Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

Marathi Breaking Live Marathi : देश-विदेशातील ताज्या घडामोडींसह राजकारण, स्थानिक, समाजकारण, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 14, 2025 | 06:52 PM
Top Marathi News Today : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

Top Marathi News Today : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Updates :  महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा वाद आणखी वाढला आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी गोंदियात ध्वजारोहणास नकार आहे. त्यामुळे आता महायुतीतील नेत्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

विशेष म्हणजे, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत मंत्री भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहणाच्या आदेशाचे पालन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. दरम्यान, 15 ऑगस्टला गोंदिया जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यास भुजबळ यांनी नकार दिल्यामुळे आता कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा गोंदिया जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करणार आहे.

रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावर कोणताही निर्णय झालेला नाही. तर, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून गोगावले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात अनेकदा तीव्र शाब्दिक खडाजंगी झाली आहे.

The liveblog has ended.
  • 14 Aug 2025 06:52 PM (IST)

    14 Aug 2025 06:52 PM (IST)

    Independence Day: स्वातंत्र्य दिनी धमाका! १५ ऑगस्ट ‘या’ देशभक्ती गीतांनी करा साजरी, सैनिकांच्या बलिदानाला करा सलाम

    १५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्यदिन, हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करतो आणि देशाप्रती असलेली आपली भक्ती बळकट करतो. यावेळी स्वातंत्र्यदिन आणखी खास बनवण्यासाठी, १५ ऑगस्ट हा दिवस काही लोकप्रिय देशभक्तीपर गाण्यांनी साजरा करूया. ही गाणी केवळ आपले हृदय उत्साहाने भरत नाहीत तर देशासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कथा देखील सांगतात.

  • 14 Aug 2025 06:00 PM (IST)

    14 Aug 2025 06:00 PM (IST)

    : रजनीकांतचा ‘कुली’ रिलीज होताच ऑनलाइन लीक, पायरसीमुळे निर्मात्यांना मोठा फटका

    सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) यांचा बहुचर्चित चित्रपट ‘कुली’ (Coolie) चित्रपटगृहांमध्ये दाखल होताच ऑनलाइन पायरसीचा शिकार झाला आहे. १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या उच्च-गुणवत्तेच्या आणि कमी-रिझोल्यूशनच्या प्रती काही तासांतच बेकायदेशीर वेबसाइट्स आणि टेलिग्राम ग्रुप्सवर लीक झाल्या आहेत. यामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • 14 Aug 2025 05:59 PM (IST)

    14 Aug 2025 05:59 PM (IST)

    गणपतीपुळेला जाताय?मंदिर देवस्थानचे भाविकांना महत्वाचे आवाहन

    राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या मंदिरांमध्ये ड्रेसकोड सक्तीचा केला गेला आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील श्री देव गणपतीमुळे मंदिर संस्थानाने देखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. गणपतीपुळे मंदिरात भाविकांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. भाविकांसाठी वेशभूषा नियमावली तयार करण्यात आली आहे.

  • 14 Aug 2025 05:10 PM (IST)

    14 Aug 2025 05:10 PM (IST)

    लवकरच Mahindra BE6 Black Edition चे आगमन होणार

    इलेक्ट्रिक सेगमेंटमधील वाढती मागणी लक्षात घेत महिंद्राने BE6 and XEV 9e या दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. आता कंपनीने सोशल मीडियावर त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्ही महिंद्रा BE6 च्या ब्लॅक एडिशनचा एक नवीन टीझर रिलीज केला आहे.महिंद्रा BE6 ब्लॅक एडिशनमधील सर्वात मोठा बदल त्याच्या लूकमध्ये दिसून येईल. यात ब्लॅक फिनिश अलॉय व्हील्स, पियानो ब्लॅक इन्सर्ट आणि ब्लॅक अपहोल्स्ट्री असेल, ज्यामुळे याचे इंटिरिअर आणि एक्सटिरिअर दोन्हीही प्रीमियम आणि आकर्षक दिसतील. ही कार केवळ रंगातच नाही तर स्टाईलमध्येही खास असेल. या कारचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु महिंद्रा स्कॉर्पिओ-एन कार्बन एडिशन आणि XUV700 इबोनी एडिशनच्या धर्तीवर याचे नाव ठेवण्याची शक्यता आहे.

  • 14 Aug 2025 04:50 PM (IST)

    14 Aug 2025 04:50 PM (IST)

    Bihar Election 2025 : SIR वरील वाद सुप्रीम कोर्टाने मिटवला, निवडणूक आयोग ‘या’ तारखेपर्यंत काढून टाकलेल्या नावांची यादी जाहीर करणार

    बिहार विधानसभा निवडणूक संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. निवडणूक आयोग आता बिहारमधील मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या ६५ लाख लोकांची नावे जाहीर करणार आहे. बिहारमधील मतदार यादीच्या एसआयआरविरुद्ध दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी हा आदेश दिला.

