Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: तरूणीवरील अत्याचार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

Marathi breaking live marathi headlines update Date 26 February : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 26, 2025 | 10:01 PM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अद्याप वातावरण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. दोन महिन्यांनंतरही सर्व आरोपींना अटक न करण्यात आल्यामुळे देशमुख कुटुंबिय आक्रमक झाले होते. मस्साजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन देखील सुरु केले आहे. दरम्यान, देशमुख कुटुंबियांची मोठी मागणी मान्य करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाळासाहेब  कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची देशमुख कुटुंबियांची मागणी होती. त्यानंतर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

The liveblog has ended.
  • 26 Feb 2025 10:00 PM (IST)

    26 Feb 2025 10:00 PM (IST)

    तरूणीवरील अत्याचार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

    सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

    अतिशय संतापजनक! स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे.

  • 26 Feb 2025 09:41 PM (IST)

    26 Feb 2025 09:41 PM (IST)

    पुण्यातील अत्याचार प्रकरणावरून सरकार ॲक्शन मोडमध्ये

    पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. स्वारगेट बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. नराधम फरार असून पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर आहेत. आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्याच मंत्रालयात महत्वाची बैठक बोलावली आहे.

  • 26 Feb 2025 08:29 PM (IST)

    26 Feb 2025 08:29 PM (IST)

    संतोष देशमुख खटल्यात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर जितेंद्र आव्हाडांचा संशय

    बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली. यावरून विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच, माझ्या कर्तव्यात कोणीही अडथळा ठरू शकत नाही, असे ठणकावून सांगत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या नियुक्तीवर महायुती सरकारच्या धुर्तपणावर खोचक प्रतिक्रिया दिली.

  • 26 Feb 2025 07:42 PM (IST)

    26 Feb 2025 07:42 PM (IST)

    भारताच्या राष्ट्रपतींच्या समोर दसपटीच्या सुपुत्राने दिला कोकणाचा परिचय

    चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील कळकवणे गावचे सुपुत्र भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (IA&AS) ही भारतीय संघाची एक औपचारिक नागरी सेवा आहे. ही सेवा संघाच्या मध्यम आणि उच्चस्तरीय व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते. या सेवेचे समर्थ अविनाशराव शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर राष्ट्रपती भवनमध्ये कोकणाचा परिचय करून देताना उत्तम सादरीकरणाने कोकणासह रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावली आहे.

  • 26 Feb 2025 07:19 PM (IST)

    26 Feb 2025 07:19 PM (IST)

    महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करा, प्रताप सरनाईक यांचे निर्देश

    पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. .या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख ( सहाय्यक वाहतूक अधिक्षक) व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे. असे निर्देश उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी विवेक भीमनराव यांना दिले आहेत.

  • 26 Feb 2025 06:49 PM (IST)

    26 Feb 2025 06:49 PM (IST)

    अपक्ष आमदार शरद सोनवणे करणार शिंदे गटात प्रवेश

    जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शरद सोनवणे हे जुन्नरचे अपक्ष आमदार आहेत. ते 28 फेब्रुवारी रोजी नारायणगाव येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. जुन्नरमध्ये त्यांनी अजित पवार यांचे उमेदवार अतुल बेनके यांना जोरदार टक्कर देत त्यांचा पराभव केला होता.

  • 26 Feb 2025 06:11 PM (IST)

    26 Feb 2025 06:11 PM (IST)

    शिखर शिंगणापुरात 'हर हर महादेव'चा जयघोष

    संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या माण तालुक्यातील  शिखर शिंगणापूरच्या महादेव डोंगरावर आज हर हर महादेवचा जयघोष झाला,अन संपुर्ण महादेव डोंगर या जयघोषाने दुमदुमला .आज महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक आले त्यांनी शिव पार्वतीचे मनोभावें  दर्शन घेतले.

  • 26 Feb 2025 05:45 PM (IST)

    26 Feb 2025 05:45 PM (IST)

    एकनाथ शिंदेंनी घेतले भराडी देवीचे दर्शन

  • 26 Feb 2025 05:01 PM (IST)

    26 Feb 2025 05:01 PM (IST)

    वसंत मोरेंकडून स्वारगेट एसटी बस स्थानकात तोडफोड

    स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एसटी स्थानकात सुरक्षा व्यवस्था काही कामाची नसल्याचा संताप व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंत मोरे यांनी स्थानकातील सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली.

