Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिक्षाचालकांना ड्रेसकोड बंधनकारक; नियमांचं उल्लंघन केल्यास…

खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ॲटोरिक्षा चालकांना आता गणवेश (ड्रेसकोड) बंधनकारक असणार आहे. सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी त्यांना तीन गणवेशाचे पर्याय दिले असून, ३१ जुलैपर्यंत त्यांनी गणवेश शिलाई करून घ्यायचे आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 21, 2024 | 12:38 PM
रिक्षाचालकांना ड्रेसकोड बंधनकारक; नियमांचं उल्लंघन केल्यास…
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ॲटोरिक्षा चालकांना आता गणवेश (ड्रेसकोड) बंधनकारक असणार आहे. सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी त्यांना तीन गणवेशाचे पर्याय दिले असून, ३१ जुलैपर्यंत त्यांनी गणवेश शिलाई करून घ्यायचे आहेत. अन्यथा, त्यांना ५०० ते १५०० रुपयांचा दंड केला जाणार आहे.

महापालिकेचा परिवहन उपक्रम डबघाईला आल्यानंतर शहरात प्रवासी रिक्षांची संख्या प्रचंड वाढली आहे. रिक्षांच्या परमीटवर कोणाचेही निर्बंध नसल्याने दरमहा १०० ते १५० रिक्षा वाढत आहेत. सोलापूरच्या आरटीओ कार्यालयाकडील नोंदीनुसार सोलापूर शहरात सद्य:स्थितीस १२ हजार ६३० ॲटोरिक्षा आहेत. त्यांच्यासाठी मीटर बंधनकारक असून, आठ वर्षांपर्यंतच्या रिक्षांना दोन वर्षाला फिटनेस करून घ्यावा लागतो तर त्यानंतरच्या रिक्षांसाठी दरवर्षी फिटनेस पडताळणी बंधनकारक आहे. मात्र, अनेक जुनाट रिक्षा रस्त्यांवर पाहायला मिळतात. फिटनेस नसलेल्या रिक्षांना चार हजार रुपयांचा दंड आहे.

दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व स्वयंशिस्तीसाठी रिक्षा चालकास गणवेश बंधनकारक आहे. आरटीओ कार्यालयाने रिक्षा चालकांना ‘खाकी’चा पर्याय दिला आहे, पण वाहतूक पोलिसांनी तीन गणवेशांपैकी एकाचा वापर करण्याचा पर्याय दिला आहे. आता ३१ जुलैपर्यंत किती रिक्षाचालक पोलिसांचे आदेश पाळतात, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

पाेलिसांनी ३१ जुलैपर्यंत दिली डेडलाईन

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी गणवेशाचे बंधन आहे. सोलापूर शहरातील रस्त्यांवरून दररोज १५ हजारांहून अधिक ॲटोरिक्षा धावतात, पण त्यातील ६० ते ७० टक्के चालक गणवेशाविनाच असतात. अशा रिक्षा चालकांसाठी शहर वाहतूक पोलिसांनी ३१ जुलैपर्यंत डेडलाईन दिली आहे. त्यानंतर पहिल्यांदा कारवाई करताना संबंधित रिक्षाचालकास ५०० रुपयांचा दंड भरावा लागेल. एकदा दंड होऊनही त्याने ड्रेसकोडचे पालन न केल्यास पुन्हा प्रत्येक वेळी दीड हजार रुपयांचा दंड होणार आहे. त्यामुळे आता रिक्षाचालकांना गणवेश शिलाई करून घ्यावाच लागणार आहे.

अनफिट ॲटोरिक्षा चालकांनी वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र काढून घ्यावे, सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, गणवेश (ड्रेसकोड) वापरावा, यासंबंधीच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. ३१ जुलैपर्यंत सर्वांनीच गणवेशाचा वापर करणे अपेक्षित असून त्यानंतर संबंधित ॲटोरिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. – सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर

असे आहेत गणवेशाचे तीन पर्याय

१) पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट

२) खाकी पॅन्ट, खाकी पॅन्ट

३) खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट

Web Title: Mandatory dress code for rickshaw pullers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 12:38 PM

Topics:  

  • maharashtra
  • Riksha

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.