Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : आज 1 मे असून संपूर्ण राज्यभरामध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन करणाऱ्या मिरवणूका आणि प्रभात फेरी निघाल्या आहेत. त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी देखील सोशल मीडियावर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने मराठी लोकांनी अस्मितेसाठी दिलेल्या लढ्याची आणि प्राण गमावलेल्या वीरांना स्मरले जात आहे.
01 May 2025 05:10 PM (IST)
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात सायबर हल्ल्यात झपाट्याने वाढ, इकोज ऑफ पहलगाम नावाचा अहवाल तयार, महाराष्ट्र सायबर सेलचा अहवाल, 20 एप्रिलनंतर देशावर 10 लाख सायबर हल्ले
01 May 2025 04:40 PM (IST)
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकार देखील सतर्क झाले असून महत्वाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर येत आहे. पहलगाम हल्ल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
01 May 2025 04:21 PM (IST)
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचं भावनिक पत्र लिहिले आहे. त्यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
खडतर परिस्थितीतून, अमूल्य त्यागातून, अमर्यादित संघर्षातून हा दिवस आज आपल्याला पहायला मिळतोय. या गौरवशाली महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले पुरोगामी विचारांचे रोपटे देशासाठी नेहमीच दिशादर्शक राहिले आहे. मुंबई,… pic.twitter.com/IbnVXC1pFO
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 1, 2025
01 May 2025 03:45 PM (IST)
मुंबई पोलिस आयुक्तपद हे नेहमीच प्रतिष्ठेचे आणि जबाबदारीचे प्रतीक राहिले आहे. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पदभार स्वीकारला आहे.
01 May 2025 03:43 PM (IST)
"जातनिहाय जनगणना व्हावी ही बऱ्याच दिवसांची मागणी आहे. जनगणना व्हावीच कारण जनगणनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या अडचणीला सामोरे जावं लागतं. म्हणून जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो योग्यचं आहे," असे मत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले आहे.
01 May 2025 03:21 PM (IST)
काेट्यवधी रुपये खर्च करून महापािलकेच्या शाळांमध्ये ई लर्निंग यंत्रणा सुरु करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षापासून ई लर्निंग यंत्रणा बंद झाली आहे. इंटरनेट सुविधा नसल्यामुळे ही सुविधा बंद पडली आहे (वाचा सविस्तर)
01 May 2025 02:29 PM (IST)
भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रदिनानिमित्त कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहन केले.तसेच पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।महाराष्ट्रदिनानिमित्त कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहन केले. पोलिसांची मानवंदना स्वीकारली. पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिकांना… pic.twitter.com/zvdwKiLGbr
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) May 1, 2025
01 May 2025 02:12 PM (IST)
रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात थर्ड इअरमध्ये शिकणारा अनिकेत किसन भगत (वय 20) याचा मोरबे धरणात बुडून मृत्यू झाला. अनिकेत भगत हा सुकापूर, पनवेल येथील विद्यार्थी असून, बुधवारी परीक्षा संपल्यावर आणि एक मे पासून सुट्टी असल्याने मित्रांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरात आला.
01 May 2025 01:44 PM (IST)
कर्जत आणि लोणावळा या भागातील मध्य रेल्वेचे मार्गावर बोगदा काढण्याचा प्रस्ताव खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे प्रशासनाला सुचविला आहे. या प्रस्तावाला मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक यांच्याकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.दरम्यान,खासदार बारणे यांच्याकडून कर्जत,पनवेल आणि उरण तालुक्यातील रेल्वे प्रश्नांवर ही बैठक बोलाविली होती.
01 May 2025 01:31 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत वेव्हज परिषदेचे उद्घाटन झाले. भारताकडे हजारो वर्षांचा कथांचा खजिना आहे. लोककलेने इतिहास जिवंत ठेवलाय. भारताच्या कानाकोपऱ्यात अद्भूत टॅलेंट आहे. भारतीय सिनेमा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला. भारतीय कॉन्टेन्टची जगाला भुरळ पडली आहे. भारतीय संगीतही जगाची लवकरच ओळख बनेल. भारतात ऑरेंज इकॉनॉमीची सुरूवात होतेय.
01 May 2025 01:16 PM (IST)
केंद्रात सरकार मोदींचं अन् सिस्टिम राहुल गांधींची चालली आहे. राहुल गांधींच्या भूमिकेपुढे सरकारला गुडघे टेकावे लागले. जातीय जनगणनेचा विषय राहुल गांधी यांनी उचलला. तो पर्यंत या देशातील जनतेला माहितही नव्हतं. विरोध भाजपचा होता. कॅबिनेटच्या निर्णयाच स्वागत करतो, राहुल गांधी यांचं अभिनंदन करतो” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
01 May 2025 01:14 PM (IST)
महाराष्ट्र किती कमजोर झाला, त्याची श्वेतपत्रिका काढा. 106 हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याचा तुमचा अधिकार नाही, लायकी शब्द वापरणार नाही. 106 हुतात्म्यांच्या स्वप्नांना संपवून टाकलं. व्यापाऱ्यांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण केला” अशा गंभीर शब्दांत खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
01 May 2025 01:08 PM (IST)
मुंबई इंडियन्स संघाला मोठा झटका बसला आहे. २४ वर्षीय डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूर दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी मुंबईने आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामासाठी लेग-स्पिनर रघु शर्माला संघात सामील केले आहे.
01 May 2025 12:41 PM (IST)
महायुती सरकारने विकासकामे, योजना आणि प्रक्लप पूर्ण करण्याचा मानस हाती घेण्यात आला होता. यामध्ये आता 100 दिवसांचा निकाल हाती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन या निकाल जाहीर केला आहे.
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर… pic.twitter.com/svAqMiLPok
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2025
01 May 2025 12:16 PM (IST)
महाराष्ट्रामध्ये पाणी, ट्रॅफिक, लोकलची गर्दी या समस्या परप्रांतीयांमुळेच झाली आहे असे विधान राजू पाटील यांंनी केले आहे.
01 May 2025 11:45 AM (IST)
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
स्मरण हुतात्म्यांचे
औचित्य महाराष्ट्र दिनाचे...🚩मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.… pic.twitter.com/623cYtDkXw
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 1, 2025
01 May 2025 11:31 AM (IST)
तुमच्या पतीचा खून झाला आहे. तसेच तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे, असे सांगून एका महिलेकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही घटना 16 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील जाधववाडी, नवलाख उंबरे येथे घडली.
01 May 2025 11:11 AM (IST)
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये खास शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी…
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2025
01 May 2025 11:09 AM (IST)
सांस्कृतिक पुनःजागरणाची पुण्यभूमी महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.स्वधर्माच्या रक्षणाचा संकल्प असो, लोककला असो, शेती संस्कृतीचा विकास असो किंवा देशाची आर्थिक समृद्धी असो, महाराष्ट्राने देशाच्या इतिहासात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सांस्कृतिक पुनःजागरणाची पुण्यभूमी महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्वधर्माच्या रक्षणाचा संकल्प असो, लोककला असो, शेती संस्कृतीचा विकास असो किंवा देशाची आर्थिक समृद्धी असो, महाराष्ट्राने देशाच्या इतिहासात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातील माझ्या…
— Amit Shah (@AmitShah) May 1, 2025