Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; ‘या’ प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 17, 2026 | 11:57 AM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; 'या' प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर; 'या' प्रकरणाची प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले निर्देश

Follow Us
Follow Us:
  • अल्पसंख्याक विकास विभागाची आढावा बैठक संपन्न
  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर
  • योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दिल्या सूचना
मुंबई : अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला समप्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या. तसेच शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विकास विभागाची आढावा बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, राज्यातील अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी शासन कटिबद्ध आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय दादांनी ठरवून दिलेल्या ध्येयधोरणांनुसारच विभागाची वाटचाल व्हावी. सच्चर समितीच्या शिफारशीनुसार २१ फेब्रुवारी २००८ रोजी राज्यात स्वतंत्र अल्पसंख्याक विकास विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागामार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती, वसतिगृहे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्या कर्ज योजना, जैन आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज, स्वयंसहायता बचत गट आदी योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

हे सुद्धा वाचा : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक

शैक्षणिक कर्ज २० लाखांपर्यंत

मौलाना आझाद महामंडळाच्या शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ लाखांवरून २० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगून, या योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंनाच मिळेल याची काटेकोर दक्षता घ्यावी, असेही त्यांनी बजावले. तसेच राज्यातील ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना’ अंतर्गत पायाभूत सुविधांचे अनुदान २ लाखांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले असून, पात्र संस्थांची निवड करताना पूर्ण पारदर्शकता राखावी, असे निर्देश दिले.

दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार

राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्यानंतर बारामतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुःखावर मात करत प्रशासनाला वेग देण्याचा ठाम निर्धार दर्शविला आहे. पती व राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणातही त्यांनी जबाबदारीची धुरा समर्थपणे सांभाळण्यास सुरुवात केली आहे. दिवंगत अजितदादांच्या कार्यपद्धतीची छाप जपतच, स्वतःची ठाम आणि संयमी शैली दाखवत सुनेत्रा पवार यांनी प्रशासनात शिस्त आणि गती या दोन्ही गोष्टींवर भर दिला. “काम वेळेत आणि दर्जेदार झाले पाहिजे,” हा स्पष्ट संदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे.

Web Title: A review meeting of the minority development department was held under the chairmanship of sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Sunetra ajit Pawar

संबंधित बातम्या

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी
1

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार
2

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू होणार? बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मावळात नव्या संघर्षाची चिन्हे
3

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू होणार? बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मावळात नव्या संघर्षाची चिन्हे

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी…
4

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.