  • 14 Aug 2025 04:50 PM (IST)

    14 Aug 2025 04:50 PM (IST)

    धरणाची निविदा काढल्यास शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण

    कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवर बोरगाव येथे धरण बांधले जाणार आहे.तर चिल्हार नदीवर शिलार येथे धरण बांधले जाणार आहे.या धरणाच्या कामासाठी शासनाने निविदा काढली असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांचा या दोन्ही धरणांना विरोध असून बोरगाव येथे होणाऱ्या पोशिर धरणाला 30 वर्षे येथील शेतकरी विरोध करीत आहेत.दरम्यान या दोन्ही धरणांची पर्यावरण सुनावणी शासनाने घेतली नाही आणि असे असताना देखील निविदा काढण्यात आल्याने सरकार विरोधी वातावरण निर्माण झाले आहे.

  • 14 Aug 2025 04:45 PM (IST)

    14 Aug 2025 04:45 PM (IST)

    गोविंदा पथकासाठी अन्नछत्राची उभारणी

    भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जिल्हा) व शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही १६ ऑगस्ट रोजी कॅसल मिल नाका येथील स्व. मीनाताई ठाकरे चौक येथे गोकुळ दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत आयोजक माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली.

  • 14 Aug 2025 04:40 PM (IST)

    14 Aug 2025 04:40 PM (IST)

    जखमी गोविंदांसाठी ठाणे सिव्हील रुग्णालयात २० बेडचा विशेष कक्ष

    ठाणे शहर सध्या उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. मात्र, या आनंदोत्सवात कोणताही गोविंदा जखमी होऊ नये, कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने सर्वतोपरी तयारी केली आहेयंदा ठाणे सिव्हील रुग्णालयात जखमी गोविंदांसाठी २० बेडचा विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात सर्व आवश्यक सुविधा, औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. कोणताही गोविंदा अपघातग्रस्त झाल्यास तातडीने उपचार मिळावेत, हा यामागचा मुख्य हेतू आहे.

  • 14 Aug 2025 04:35 PM (IST)

    14 Aug 2025 04:35 PM (IST)

    पोलादपुरमधील ग्रामस्थ स्वातंत्र्यदिनी आपत्तीग्रस्त करणार आत्मदहन

    रायगड जिल्ह्यातील पोलादपुर येथील साखर सुतारवाडी ग्रामस्थांनी गावात सरण रचून शासनाला आत्मदहनाचा इशारा दिला आहे. उद्या स्वातंत्र्य दिनी साखर सुतारवाडीतील हे आपद्ग्रस्त पुर्नवसनासाठी आत्मदहन करणार आहेत. 2021 च्या दरड दुर्घटनेतील दरडग्रस्त साखर सुतारवाडी ग्रामस्थांचे पुर्नवसन झाल नसल्याने भाड्याच्या घरात रहाण्याची वेळ आली आहे. वाडीत पक्की घर आहेत पण शासनाने ती धोकादायक जाहिर केल्याने त्या घरात रहाता येत नाही. पर्यायी साखर सुतर वाडीतील 44 कुटुंबांना गेली चार वर्ष भाड्याने घर घेऊन रहाण्याची वेळ आली आहे. शासन पुनर्वसन करीत नसल्याने पुनर्वसनाच्या ठिकाणी सरण रचून आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

  • 14 Aug 2025 04:30 PM (IST)

    14 Aug 2025 04:30 PM (IST)

    उल्हासनगरमध्ये खड्ड्यांच्या साम्राज्यात आणखी खोदकाम

    पावसाळ्यात रस्ते खोदकाम करण्यास महापालिकेची स्पष्ट मनाई असतानाही, टाऊन हॉल येथील मुख्य रस्त्यावर रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरु असल्याचे निदर्शनास आले. उल्हासनगर शहरातील आधीच खड्ड्यांनी विद्रूप झालेल्या रस्त्यांवर हे बेकायदेशीर खोदकाम सुरू होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी तात्काळ महापालिका अधिकारी सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्याशी संपर्क साधला आहे. बंडू देशमुख यांच्या तक्रारीनंतर गणेश शिंपी यांनी तत्पर कारवाई करत संबंधित कंपनीचा जेसीबी तात्काळ जप्त करण्याचे आदेश दिले. तसेच, या प्रकारात गुन्हा दाखल करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत, पावसाळ्यातील बेकायदेशीर रस्तेखोदाईविरोधातील ही कारवाई इतर ठिकाणीही व्हावी, अशी मागणी केली आहे.

