
99th Akhil Bhartiy marathi Sahitya Sanmelan: स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साताऱ्यात आज साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाचा सोहळा पार पडल्यावर मंडप क्रमांक १ मध्ये कवीसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी भूषविले. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन पार पडले. यावेळी वेगवेगळ्या विषयांवर कविता सादर करण्यात आल्या.
‘Battle Of Galwan’चे फुटेज लीक? बर्फावर जखमी अवस्थेत रांगताना दिसला सलमान खान
या कार्यक्रमात सुनील उबाळे, डॉ. रमेश रावळकर, डी. के. शेख, संगीता माने, अनिता येलमटे, गौतम सूर्यवंशी, आदित्य दवणे, ज्योती कपिले, दीपाली वझे, कमलाकर राऊत, मनोज वराडे, प्रदीप देशमुख, चुडामण बल्हारपुरे, प्रशांत पनवेलकर, सुनील यावलीकर, डॉ. विजय काळे, विवेक सावरीकर, कविता अमोणकर, त्रिवेणी शिर्के, कावेरी दाभडकर, संदीप देशमुख, ज्योती कुलकर्णी, डॉ. कांता नलावडे, किरण येले, लक्ष्मीकांत रांजणे, सागर काकडे, विलास पिसाळ, सुनील जवंजाळ, सविता पोतदार, अरुण बोऱ्हाडे, प्रभाकर शेळके, कैलास गांधी यांनी आपल्या कविता सादर केल्या. अखिल भारतीय साहित्य संमेलनात झालेल्या या कवीसंमेलनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते जेष्ठ कवी अशोक नायगावकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कांबळे यांनी केले.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या प्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रख्यात लेखिका डॉ. मृदुला गर्ग, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ज्येष्ठ उद्योजक फरोक कुपर, साहित्य महामंडळाचे प्रमुख विश्वस्त प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरैय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते तसेच महामंडळाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये मनोगत व्यक्त करताना महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने प्रा. मिलिंद जोशी यांनी माय मराठीची अवहेलना होत असताना अन्य भाषांचे कोडकौतुक नको, भाषेला विरोध नाही परंतु सक्तीला विरोध आहे, अशी भूमिका मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मुद्दयांचा परामर्श घेताना महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच राहिल असे स्पष्ट केले.
फडणवीस पुढे म्हणाले, मराठी भाषा वगळता अन्य कुठल्याही भाषेची सक्ती नाही. त्रिभाषा सूत्रानुसार आणखी कोणती भाषा समाविष्ट करावी याविषयी विचार सुरू आहे. कोणत्या वर्गापासून भाषा शिकवायची याचा विचार करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली असून या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. मराठी भाषा ही अभिजात होतीच तिला राजमान्यता देण्याचे काम केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केले आहे. त्याचा उपयोग करून आता या भाषेला संपूर्ण भारतात लोकमान्यता मिळवून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही ते म्हणाले.