  • 26 Feb 2025 04:48 PM (IST)

    26 Feb 2025 04:48 PM (IST)

    मुंबईत आता कचरा उचलण्यासाठी मोजावे लागणार पैसे

    मुंबई शहरातील कचरा संकलन आणि वाहतूक करण्याच्या सेवांसाठी हे शुल्क आकारले जाते. शहरातील कचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) त्यांच्या प्रणालीचे अपग्रेड करण्यासाठी 687 कोटी रुपये गुंतवण्याची योजना आखत आहे.

  • 26 Feb 2025 04:27 PM (IST)

    26 Feb 2025 04:27 PM (IST)

    रांजणगावात युवकाची निर्जनस्थळी नेऊन लूट

    रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील गणपती मंदिराच्या पार्किंगजवळ केवल इंगोले हा तरुण उभा असताना त्याला निर्जनस्थळी नेऊन लुटले. त्यामध्ये त्याचा मोबाईल व दुचाकी जबरदस्तीने काढून घेऊन पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर दुचाकी परत दिल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे टिन्या शेळके, तुषार अहिरे, अक्षय जाधव व साकिब शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 26 Feb 2025 04:07 PM (IST)

    26 Feb 2025 04:07 PM (IST)

    सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

    माझी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, यासाठी मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते, हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले की, सदर खटला चालविण्यासाठी मी तयार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तसे आदेश दिले आहेत. या खटल्यात पोलिसांनी आरोपपत्र दाखल करताच आम्ही तातडीने हा खटला चालिवण्यास घेऊ”, अशी प्रतिक्रिया वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

  • 26 Feb 2025 03:36 PM (IST)

    26 Feb 2025 03:36 PM (IST)

    त्र्यंबकेश्वर मंदिरातील वादानंतर प्राजक्ता माळीची माघार

    महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या वतीने मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्याही ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याला माजी विश्वस्तांनी नकार दिल्यामुळे हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला. मात्र आता प्राजक्ता माळी हिने कार्यक्रमातून माघार घेतली आहे. वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये ही बाब मला महत्त्वाची वाटते म्हणून माघार घेत असल्याचे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सांगितले.

  • 26 Feb 2025 03:20 PM (IST)

    26 Feb 2025 03:20 PM (IST)

    खुशबू ठाकरेचा मृत्यू आरोग्यमंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे, नंदा म्हात्रे यांचा आरोप

    पेण येथील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेल्या नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू शासनाच्या बेजबाबदार पणामुळे झाला असल्याचा आरोप पेण तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यक्रर्त्या नंदा म्हात्रे यांनी केला आहे. राजीव गांधी पंचायतराज संघटन यांच्या माध्यमातून खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. दरम्यान,या प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांनी मागील एका महिन्यात कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय घेतले नाहीत आणि त्यामुळे सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आमचा जाहीर आरोप आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी आम्ही आग्रही मागणी केली असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी केली आहे.

  • 26 Feb 2025 03:19 PM (IST)

    26 Feb 2025 03:19 PM (IST)

    उल्हासनगरात बालविवाह रोखण्यात पोलीस प्रशासनाला यश

    शहरात आता देखील बाल विवाह होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर कॅम्प पाच परिसरातील हा बालविवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ऐन लग्नाच्या दिवशी भर मंडपात जेव्हा पोलीस आणि महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची एन्ट्री झाली तेव्हा पाहुणे मंडळींमध्ये एकच खळबळ उडाली. महिला व बाल विकास विभागाला पोलिसांच्या मदतीने हा बालविवाह रोखण्यात यश आले असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात बाल विवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प पाच येथील एका हॉलमध्ये १६ वार्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची गुप्त माहिती महिला व बाल विकास विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांसह अधिकाऱ्यांनी लग्न होत असलेल्या हॉलमध्ये धडक दिली. यावेळी कागदपत्रांची पडताळणी केली असता १६ वर्ष तीन महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीचे आईवडील आणि नवरदेव मुलाच्या आई-वडीलांसह इतर पाच अशा एकूण १० जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.