  • 14 Aug 2025 04:25 PM (IST)

    14 Aug 2025 04:25 PM (IST)

    खालिद का शिवाजीवर बंदी आणणार ?

    ठाणे शहरातील माजिवडा येथील राष्ट्रध्वजाखाली छत्रपती संभाजी महाराज आणि घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना ठाणे महानगर पालिका आयुक्तांना करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. सकल मराठा समाजाचे समन्वयक रमेश आंब्रे, महेंद्र पाटील, अंकुश कदम आदींच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सकल मराठा समाजाने केलेल्या अनेक मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आंब्रे यांनी सांगितले.

  • 14 Aug 2025 04:20 PM (IST)

    14 Aug 2025 04:20 PM (IST)

    खालापूर शहरात तिरंगा यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन.

    देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर नगरपंचायत यांच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विठू नामाच्या गजरात व भारत मातेच्या जयघोष खालापूर शहरात करण्यात आला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 वी जयंती चे औचित्य साधत पालखीचे आयोजनही करण्यात आले.
    विठुरायची पालखी व हातात तिरंगा घेऊन यात्रेची सुरवात स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांना अभिवादन करून खालापूर शहरात मार्गक्रमण करत खालापूर तहसील कार्यालय येथे यात्रेचा समारोप करण्यात आला.

  • 14 Aug 2025 04:15 PM (IST)

    14 Aug 2025 04:15 PM (IST)

    अंबरनाथमध्ये भूमिपुत्रांचा आमा संघटनेविरोधात मोर्चा

    अंबरनाथ एमआयडीसीत दलालांचा सुळसुळाट झाला असून चार ते पाच पट भावाने जमिनींची विक्री होत आहे, तसेच स्थानिकांचा दबाव आणि त्रासामुळे एमआयडीसीतील १४०० उद्योग नाईलाजाने परराज्यात जातील, असे वक्तव्य उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत केले होते. मात्र या एकतर्फी आरोपानंतर स्थानिक भूमिपुत्र चांगलेच आक्रमक झाले असून बुधवारी भूमिपुत्र नरेश गायकर यांच्या नेतृतात भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने आमा संघटनेच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढला आहे.

  • 14 Aug 2025 04:08 PM (IST)

    14 Aug 2025 04:08 PM (IST)

    सिंधुदुर्गात कंत्राटी तंत्रज्ञ यांचे कामबंद आंदोलन

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांला नर्सिंग कॉलेजला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला कर्मचाऱ्याचा धक्का लागला. या रागातून त्या विद्यार्थिनीने मारहाण करून प्रकरण माफीनाम्यानंतर मिटले. मात्र, मुकादम यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केल आहे.

  • 14 Aug 2025 03:34 PM (IST)

    14 Aug 2025 03:34 PM (IST)

    तब्बल २० वर्षांनी गायक अभिजीत सावंतने केली ‘ही’ गोष्ट, म्हणाला ‘आयुष्यातील मोठी संधी…’

    इंडियन आयडॉल पासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक अभिजीत सावंत आता अजून एक खास सरप्राईज घेऊन प्रेक्षकांचा भेटीला आला आहे. अभिजीत अजून एक नवं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. हे फक्त गाणं नाही तर अभिजीत साठी ही खूप मोठी गोष्ट आहे. तब्बल २० वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर गायकाने आणखी काही खास केले असल्याचे समोर आले आहे.

    साविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 14 Aug 2025 03:32 PM (IST)

    14 Aug 2025 03:32 PM (IST)

    “जैन मुनींनी विचार करणे गरजेचे, उगाच धर्माच्या नावाखाली…”; कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरे संतापले

    Raj Thackeray On Kabutar Khana: दादरमधील कबुतरखाना हा सध्या चर्चा विषय ठरला आहे. मुंबई महापालिकेने ताडपत्री टाकत हा कबुतरखाना बंद केला होता. त्यानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी ताडपत्री काढून कबुतरांना खाणे देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. काल या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. हायकोर्टाने तूर्तास कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी कायम ठेवली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 14 Aug 2025 03:06 PM (IST)

    14 Aug 2025 03:06 PM (IST)

    Cloud Burst in Kishtwar: जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचा कहर; किश्तवाडमध्ये ढगफुटी, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता

    जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील माचैल माता यात्रा मार्गावर ढगफुटीमुळे झाली आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. लाकडी पूल आणि पीएमजीएसवाय पुलाचे नुकसान झाले आहे. बचाव कार्य सुरू आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 14 Aug 2025 02:38 PM (IST)

    14 Aug 2025 02:38 PM (IST)

    शहनाज गिलच्या भावाची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री?

