Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरक्षणामुळे मराठा-ओबीसीमध्ये लग्न होणार का? लक्ष्मण हाके अन् मनोज जरांगे पाटलांमध्ये जुंपली!

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीवर आता लग्नापर्यंत वाद आला आहे. लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केले.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 14, 2025 | 06:02 PM
Manoj jarange patil vs laxman hake on reservation issue in maharashtra

Manoj jarange patil vs laxman hake on reservation issue in maharashtra

Follow Us
Close
Follow Us:

Maratha Reservation : मराठवाडा : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथे उपोषण केल्यानंतर त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याचबरोबर हैदराबाद गॅझिट देखील महायुती सरकारकडून लागू करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी समाजाच्या वतीने लक्ष्मण हाके भूमिका व्यक्त करत असून त्यांनी जरांगे पाटलांसह मराठा समाजावर तीव्र टीका केली होती. यावेळी त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये देखील केली. या वक्तव्याचा मनोज जरांगे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सडेतोड उत्तर दिले आहे. जरांगे पाटील म्हणाले की, मी आतापर्यंत त्याच्यावर काही बोललो नाही, तुम्हाला आतापर्यंत बोललो नाही, लक्षात ठेवा, तुमच्या लेकीबाळी मी माझ्या लेकीबाळी प्रमाणे समजतो. अजित पवारांचे दोन कार्यकर्ते धनंजय मुंडे, आणि छगन भुजबळ यांनी त्यांना हाताखाली धरलं आहे, त्यांना काही बोलता येत नाही, म्हणून ते यांच्या तोंडून त्यांची भाषा वधून घेत आहेत. त्यांचे विचार बीड जिल्ह्यात येऊन पाजाळ्याचे काम करू नका, त्या दोघांना बोलता येईना म्हणून, त्या दोघांनी तुम्हाला हाताखाली धरलं आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “तुम्ही वैचारिक विरोध करत होता, आरक्षणाबद्दल बोलत होता, तोपर्यंत ठीक होतं. पण आता तुम्ही आमच्या अस्मितेपर्यंत पोहोचला आहात, त्यामुळे तुम्ही कोणाच्या विचाराचे माणूस आहात, हे आम्हाला कळालं आहे. म्हणून धनगर लोक त्यांना जवळ करत नाही, मी त्यांच्यावर काहीच बोललो नव्हतो, त्याला देखील हेच कारण होतं, ते म्हणजे आम्हाला माहिती आहे, की यांचे गढूळ विचार आहेत. कुणाच्याही लेकीबाळीवर आम्ही आतापर्यंत बोललेलो नाही, कारण धनगराची लेक आहे, ती आमची पण लेक आहे.  धनगर बांधवांच्या हे लक्षात आलेल आहे, की हे विनाकारण भांडण विकत घेत आहेत,” असा टोला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

काय म्हणाले होते लक्ष्मण हाके?

मनोज जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे राज्यात हैदराबाद गॅझिट लागू करण्यात आले आहे. यावरुन टीका करताना लक्ष्मण हाके यांनी लग्नाचा विषय काढत वादग्रस्त टीका केली. लक्ष्मण हाके म्हणाले की, “तुम्ही मागास झालात ना ? तर आता जरांगे यांना माझे सांगणे आहे. कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आलात. तर आम्ही आमच्यातील क्वालिफाईड पोरं सुचवतो. आता पहिले ११ विवाह आपआपल्यामध्ये ठरवूयात, तुम्ही आमच्यात आल्याने आता जातपात राहिली का? पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले का? त्यामुळे ११ विवाह जाहीर करू,” असे वक्तव्य हाके यांनी केले. यावरुन वाद निर्माण झाला आहे. यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिले.

Web Title: Manoj jarange patil vs laxman hake on reservation issue in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • Laxman hake
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

Supreme Court: ‘नाहीतर निवडणुकाच रद्द करू…’; सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
1

Supreme Court: ‘नाहीतर निवडणुकाच रद्द करू…’; सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा

आम्ही लक्ष ठेवत आहोत, मूळ ओबीसींना तिकीट न दिल्यास…; लक्ष्मण हाकेंचा इशारा
2

आम्ही लक्ष ठेवत आहोत, मूळ ओबीसींना तिकीट न दिल्यास…; लक्ष्मण हाकेंचा इशारा

Manoj Jarange Murder Conspiracy: मनोज जरांगे हत्येच्या कटप्रकरणात मोठी अपडेट; धनंजय मुंडेचा समर्थकाला अटक
3

Manoj Jarange Murder Conspiracy: मनोज जरांगे हत्येच्या कटप्रकरणात मोठी अपडेट; धनंजय मुंडेचा समर्थकाला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.