Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षणाचा प्रश्न लागणार मार्गी? जरांगे पाटील अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवरुन चर्चा

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारकडून मंत्री अब्दूल सत्तार यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. तसेच त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली आहे. याचबरोबर जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत देखील चर्चा केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 05, 2024 | 12:08 PM
manoj jarange patil on maratha reservation

manoj jarange patil on maratha reservation

Follow Us
Follow Us:

जालना :  राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये देखील मराठा आरक्षण हा मुद्दा गाजणार आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 सप्टेंबर पर्यंत अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. त्यापूर्वी आरक्षण न दिल्यास पुन्हा एकदा आमरण उपोषण आणि विधानसभा निवडणूका लढवणा असा निर्धार जरांगे पाटील यांनी घेतला आहे. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

अब्दूल सत्तार आले भेटीला…

मराठा आरक्षणासाठी आता जरांगे पाटील आणि राज्य सरकारमधील संकटमोचक म्हणून मंत्री अब्दूल सत्तार पुढे आले आहेत. अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आरक्षणासह त्यांनी राज्यातील विविध विषयांवर मनोज जरांगे पाटील व अब्दुल सत्तार यांच्यामध्ये बंद दाराआड तब्बल 3 तास चर्चा झाली. अब्दूल सत्तार यांनी या चर्चेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका मांडली. “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली. तसेच मराठा आरक्षणाचा विषय तात्काळ मार्गी लावावा,” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांसोबत फोनवर चर्चा

त्याचबरोबर आता मंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा झाली आहे. मनोज जरांगे पाटील व फडणवीस यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले,”पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करताना मी सांगितले होते की याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो. फडणवीस साहेबांचा फोन आला होता. फडणवीस साहेबांना सांगितले की तुम्हाला शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी लागले. ते म्हणाले उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आहोत तेथे निर्णय घेतो,” अशी चर्चा झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

सकारात्मक मार्ग निघण्याची शक्यता

यापूर्वी अनेक बैठकीमध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्प फडणवीस यांच्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला होता. फडणवीस यांचा अनेकदा एकेरी उल्लेख करत आरक्षण कसे देत नाही म्हणत थेट चॅलेंज दिले होते. यानंतर आता दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक मार्ग निघण्याची शक्यता आहे. तसेच मंत्री अब्दूल सत्तार यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांची देखील भेट घेतली आहे. जरांगे पाटील यांची मागणी आणि म्हणणे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचवले आहे.

Web Title: Manoj jarange patil discussion with devendra fadnavis and abdul sattar on the maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 12:08 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • devendra fadnavis
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Kunbi Certificate : मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाला वेग; आत्तापर्यंत 3 लाखांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण
3

Kunbi Certificate : मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाला वेग; आत्तापर्यंत 3 लाखांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण

Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
4

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.