    बिग बाॅस 19 ला आता सुरु व्हायला फक्त 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. या नव्या सिझनमध्ये कोणते नवे स्पर्धक सहभागी होणार आहेत याकडे सर्वाच्या नजरा टिकुन आहेत. सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या होस्टच्या रुपामध्ये पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस सीझन १९’ चा नवीन अधिकृत प्रोमो समोर आला आहे. सलमान खानने आता शोच्या २ स्पर्धकांचे चेहरे उघड केले आहेत. यावेळी प्रोमोमध्ये स्पर्धकांची फक्त झलक दाखवण्यात आली नाही तर त्यांचे पूर्ण चेहरे दाखवण्यात आले आहेत. शोमध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे.

  • 14 Aug 2025 02:37 PM (IST)

    14 Aug 2025 02:37 PM (IST)

    दहीहंडी उत्सवात जपले जाणार सामाजिक भान

    ठाणे /स्नेहा जाधव,काकडे : नवयुग मित्र मंडळ आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्टने आयोजित केलेल्या दहीकाला उत्सवात सामाजिक भान राखले जाणार आहे. चौथ्या थरापासून नऊ थर लावणाऱ्या सर्वच गोविंदा पथकांना आयोजकांकडून बक्षिसे तर दिली जाणारच आहेत. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रूपयांचे अर्थसाहाय्य देखील करण्यात येणार आहे.

  • 14 Aug 2025 02:27 PM (IST)

    14 Aug 2025 02:27 PM (IST)

    Maharashtra Rain News: विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू; कोकणातील ‘या’ जिल्ह्यात तर…

    मुंबई: दोन तीन दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू झाली आहे. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात आज जोरदार पाऊस सुरू झाला आहे. तर आज हवामान विभागाने राज्यातील कोणती जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.

  • 14 Aug 2025 02:25 PM (IST)

    14 Aug 2025 02:25 PM (IST)

    विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू

    मुंबई: दोन तीन दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू झाली आहे. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात आज जोरदार पाऊस सुरू झाला आहे. तर आज हवामान विभागाने राज्यातील कोणती जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.

  • 14 Aug 2025 02:20 PM (IST)

    14 Aug 2025 02:20 PM (IST)

    जुने कपडे आहेत का…; म्हणत महिलेचे सोन्याचे दागिने लुटले

    डोंबिवली : डोंबिवली येथून एक चोरीची घटना समोर आली आहे. तुमच्या घरात वापरून झालेले कपडे आहेत का. ते आम्हाला गरीब गरजू लोकांना द्यायचे आहेत, असे म्हणत एका महिलेचे तीन लाख ६० हजार रुपयांचे दागिने लुटले. घरात जुने कपडे नाहीत असे सांगूनही जुने कपडे घ्यायला आलेली महिला हटत नव्हती. याकाळात महिलेने घरातील महिलेला भुरळ घालून, बोलण्यात गुंतवून तिच्या जवळील तीन लाख ६० हजार रुपयांचे दागिने लुटून नेले. या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • 14 Aug 2025 02:19 PM (IST)

    14 Aug 2025 02:19 PM (IST)

    रक्तात वाढलेल्या इंचभर साखरेमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका!

    जीवनशैलीतील बदल, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, पाण्याची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. रक्तात वाढलेली साखर आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. कारण रक्तातील साखर वाढल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची जास्त शक्यता असते. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे केवळ मधुमेहाचं नाहीतर हृदयावर सुद्धा गंभीर परिणाम दिसून येतो. हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते.शरीरात अतिशय किंचित वाढलेला मधुमेह हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतो.

  • 14 Aug 2025 02:18 PM (IST)

    14 Aug 2025 02:18 PM (IST)

    हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ ठरला प्रेक्षकांची पहिली पसंती?

    हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा ‘वॉर २’ हा ॲक्शन चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत. प्रेक्षक पहिल्यांदाच ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशनला मोठ्या पडद्यावर पाहत आहेत. काही चाहते तर ज्युनियर एनटीआरच्या एन्ट्रीवर नाचू लागले. त्यांच्यासोबतच चित्रपटाची मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणी देखील पहिल्यांदाच पडद्यावर ॲक्शन करताना दिसली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी काय म्हटले हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • 14 Aug 2025 02:18 PM (IST)

    14 Aug 2025 02:18 PM (IST)

    जन्माष्टमीचा दिवस या मूलांकासाठी असेल शुभ

    जन्माष्टमीचा सण शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस मूलांक 4 असणाऱ्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या लोकांवर श्रीकृष्णांचा विशेष आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे या लोकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ शकते. तसेच आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात. जन्माष्टमीच्या दिवशी या लोकांनी केलेल्या कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. त्यासोबतच तुमची जीवनामध्ये प्रगती होऊ शकते.

