(फोटो सौजन्य: istock)
१५ ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस, याच दिवशी भारताची ब्रिटिश राजवटीतून मुक्तता झाली. हा दिवस देशभर मोठ्या जोशात साजरा केला जातो. यंदा भारताचा 79 स्वातंत्र्यदिन आणि यानिमित्तच एअर इंडिया एक्सप्रेस ने प्रवाशांसाठी खास फ्रीडम सेल ऑफर जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत तब्बल 50 लाख तिकिटांवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
देशांतर्गत उड्डाणे : भाडे केवळ ₹1,279 पासून सुरू
आंतरराष्ट्रीय उड्डाणे : ₹4,279 पासून उपलब्ध
ऑफरची सुरुवात : 10 ऑगस्ट 2025 पासून एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट व मोबाइल ॲपवर 11 ते 15 ऑगस्टदरम्यान ही ऑफर प्रमुख ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
बुकिंगची अंतिम तारीख : 15 ऑगस्ट 2025
प्रवास कालावधी : 19 ऑगस्ट 2025 ते 31 मार्च 2026
गॉरमैयर हॉट मील, केबिन बॅगेज, अतिरिक्त चेक-इन बॅगेज आणि एक्सप्रेस अहेड सेवांवर मेंबर्सना 20% पर्यंत सवलत दिली जाणार आहे.
किती जागा उपलब्ध आहेत?
सवलतीच्या दरात ५० लाख जागा उपलब्ध आहेत.
भाडं किती असेल?
देशांतर्गत भाडे १,२७९ रुपयांपासून सुरू होते आणि आंतरराष्ट्रीय भाडे ४,२७९ रुपयांपासून सुरू होते.