  • 26 Feb 2025 03:19 PM (IST)

    26 Feb 2025 03:19 PM (IST)

    नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडुन १० कोटींचे अमली पदार्थ जप्त

    पनवेल ग्रामीण ( वा ) नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सन २०२४ मध्ये ३९ गुन्हयातील एकण १ कोटी ६१ लाख रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते. नशा मुक्त नवी मुंबई अभियान कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आज (२६ फेब्रुवारी) नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण ४० गुन्हयातील जप्त करण्यात आले असून १० कोटी रुपयांचे अमली पदार्थ राज्याचे वनमंत्री गणेश नाईक याच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शासन मान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी (तळोजा) या ठिकाणी नष्ट करण्यात आला.

  • 26 Feb 2025 03:19 PM (IST)

    26 Feb 2025 03:19 PM (IST)

    अरविंद केजरीवाल खासदार होणार?

    आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खासदार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पंजाबमधून राज्यसभेचे खासदार असलेल्या संजीव अरोरा यांना लुधियाना पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उतरवण्यात आले आहे. त्यानंतर केजरीवाल खासदार होऊ शकतात अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

  • 26 Feb 2025 03:05 PM (IST)

    26 Feb 2025 03:05 PM (IST)

    नागपूरमध्ये वृद्धाची निर्घृणपणे हत्या

    नागपूरमध्ये भरदिवसा घरात घुसून एका वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना कोराडी पोलिस ठाण्यांतर्गत मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. प्राथमिक तपासात ही हत्या चोरी किंवा लुटीच्या उद्देशाने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

  • 26 Feb 2025 02:42 PM (IST)

    26 Feb 2025 02:42 PM (IST)

    इन्फोसिसने जाहीर केली ५-८ टक्के पगारवाढ

  • 26 Feb 2025 01:56 PM (IST)

    26 Feb 2025 01:56 PM (IST)

    महाकुंभममध्ये महाशिवरात्रीचे अंतिम अमृत स्नान

    मागील दीड महिन्यापासून उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी भक्तांनी आणि नागा साधूंनी अमृतस्नान केले. आज महाशिवरात्रीचे शेवटचे अमृत पवित्र स्नान असून आज देखील कोट्यवधी भाविक गंगेमध्ये डुंबकी मारण्यासाठी येत आहेत. यासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.

  • 26 Feb 2025 01:36 PM (IST)

    26 Feb 2025 01:36 PM (IST)

    कात्रज चौकातील वाहतूकीचा प्रश्न निर्माण; 40 गुंठा जागेचे भूसंपादन

    कात्रज चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. या वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण झाले आहेत. पण कात्रज चौकातून कोंढवाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरूंद आहे. या अरूंद रस्त्याचे रूंदीकरण करणे गरजचे आहे. याबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने ही जागा ताब्यात घेण्याबाबत पालिकेला पत्र पाठविले आहे. ही जागा ताब्यात आल्यानंतर उड्डाणपुलाचे कामही मार्गी लागणार आहे. शहरातील बहुचचित कात्रज चौकातील संजय गुगळे यांच्या मालकीची ४० गुंठासाठी जागेचे भूसंपादन करण्यात आले. त्यामुळे तब्बल २८ वर्षापासून प्रलंबित असलेल्या या जागेचे भूसंपादन झाले आहे. त्यामुळे कात्रज चौकातील वाहतुक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

  • 26 Feb 2025 12:49 PM (IST)

    26 Feb 2025 12:49 PM (IST)

    स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार

    पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. स्वारगेट बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. नराधम फरार असून पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर आहेत.

  • 26 Feb 2025 12:25 PM (IST)

    26 Feb 2025 12:25 PM (IST)

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची ठाकरे गटाची मागणी

    आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी ही मागणी केली आहे.