  • 14 Aug 2025 02:17 PM (IST)

    14 Aug 2025 02:17 PM (IST)

    अमेरिकेच्या कर आकारणीच्या परिणामांना तोंड देण्यासाठी सरकारचा मोठा प्लान

    Export Support Mission Marathi News: अमेरिकेच्या कर आकारणीच्या परिणामांना तोंड देण्यासाठी सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सुमारे ₹ 25,000 कोटींची एक समर्थन योजना (निर्यात प्रोत्साहन अभियान) तयार केली आहे, जी सहा वर्षांच्या कालावधीत अंमलात आणली जाईल. यामुळे अमेरिकेच्या उच्च कर आकारणीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा सामना करता येईल.

  • 14 Aug 2025 01:56 PM (IST)

    14 Aug 2025 01:56 PM (IST)

    पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी वशिलेबाजी सुरूच

    भारताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यभरातून व परराज्यातून लाखो भाविक भक्त येत असतात. मात्र, इथे आल्यावर त्यांना चरण दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागते. आपल्या लाडक्या देवाची भेट व्हावी, यासाठी भाविक विठुरायाचे चरण स्पर्श करून जातात.दुसरीकडे, मंदिर समितीतील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना काही मिनिटातच थेट दर्शनाचा लाभ होत असल्याची तक्रार होत आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन बंद केल्याचे जाहीर केले होते. मात्र, काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मर्जीने व्हीआयपी दर्शनाची सोय अद्यापही छुप्या पद्धतीने सुरू असल्याची चर्चा आहे.

  • 14 Aug 2025 01:47 PM (IST)

    14 Aug 2025 01:47 PM (IST)

    स्वातंत्र्यदिनीच कशावर तरी बंदी हाच मोठा विरोधाभास…पालिकेच्या निर्णयावर राज ठाकरे भडकले

    स्वातंत्र्यदिनाची लगबग सुरु असताना देशभरामध्ये मोठा उत्साह दिसू येत आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये नवीन वादाची ठिणगी पडली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने मांसाहाराबाबत घेतलेल्या निर्णयामुळे वाद वाढला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्ट रोजी मासे आणि मटण विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यावरुन आता वाद पेटला आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये कबूतरखान्यावरुन देखील वादंग निर्माण झाला आहे. या सर्व मुद्द्यांवर मनसे नेते राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 14 Aug 2025 01:40 PM (IST)

    14 Aug 2025 01:40 PM (IST)

    सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती

    मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये सूरज चव्हाण यांचे नाव चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांना त्यांच्या पक्षातील युवक प्रदेशाध्यक्ष पदावरुन काढून टाकण्यात आले होते. सूरज चव्हाण यांनी हाणामारी केल्यामुळे त्यांच्यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र महिन्याभरातच अजित पवार आपला निर्णय मागे घेत सूरज चव्हाण यांना पदौन्नती दिली आहे.

  • 14 Aug 2025 01:35 PM (IST)

    14 Aug 2025 01:35 PM (IST)

    शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची जोरात धडक

    लोकप्रिय टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने सोशल मीडियावर एक धक्कादायक बातमी दिली आहे. तिच्या कारला अपघात झाला आहे. अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर चाहत्यांना या अपघाताची माहिती दिली आहे. बुधवारी मुंबईत हा अपघात झाला. एका बसने अभिनेत्रीच्या कारला धडक दिली. आता तिच्या कारची अवस्था किती वाईट आहे याची झलक सोशल मीडियावरही समोर आली आहे. शिल्पा शिरोडकरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून अपघातानंतरचा फोटो शेअर केला आहे.

  • 14 Aug 2025 01:25 PM (IST)

    14 Aug 2025 01:25 PM (IST)

    US-Pakistan चे वाढले प्रेम; मात्र असीम मुनीरच्या धमकीनंतरही अमेरिकेने का पाळले आहे मौन?

    पाकिस्तानमध्ये आज ( दि. १४ ऑगस्ट २०२५ ) आपला ७९वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत असताना, अमेरिका आणि पाकिस्तानमधील वाढत्या मैत्रीपूर्ण संबंधांकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानचे अभिनंदन करत दहशतवादविरोधी प्रयत्न आणि व्यापार भागीदारीचे कौतुक केले. त्यांनी खनिजे, हायड्रोकार्बन आणि इतर आर्थिक क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याची तयारी व्यक्त केली.

