...तेंव्हा तू झोपली होतीस का? चित्रा वाघ यांच्या आरोपावर जरांगे पाटील संतापले
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आजार मैदानावर पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या पूर्वसंध्येला पश्चिम महाराष्ट्रातून हजारो मराठा आंदोलन कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार होणार आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. वाघ यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओही शेअर केला आहे. यावरुन मनोज जरांगे पाटील चित्रा वाघ यांच्यावर संतापले आहेत.
चित्रा वाघ यांचं ट्विट
सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही…
‘डीजे’वर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने.
कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर.
…आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवरव्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा… pic.twitter.com/gu7FRkobND
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 24, 2025
जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही. मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा बोललो. परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. पण मग देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावे, असंही जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या रविवारच्या पत्रकार परिषदेनंतर चित्रा वाघ, प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते. याबाबत मनोज जरांगे यांना विचारले असता त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली. तू माझ्या नादी लागू नकोस. माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
ती जी बाई बोलली, कोण वाघीण तिला आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तेव्हा दिसलं नाही का?, आमच्या तीन-चार वर्षांच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू झोपली होतीस का? तेव्हा तुला कोणी दिसलं नाही का, तेव्हा तू कुठे गेली होती? आता तुझी जात जागी झाली. कवर तू खेटरं चाटतेस, माझ्या नादी तू लागू नकोस. तू बाई असशील तर आमच्याकडेही बाया आहेत. आमच्या आईवर 307 ची केस लागली, तुझ्यावर तशी केस केली तर चालेल का?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. यावर आता चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.