  • 26 Feb 2025 12:11 PM (IST)

    26 Feb 2025 12:11 PM (IST)

    यापुढे दहावीची बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा होणार

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित करण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला आहे. वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याची पद्धत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होण्याची शक्यता आहे. मसुद्यानुसार, पहिली बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये आणि दुसरी मेमध्ये होईल. हा मसुदा सार्वजनिक केला जाईल आणि सर्व भागधारक ९ मार्चपर्यंत त्यांचे अभिप्राय देऊ शकतात, त्यानंतर धोरणावर अंतिम शिक्कोमोर्तब होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

  • 26 Feb 2025 11:54 AM (IST)

    26 Feb 2025 11:54 AM (IST)

    ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा महायुतीवर परिणाम होणार नाही

    राज ठाकरेंच्या एवढ्या मोठ्या सभा होऊनही त्यांचा एकही माणूस निवडून येत नाही. लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाल्याचे मला दिसत नाही. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असे वाटत नाही आणि जरी एकत्र आले तरी महायुतीवर त्याचा परिणाम होणार नाही’ असे मत  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

  • 26 Feb 2025 11:28 AM (IST)

    26 Feb 2025 11:28 AM (IST)

    आसणीतील तोडलेले वृक्ष व्यापारी हलवण्याच्या तयारीत

    जावळी तालुक्यातील आसनी येथे भोगवटादार वर्ग दोन जमिनीमध्ये नियमबाह्यपणे गवडी बीडचे वनपाल यांच्या वरदहस्ताने वृक्षतोड करण्यात आली आहे .प्रत्यक्षात परवानगी एका गट नंबरची घेऊन वृक्षतोड दुसऱ्याच गट नंबर मध्ये येथे झालेली पाहायला मिळत आहे. उपवनसंरक्षक यांनी तालुक्यातील वृक्षतोडीचे प्रत्यक्षस्थळी जाऊन पंचनामा करावा व रिपोर्ट कळवावा असे आदेश दिले आहेत.मात्र जावळी वन विभागाकडून पंचनामा करण्यास विलंब केला जात आहे.

  • 26 Feb 2025 11:10 AM (IST)

    26 Feb 2025 11:10 AM (IST)

    संतोष देशमुख हत्येचा तपास उज्जल निकम करणार

    बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला जवळपास दीड महिना उलटला आहे. या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच, यासाठी सरकारकडून उज्जल निकम यांची नेमणूक करण्यात आली.

  • 26 Feb 2025 11:00 AM (IST)

    26 Feb 2025 11:00 AM (IST)

    बारामती व परळी जिल्ह्यात दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. दरम्यान, अजित पवार यांनी त्यांच्या जिल्ह्यांमध्ये नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये उभारले जाणार असल्याचे घोषित केले आहे.  बारामती व परळी जिल्ह्यात दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये होणार असून यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे.

  • 26 Feb 2025 10:57 AM (IST)

    26 Feb 2025 10:57 AM (IST)

    राज्यभरामध्ये महाशिवरात्रीचा खास उत्साह

    सर्व शिवभक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये महाशिवरात्री साजरी केली जात आहे. भीमाशंकर मंदिर आणि नाशिकमधील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शनासाठी मंदिरं 48 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates add main events date 26 february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 10:44 AM

Topics:  

  • Latest Marathi News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

असं काय घडलं की ठाण्यात गोपीचंद पडळकरांची प्रतिमा जाळली?
1

असं काय घडलं की ठाण्यात गोपीचंद पडळकरांची प्रतिमा जाळली?

Raigad News : मराठीचा झेंडा अटकेपार; World Food India Expo 2025 साठी सुधागडच्या प्रकल्पाची निवड
2

Raigad News : मराठीचा झेंडा अटकेपार; World Food India Expo 2025 साठी सुधागडच्या प्रकल्पाची निवड

पुण्यातील गुन्हेगारीवर नेत्यांची चुप्पी..! एक केंद्रीयमंत्री, कॅबिनेटमंत्री अनेक आमदार असूनही शांतच
3

पुण्यातील गुन्हेगारीवर नेत्यांची चुप्पी..! एक केंद्रीयमंत्री, कॅबिनेटमंत्री अनेक आमदार असूनही शांतच

शिरोळ तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार
4

शिरोळ तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.