  • 14 Aug 2025 01:15 PM (IST)

    14 Aug 2025 01:15 PM (IST)

    देशी मैदानी खेळांच्या खेळाडूंना शासकीय लाभ मिळावा

    पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिले आहे. कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या देशी मैदानी खेळांच्या खेळाडूंना शासकीय लाभ मिळण्याबाबतची मागणी मंगलप्रभात लोढा यांच्याकडून करण्यात आली आहे.

  • 14 Aug 2025 01:05 PM (IST)

    14 Aug 2025 01:05 PM (IST)

    Cheque Payments: चेक भरताच काही तासात जमा होणार खात्यात पैसे

    ४ ऑक्टोबरपासून बँकांमध्ये जमा केल्यानंतर काही तासांतच चेक क्लिअर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) एक नवीन प्रणाली सुरू करत आहे. यामुळे चेक जमा केल्यानंतर काही तासांतच खात्यात पैसे जमा होतील याची खात्री होईल. चेक काही तासांत स्कॅन केला जाईल, सादर केला जाईल आणि पास केला जाईल आणि बँक कामकाजाच्या दिवसांमध्ये लगेच दिला जाईल. क्लिअरन्स सायकल सध्याच्या T+1 वरून म्हणजेच चेक जमा केल्यानंतर एक दिवस काही तासांपर्यंत कमी केली जाईल. चेक ट्रंकेशन सिस्टम (CTS) सध्या दोन कामकाजाच्या दिवसांपर्यंतच्या चक्रात चेक प्रक्रिया करते. पण आता या प्रणालीत बदल करण्यात येणार आहे.

  • 14 Aug 2025 12:55 PM (IST)

    14 Aug 2025 12:55 PM (IST)

    करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवरील रासायनिक प्रक्रिया पूर्ण

    रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर मूळ मूर्ती पुन्हा दर्शनासाठी खुली… रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तीला नवी झळाळी… गेल्या तीन दिवसापासून पुरातत्व विभागाकडून अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर सुरू होती रासायनिक संवर्धन प्रक्रिया… रासायनिक संवर्धन प्रक्रिया काळात अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन होतं बंद… रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर धार्मिक विधी पार पाडून मूर्ती दर्शनासाठी केली गेली खुली आहे.

  • 14 Aug 2025 12:45 PM (IST)

    14 Aug 2025 12:45 PM (IST)

    अजित पवार बीडमध्ये मुक्कामी

    अजित पवार आज संभाजीनगरमध्ये जाणार आहेत. तिथे काही कार्यक्रम आणि पक्षप्रवेश कार्यक्रम झाल्यावर रात्री बीडला मुक्काम करणार. उद्या पालकमंत्री म्हणून ते बीडला ध्वजारोहण करणार आहेत.

  • 14 Aug 2025 12:35 PM (IST)

    14 Aug 2025 12:35 PM (IST)

    विद्यार्थी काँग्रेसकडून प्रशासनाचा जाहीर निषेध, पुणे विद्यापीठात आंदोलन

    मागील ८ जुलैपासून सुरू असलेल्या कॅरी ऑन संदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागणीला दीड महिना उलटूनही कुठलाही निर्णय झाला नाही. आज विद्यार्थी काँग्रेसकडून जाहीर निषेध आणि कॅरी ऑनसाठी शेकडोंच्या संख्येने तीव्र आंदोलन करत आहेत.

  • 14 Aug 2025 12:32 PM (IST)

    14 Aug 2025 12:32 PM (IST)

    पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांची न्यायालयात धाव

    कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणासंदर्भात नवी अपडेट मिळाली आहे. अल्पवयीन कारचालकावर प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालवण्याची मागणी पुणे बाल न्याय मंडळांने फेटाळल्यानंतर पुणे पोलीसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. बाल न्याय मंडळाच्या निर्णयात त्रुटी असल्याचा दावा करून पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. कारचालकाचा गुन्हा निर्घृण श्रेणीत मोडत नसल्याचा निकाल बाल न्यायालय मंडळाने दिला होता. या निकालात स्पष्टता नसल्याचा दावा करून पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अपील केलं आहे. प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालवण्यात यावा असे पुणे पोलिसांनी अर्जात म्हटलं आहे.

  • 14 Aug 2025 12:07 PM (IST)

    14 Aug 2025 12:07 PM (IST)

    जैन आंदोलकांवर कारवाई व्हावी

    कबुतरांमुळे काय आजार होत आहेत, ते डॅाक्टरांनी सांगितले आहे. मुंबईतील कबुतरखान्याबाबत न्यायालयाने दिलेला न्याय पाळला पाहिजे, असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकरणात जैन समाजात पडू नये, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

  • 14 Aug 2025 11:31 AM (IST)

    14 Aug 2025 11:31 AM (IST)

    सूरज चव्हाण 'रिटर्न'! फ्री स्टाईल हाणामारीनंतर राष्ट्रवादीमध्ये पदोन्नती

    कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी नेते सूरच चव्हाण यांनी मारहाण केली होती. त्यावेळी सूरज चव्हाण यांच्याकडे युवक प्रदेशाध्यक्ष हे पद होते. या हाणामारीनंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. आता मात्र सूरज चव्हाण हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षामध्ये रिर्टन आले असून त्यांची पदोन्नती झाली आहे.

