Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking: मानखुर्द ते वाशी लोकल विस्कळीत ; सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून वाशीला येणारी रेल्वे गेल्या 30 मिनिटांपासून मानखुर्द रेल्वे स्थानकावर थांबली आहे. सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाशीला येणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचं सांगितलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 31, 2024 | 09:06 AM
मानखुर्द ते वाशी लोकल विस्कळीत ; सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने प्रवाशांचे हाल (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)

मानखुर्द ते वाशी लोकल विस्कळीत ; सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने प्रवाशांचे हाल (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)

Follow Us
Follow Us:

लोकल ट्रेन प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हार्बर मार्गावरील मानखुर्द ते वाशी लोकल गेल्या 30 मिनिटांपासून रखडली आहे. सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून वाशीला येणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकावर गेल्या 30 मिनिटांपासून रेल्वे थांबली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

हेदेखील वाचा-हिंगोलीतील तलाठी संतोष पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात आज काम बंद आंदोलन 

मानखुर्द ते वाशी रेल्वेसेवा गेल्या 30 मिनिटांपासून स्थगित आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून वाशीला येणारी रेल्वे गेल्या 30 मिनिटांपासून मानखुर्द रेल्वे स्थानकावर थांबली आहे. वाशीवरून पनवेलच्या दिशेने जाणारी रेल्वे सुरु असली तरी मानखुर्द ते वाशी रेल्वेसेवा काही काळासाठी स्थगित झाली आहे. सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची घाई असते, अशातच रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

हेदेखील वाचा- टेलिग्रामवर पाकिस्तानी दहशतवाद्याचा व्हिडीओ व्हायरल, ट्रेनवर हल्ला करण्याची धमकी; NIAची चिंता वाढली

सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल उशिराने धावत आहे. वाशी रेल्वेस्थानकासमोर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सुमारे 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. कामावर जाणाऱ्या नागरिकांची घाई असतानाचा रेल्वेचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे प्रवासी ट्रेनमधून उतरून प्रवासी रुळावरून चालत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ट्रेन वाशीपर्यंत सोडल्या जात आहेत आणि त्यानंतर त्या लोकल तिथूनच पनवेलच्या दिशेने रवाना केल्या जात आहेत. अशी परस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून त्यांना ठाण्यावरून प्रवास सीएसएमटीला जाण्यासाठी ठाण्यावरून प्रवाल करावा लागत आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची गर्दी वाढताना दिसत आहे.

सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची घाई असते, अशातच रेल्वे विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावरील लोकल सुमारे 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. काही रेल्वे स्थानकात तर काही ट्रेन रेल्वे ट्रॅकमध्येच थांबल्या आहेत. त्यामुळे रेल्वे सेवेवर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाड कधी दुरुस्त केला जाईल आणि रेल्वेसेवा पुन्हा पूर्वपदावर कधी येणार याबाबत अद्याप रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

सकाळी कामावर जाण्याच्या वेळीच हा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी ट्रेनमधून उतरून प्रवासी रुळावरून चालत जात असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्थीचे काम सुरू आहे. प्रवाशांनी संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

Web Title: Mankhurd to vashi local disturbed due to technical failure in signal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 08:20 AM

Topics:  

  • local update
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Mumbai Local : हार्बर लाइन विस्ताराला वेग! बोरिवली कनेक्टिव्हिटीसाठी वेस्टर्न रेल्वेकडून टेंडर प्रक्रिया सुरू
1

Mumbai Local : हार्बर लाइन विस्ताराला वेग! बोरिवली कनेक्टिव्हिटीसाठी वेस्टर्न रेल्वेकडून टेंडर प्रक्रिया सुरू

Mumbai Local : मुंबईकरांनो लक्ष द्या! गर्डर लॉन्चमुळे अनेक लोकल फेऱ्यांवर परिणाम, शनिवारी रात्री लोकल सेवेत बदल, प्रवाशांना सूचना
2

Mumbai Local : मुंबईकरांनो लक्ष द्या! गर्डर लॉन्चमुळे अनेक लोकल फेऱ्यांवर परिणाम, शनिवारी रात्री लोकल सेवेत बदल, प्रवाशांना सूचना

रात्री ११:२५ नंतर नवी मुंबई ‘राम भरोसे’! वाशी-ठाणे मार्गावर लोकल गाड्यांच्या अभावामुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड
3

रात्री ११:२५ नंतर नवी मुंबई ‘राम भरोसे’! वाशी-ठाणे मार्गावर लोकल गाड्यांच्या अभावामुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.