Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Election : राजकीय घडामोडींना वेग; महेश सुतारांच्या भुमिकेमुळे भाजपची ताकद वाढली

महेश सुतार यांनी चंद्रकांत पाटलांच्या निवास्थानी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या ‘जनसंवाद’ पदयात्रेचे जोरदार स्वागत केल्याने सुतारवाडीतील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 10, 2026 | 05:30 PM
राजकीय घडामोडींना वेग; महेश सुतारांच्या भुमिकेमुळे भाजपची ताकद वाढली

राजकीय घडामोडींना वेग; महेश सुतारांच्या भुमिकेमुळे भाजपची ताकद वाढली

Follow Us
Close
Follow Us:
  • राजकीय घडामोडींना वेग
  • महेश सुतार हे नाव पुन्हा चर्चेत
  • महेश सुतारांच्या भुमिकेमुळे भाजपची ताकद वाढली
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला पाहायला मिळाली आहे. गेल्याच आठवड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार महेश सुतार यांनी चंद्रकांत पाटलांच्या निवास्थानी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या ‘जनसंवाद’ पदयात्रेचे जोरदार स्वागत केल्याने सुतारवाडीतील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे. स्वराज्य चौक येथून सुरू झालेल्या या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. पदयात्रेच्या मार्गावर पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या (उबाठा) कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी, जल्लोष आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर राजकीय रंगात रंगून गेला.

यावेळी महेश सुतार यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार रोहिणीताई चिमटे, गणेश कळमकर, मयुरीताई कोकाटे तसेच लहू बालवडकर यांचे भल्या मोठ्या हाराने जाहीर स्वागत केले. यावेळी त्यांनी भाजपच्या पदयात्रेचे केलेल्या जोरदार स्वागताने भाजपच्या प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचे स्पष्ट झाले. महेश सुतार यांच्या या भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक ०९ मधील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

प्रभाग क्रमांक ०९ मधील सुतारवाडी परिसरात महेश सुतार हे नाव पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सुतारवाडीत त्यांची वैयक्तिक राजकीय पकड आणि जनाधार आजही भक्कम असल्याचे अलीकडील घडामोडींमधून स्पष्ट झाले आहे. भाजपच्या ‘जनसंवाद’ पदयात्रेदरम्यान महेश सुतार यांनी पदयात्रेचे केलेले जोरदार स्वागत हे केवळ प्रतीकात्मक नव्हते. या घटनेतून सुतारवाडीत त्यांचा प्रभाव, कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाची क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे पदयात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा त्यांच्या राजकीय ताकदीचा ठळक पुरावा मानला जात आहे.

सुतारवाडीतील अनेक भागांत महेश सुतार यांनी पूर्वी केलेल्या स्थानिक कामांचा आणि थेट जनसंपर्काचा आजही परिणाम दिसून येतो. विशेषतः युवक, स्थानिक व्यावसायिक आणि काही प्रभावी मतदार गटांमध्ये त्यांचा प्रभाव कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभाग क्रमांक ०९ मधील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, महेश सुतार यांची ताकद ही केवळ मतांच्या संख्येपुरती मर्यादित नसून, ती मतांचे ध्रुवीकरण करण्याची क्षमता ठेवणारी आहे. त्यांच्या भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला अतिरिक्त बळ मिळाले आहे.

Web Title: Bjps strength in pune has increased due to mahesh sutars role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Election News
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

खडकी लष्करी तळावर ‘सांझा शक्ती’ संयुक्त सराव; आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाचा यशस्वी प्रयोग
1

खडकी लष्करी तळावर ‘सांझा शक्ती’ संयुक्त सराव; आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाचा यशस्वी प्रयोग

Maharashtra Politics: “‘गोचीडासारखे वागणे त्यांना…”; हर्षवर्धन सपकाळांची ‘त्या’ उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “‘गोचीडासारखे वागणे त्यांना…”; हर्षवर्धन सपकाळांची ‘त्या’ उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल
3

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune News: गप्प बसायचं नाही… आता! हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर आरोप; म्हणाले…
4

Pune News: गप्प बसायचं नाही… आता! हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर आरोप; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.