  • 14 Aug 2025 11:17 AM (IST)

    14 Aug 2025 11:17 AM (IST)

    पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र

    अखंड भारताने ब्रिटीशांच्या जाचाला कंटाळून स्वातंत्र्याचा तीव्र लढा दिला. आजच्या दिवशी भारतापासून वेगळे होऊन पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले. पाकिस्तानमध्ये आजचा दिवस हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर भारत हा पाकिस्तानपासून वेगळा झाला.

  • 14 Aug 2025 10:55 AM (IST)

    14 Aug 2025 10:55 AM (IST)

    जिम ट्रेनरने मित्रांसोबत युवकाची केली हत्या

    पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत चालली आहे. सतत हत्या, हाणामारी, ड्रग्स या सारख्या गुन्ह्याच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येत आहे. आता पिंपरी चिंचवडमधून हत्येची एक घटना समोर आली आहे. एका जिम ट्रेनर तरुणीने मित्राच्या मदतीने एका युवकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेला तरुण हा जिमट्रेनर तरुणीला वारंवार त्रास देत होता. त्यातून ही घटना घडली असल्याचं आतापर्यंतच्या प्राथमिक पोलीस तपासात समीर आलेलं आहे. बातमी सविस्तर वाचा

  • 14 Aug 2025 10:45 AM (IST)

    14 Aug 2025 10:45 AM (IST)

    SA vs AUS सामन्याआधी कांगारुच्या संघात तीन बदल

    टी-२० मालिकेतील निर्णायक सामन्याव्यतिरिक्त, ३ खेळाडूंनाही तितक्याच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये अष्टपैलू मिशेल ओवेन, वेगवान गोलंदाज लान्स मॉरिस आणि अष्टपैलू मॅट शॉर्ट यांचा समावेश आहे. डार्विनमध्ये, कागिसो रबाडाचा एक चेंडू मिशेल ओवेनच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर, त्याने कंकशन टेस्ट केली आणि तो पास झाला. आणखी एक चेंडू त्याच्या ग्रिलला लागला. नंतर, त्याच्यामध्ये कंकशनची काही लक्षणे दिसून आली. त्यामुळे, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक टी-२० सामन्यातून आणि त्यानंतर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याला किमान १२ दिवसांच्या अनिवार्य स्टँड-आउट कालावधीत राहावे लागेल, म्हणजेच तो एकदिवसीय पदार्पणाची संधी गमावेल.

  • 14 Aug 2025 10:35 AM (IST)

    14 Aug 2025 10:35 AM (IST)

    आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक

    भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत भारताचा स्टार गोलंदाज आकाश दीप आपल्या कामगिरीने सर्वांनां प्रभावित केले आहे. त्याचा हा इंग्लंडचा पहिला दौरा होता. आकाश दीपचेने याबाबत बोलताना म्हटले आहे की, प्रशिक्षकाने स्वतःपेक्षा त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला, कठीण काळात त्याला पाठिंबा देणारा कर्णधार आणि घरगुती वातावरण होते, परिस्थिती परदेशीपेक्षा घरगुती अधिक होती असे मत भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीपने व्यक्त केले.

  • 14 Aug 2025 10:25 AM (IST)

    14 Aug 2025 10:25 AM (IST)

    जमिनीच्या वादातून भररस्त्यात पती पत्नीची निर्घृण हत्या

    धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून पती- पत्नीची भर रस्त्यावर निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी गाडीला धडक दिली. नंतर पती पत्नी खाली पडताच कोयत्याने वार करत पती- पत्नीची हत्या केली. हा प्रकार धाराशिव तालुक्यातील करजखेडा पाटोदा चौकात बुधवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर दोन्ही संशयित आरोपी फरार असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

  • 14 Aug 2025 10:15 AM (IST)

    14 Aug 2025 10:15 AM (IST)

    ऋषभ पंतला राग का आला?

    ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली. त्याच्या पायाला दुखापत झाली आणि त्यामुळे तो सध्या खेळण्यापासून दूर आहे. तो डीपीएल २०२५ चा भाग असणार होता पण दुखापतीमुळे त्याला विश्रांती घ्यावी लागली आहे. आता ऋषभ पंतने सोशल मीडियावर त्याच्या दुखापतीबद्दल अपडेट दिली आणि आपला राग व्यक्त करताना तो म्हणाला की त्याला पायाला दुखापत होणे अजिबात आवडत नाही.

