Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार; पुण्यातील अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना आगामी दिवसांत भाजप मोठा राजकीय धक्का देणार असल्याची चर्चा आहे. या पक्षांतील वीसहून अधिक माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 02, 2025 | 01:17 PM
काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार; पुण्यातील अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर

काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार; पुण्यातील अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर

Follow Us
Close
Follow Us:
  • काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार
  • पुण्यातील अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर
  • आगामी दिवसांत मोठ्या घडामोडी घडणार
पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने आपला पक्ष बळकट करण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना मोठ्या प्रमाणात जोडून घेण्याची मोहीम सुरू केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना आगामी दिवसांत भाजप मोठा राजकीय धक्का देणार असल्याची चर्चा आहे. या पक्षांतील वीसहून अधिक माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असून त्यातील निम्म्या नगरसेवकांना वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदील मिळाल्याची माहिती आहे. महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच हा प्रवेश होणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्षांनी गतिमान सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने एकत्र लढायचे की नाही, याबाबत अद्याप निश्चितता नाही. २०१७ मध्ये १०० नगरसेवकांसह स्वतंत्र सत्ता मिळवणाऱ्या भाजपमध्ये यंदाही प्रत्येक प्रभागात अनेक इच्छुक रांगेत आहेत. ज्या प्रभागात भाजप तुलनेने कमजोर आहे, तेथे इतर पक्षांतील नेत्यांना जोडले जात आहे. शिवसेना (ठाकरे गट) येथील पाच माजी नगरसेवक नुकतेच भाजपात दाखल झाले. त्यानंतरही अनेक ज्येष्ठ नेते प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपच्या तिकिटासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एका प्रभागात पाच ते दहा जण इच्छुक असल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. इतर पक्षातून भाजपात प्रवेश करून निवडणूक लढवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. शहरातील विविध पक्षांतील किमान २१ माजी नगरसेवक भाजपात दाखल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह काँग्रेस आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक सामील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षप्रवेश लवकरच

दशरामध्येच काही माजी नगरसेवकांचा प्रवेश होणार होता; मात्र काही भाजप नेत्यांच्या विरोधामुळे तो पुढे ढकलावा लागला. दिवाळीतही प्रवेश न झाल्याने आता निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मोठा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात आगामी दिवसांत मोठे राजकीय उलथापालथ पाहायला मिळू शकते.

भाजप विरुद्ध अजित पवार गटाची थेट लढत

शिवसेनेतील फूट आणि बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेता भाजपने महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असून, महायुतीचा घटक असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी भाजपची थेट लढत होणार असल्याचे संकेत आहेत. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ नगरसेवक निवडून आले होते. फुटीनंतर बहुतांश नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत राहिले आहेत. त्यांच्यातील काही जण भाजपसोबत युती करून लढण्याच्या बाजूने असले तरी भाजपने स्वबळावरची तयारी सुरू केल्याने ते संभ्रमात असल्याचे म्हटले जाते.

भाजपमध्ये प्रवेश करण्यास अनेक उमेदवार इच्छुक आहेत. परंतु आधीच भाजप पक्षात असलेल्या कोणाकोणाला तिकीट द्यावे, असा पेच आहे. त्यात आयारामांची संख्या वाढत आहे. वडगावशेरी, हडपसर, कोथरुड, खडकवासला या मतदारांसंघासह इतर मतदार संघातील २१ उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. परंतु सरसकट सर्वांना प्रवेश देणे शक्य नाही. कोणाला प्रवेश द्यावा, याचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीमध्ये घेतला जाणार आहे. या कमिटीची बैठक ७ डिसेंबर रोजी होणार आहे, त्यामुळे काही झाले तरी ७ डिसेंबर पूर्वी एकही पक्षप्रवेश होणार नाही, हे खात्रीशीर सांगतो. पक्षात कोण प्रवेश करणार आहेत, त्यांची नावे सध्या सांगणे कठीण आहे. उमेदवारांशी प्राथमिक चर्चा सुरु आहेत. लवकरच चित्र स्पष्ट होईल. – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप.

Web Title: Many former corporators of pune are going to join bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • Congress

संबंधित बातम्या

काही दिवसांत मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो; पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
1

काही दिवसांत मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो; पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

Malvan Municipal Polls: मालवणमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा; भाजप पदाधिकाऱ्याकडून दीड लाखांची रोकड जप्त
2

Malvan Municipal Polls: मालवणमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा; भाजप पदाधिकाऱ्याकडून दीड लाखांची रोकड जप्त

राम सातपुतेंनी मदतीसाठी 50 कोटींची ऑफर दिली होती; जयसिंह मोहिते पाटलांचा गौप्यस्फोट
3

राम सातपुतेंनी मदतीसाठी 50 कोटींची ऑफर दिली होती; जयसिंह मोहिते पाटलांचा गौप्यस्फोट

निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, कोर्टाच्या निकालानंतर 8 दिवस आयोग झोपला होता का? काँग्रेसचा संतप्त सवाल
4

निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, कोर्टाच्या निकालानंतर 8 दिवस आयोग झोपला होता का? काँग्रेसचा संतप्त सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.