे चारही उमेदवार निवडून येतील. अजय खेडेकर, स्नेहा माळवदे, विष्णू हरिहर आणि युवा उमेदवार ऐश्वर्या थोरात हे सर्वजण भरघोस मतांनी विजयी होतील. घोरपडे पेठ, गुरुवार पेठ आणि समताभूमीतील नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना भाजपने केलेला विकास माहीत आहे. ते नक्कीच आमच्या चारही उमेदवारांचे पाठराखण करतील.”

नागरिकांच्या डोळ्यांतील विश्वास आणि मिळालेले प्रेम हीच आमच्या कार्याची पावती असल्याची भावना उमेदवारांनी यावेळी व्यक्त केली. या पदयात्रेने भाजपचा विजयाचा निर्धार कार्यकर्त्यांनी अधोरेखित केला असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

चारही उमेदवारांना कार्यकर्त्यांचा पाठिंबा

प्रभाग क्रमांक 26 हा पेठांचा भाग असल्यामुळे या भागातील नागरिकांचे प्रश्न कायम आहेत. मागच्या काळात निवडणुका प्रलंबित असल्यामुळे व प्रशासनाचा कारभार असल्यामुळे द्यायला पाहिजे तेवढा वेळ नगरसेवकरांकडून दिला जात नव्हता. त्यांच्याकडे अधिकार नसल्यामुळे प्रश्न जैसे थे उरले. तब्बन नऊ वर्षानंतर ही निवडणूक लागली असल्याने उमेदवारांबरोबरच नागरिकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या थोरात या उच्चशिक्षित उमेदवार असल्यामुळे व तरुण असल्याने कामाची क्षमता व व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांच्या या निर्धाराला कार्यकर्त्यांचाही मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. आजच्या रॅलीतील छायाचित्रांमधून भाजपने आपली घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, समता भूमी या प्रभागातील ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Web Title: Vigorous campaigning is underway by all four bjp candidates in ward no 26 in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Election News
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Panvel News: पनवेलमध्ये स्मशानातील राखेचं गूढ अखेर उकललं; नेमकं काय प्रकरण?
1

Panvel News: पनवेलमध्ये स्मशानातील राखेचं गूढ अखेर उकललं; नेमकं काय प्रकरण?

karjat Panchayat Samiti सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे, तर उप सभापती पदावर चित्रा ठाकरे
2

karjat Panchayat Samiti सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे, तर उप सभापती पदावर चित्रा ठाकरे

Karjat News: कर्जतमध्ये प्रवृत्ती, विकृती विरुद्ध परिवर्तन, सुनील तटकरे यांची माहिती
3

Karjat News: कर्जतमध्ये प्रवृत्ती, विकृती विरुद्ध परिवर्तन, सुनील तटकरे यांची माहिती

Government Scheme: आता महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वक्तव्य
4

Government Scheme: आता महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.