  • 14 Aug 2025 10:05 AM (IST)

    14 Aug 2025 10:05 AM (IST)

    एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale

    १५ ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस, याच दिवशी भारताची ब्रिटिश राजवटीतून मुक्तता झाली. हा दिवस देशभर मोठ्या जोशात साजरा केला जातो. यंदा भारताचा 79 स्वातंत्र्यदिन आणि यानिमित्तच एअर इंडिया एक्सप्रेस ने प्रवाशांसाठी खास फ्रीडम सेल ऑफर जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत तब्बल 50 लाख तिकिटांवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • 14 Aug 2025 09:54 AM (IST)

    14 Aug 2025 09:54 AM (IST)

    संजू सॅमसनला Asia Cup 2025 मध्ये स्थान मिळणार?

    भारत नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन परतला आहे. भारतीय कसोटी संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत युवा कर्मधार शुभमन गिलच्या भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. आता भारतीय संघ ९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आशिया कप २०२५ च्या तयारीला लागला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून २६ जुलै रोजी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. यूएईमध्ये ही स्पर्धा ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. अद्याप या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच त्याआधी टीम इंडियाचा माजी विकेटकीपर दीप दासगुप्ताकडून एकी विधान करण्यात आले आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाने भारताचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला आशिया कपमध्ये संधी नाकारली जाणार आहे.

  • 14 Aug 2025 09:16 AM (IST)

    14 Aug 2025 09:16 AM (IST)

    जमिनीच्या वादातून भररस्त्यात पती-पत्नीची निर्घृण हत्या

    धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून पती- पत्नीची भर रस्त्यावर निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी गाडीला धडक दिली. नंतर पती-पत्नी खाली पडताच कोयत्याने वार करत पती-पत्नीची हत्या केली. हा प्रकार धाराशिव तालुक्यातील करजखेडा पाटोदा चौकात बुधवारी सकाळी घडला. हत्येनंतर दोन्ही संशयित आरोपी फरार असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

  • 14 Aug 2025 09:14 AM (IST)

    14 Aug 2025 09:14 AM (IST)

    प्रशिक्षकाने स्वतःपेक्षा माझ्यावर जास्त विश्वास ठेवला : आकाश दीप

    भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत भारताचा स्टार गोलंदाज आकाश दीप आपल्या कामगिरीने सर्वांनां प्रभावित केले आहे. त्याचा हा इंग्लंडचा पहिला दौरा होता. आकाश दीपचेने याबाबत बोलताना म्हटले आहे की, प्रशिक्षकाने स्वतःपेक्षा त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला, कठीण काळात त्याला पाठिंबा देणारा कर्णधार आणि घरगुती वातावरण होते, परिस्थिती परदेशीपेक्षा घरगुती अधिक होती असे मत भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीपने व्यक्त केले. आकाशदीपने एका सामन्यात १० विकेट्स आणि दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे तो रात्रीचा स्टार बनला, परंतु ओव्हलमध्ये ६६ धावा काढल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याला जे सांगितले ते तो विसरू शकत नाही.

  • 14 Aug 2025 09:06 AM (IST)

    14 Aug 2025 09:06 AM (IST)

    सामंजस्य करारामुळे भारत-सिंगापूर यांच्यातील संबंधांना नवीन आयाम मिळेल : मुख्यमंत्री

    भारत आणि सिंगापूर यांच्यातील सागरी व्यापार, पायाभूत सुविधा, डिजिटायझेशन, डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील वाढते सहकार्य आणि अनेक सामंजस्य करारांमुळे आर्थिक बंध अधिक दृढ होत असून यामुळे विशेषतः महाराष्ट्र आणि सिंगापूरमधील संबंधांना नवीन आयाम मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच वाढवण बंदर विकासासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: Marathi breaking news live marathi news political update sport update live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • navarashtra news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live : अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; भारताची ताकद आणखी वाढणार
1

Top Marathi News Today Live : अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; भारताची ताकद आणखी वाढणार

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
2

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

World Hypertension Day: मुलांमध्ये वाढत्या उच्च रक्तदाबाचे संकट गंभीर
3

World Hypertension Day: मुलांमध्ये वाढत्या उच्च रक्तदाबाचे संकट गंभीर

Navarashtra Woman Awards : वर्षाराणी शिंदेंना नवभारत नवराष्ट्रचा आदर्श समाजसेविका पुरस्कार प्रदान
4

Navarashtra Woman Awards : वर्षाराणी शिंदेंना नवभारत नवराष्ट्रचा आदर्श समाजसेविका पुरस्कार प्रदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.