Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या, हरयाणा कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

Marathi breaking live marathi प्रयागराजमध्ये गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आता परिस्थिती सामान्य आहे. चेंगराचेंगरीनंतर बंद केलेले बॅरिकेड्स उघडण्यात आले आहेत.

  • By अनुराधा धावड़े, तेजस भागवत, श्वेता झगडे
Updated On: Feb 22, 2025 | 11:32 AM
Top Marathi News Today Live: यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या, हरयाणा कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates: उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी सध्या महाकुंभ मेळा सुरू आहे. यामध्ये कोट्यवधी भाविकांची उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दर्शनासाठी, पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी कमी होत नसल्याचे दिसत आहे. देश-विदेशातील नागरिकांसह भारतातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविक प्रयागराज येथे उपस्थित आहेत. असे असतानाच या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती दिली जात आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून, जखमींची संख्याही जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

The liveblog has ended.
  • 29 Jan 2025 09:59 PM (IST)

    29 Jan 2025 09:59 PM (IST)

    Arvind Kejriwal: यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या, हरयाणा कोर्टाने दिले 'हे' निर्देश

    दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मात्र माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होताना पहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. हरियाणा सरकारने केजरीवालांविरोधात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात सोनीपत कोर्टाने केजरीवाल यांना नोटिस धाडली आहे.

  • 29 Jan 2025 09:07 PM (IST)

    29 Jan 2025 09:07 PM (IST)

    मुंबईकरांना मिळणार वाहतुकीचा नवा पर्याय; 2028 पर्यंत पॉड टॅक्सीची सेवा सुरु करण्याचा मानस, परिवहन मंत्र्यांची माहिती

    मुंबईतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, याचा परिणाम वाहतुकीवर होतो आहे. दररोज लाखो लोक कामासाठी बाहेर पडतात, ज्यामुळे रस्त्यांवर वाहतूककोंडी निर्माण होते. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत मेट्रोचे जाळे पसरवले जात आहे. मेट्रो प्रकल्पामुळे लोकांना अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या मेट्रो मार्गांमुळे रस्त्यांवरील गाड्यांची संख्या कमी होईल आणि वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. पण आता याव्यतिरिक्त मुंबईत पॉड टॅक्सी सुरु करण्यास देखील सरकार सकारत्मक दिसत आहे. नुकतीच याबाबत बैठक सुद्धा घेण्यात आली आहे.

  • 29 Jan 2025 08:40 PM (IST)

    29 Jan 2025 08:40 PM (IST)

    MHADA News: "म्हाडाच्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख..."; DCM एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन

    सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

  • 29 Jan 2025 08:01 PM (IST)

    29 Jan 2025 08:01 PM (IST)

    अमेरिका खरंच भारताला फक्त शस्त्रे विकू इच्छितो, की डोनाल्ड ट्रम्प यांच्या हृदयात दडलाय ‘चोर’?

    डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी(दि. 27 जानेवारी 2025) रात्री उशिरा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यादरम्यान त्यांनी भारतावर अधिकाधिक अमेरिकन शस्त्रे खरेदी करण्यासाठी दबाव आणला. डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि अमेरिका यांच्यात संतुलित व्यापार संबंध हवे आहेत. भारताने जास्तीत जास्त अमेरिकन शस्त्रास्त्रे खरेदी करावीत, अशी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकन शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी दबाव टाकल्याचे वृत्त आहे. परदेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध संतुलित ठेवण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प भारताला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे का विकू इच्छितात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  • 29 Jan 2025 07:37 PM (IST)

    29 Jan 2025 07:37 PM (IST)

    Jaykumar Gore: "...यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आग्रही आहेत"; मंत्री जयकुमार गोरेंच्या सूचना

    प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने यंत्रणेने काम करावे, यामध्ये जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या. मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाशी संबंधित कोकण विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, यांच्यासह कोकण विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  • 29 Jan 2025 07:26 PM (IST)

    29 Jan 2025 07:26 PM (IST)

    Mumbai Bike Taxis: महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईत परिवहन विभागाची बाईक टॅक्सीला परवानगी

    मुंबईमध्ये दररोज दिसणारी तुफान गर्दी पाहता परिवहन विभागाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मुंबईकरांचा प्रवासही जलद आणि स्वस्तात मस्त होणार आहे. यासाठी परिवहन विभागाने ओला आणि उबर नंतर आता बाईक टॅक्सी सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकून पडण्यावर हा उत्तम पर्याय मुंबईकरांसाठी उपलब्ध झाला आहे. वाहतूक सेवा वाढविण्यासाठी परिवहन विभागाने बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासासाठी ही सुविधा दोन महिन्यांत सुरू केली जाईल. पण जर मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाला तर ठाणे आणि इतर महानगरांमध्ये ही सुविधा सुरू होई शकते,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • 29 Jan 2025 07:00 PM (IST)

    29 Jan 2025 07:00 PM (IST)

    अमेरिकेच्या न्याय विभागात गोंधळ; डोनाल्ड ट्रम्पविरोधात आवाज उठवणाऱ्यांची बोलती बंद

    राष्ट्राध्यक्षपदाची  शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत आहेत. सध्या त्यांच्या आणखी एका निर्णयाने अमेरिकेच्या न्याय विभागात मोठी उलथापालथ सुरु आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात खटले चालवणाऱ्या 12 हून अधिक लोकांना अचानक नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. यामुळे न्याय विभागात अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. फक्त न्याय विभागच नाही तर इतर विभागातील लोकांवर देखील कारवाई सुरु आहे.

  • 29 Jan 2025 06:35 PM (IST)

    29 Jan 2025 06:35 PM (IST)

    ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल अडचणीत; हरियाणा सरकार खटला दाखल करणार, मोठं कारण आलं समोर

    दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना यमुनेच्या पाण्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल ऐन निवडणुकीत अडचणीत आले आहेत. प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. हरियाणा सरकारने केजरीवालांविरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 29 Jan 2025 06:19 PM (IST)

    29 Jan 2025 06:19 PM (IST)

    काँगोच्या गोमा शहरावर बंडखोरांचा कब्जा; प्रचंड गोळीबारात भारताचे ८० शांती सैनिक अडकले

    काँगोच्या गोमा शहरावर बंडखोरांनी कब्जा केला असून प्रचंड गोळीबार सुरु आहे. यात संयुक्त राष्ट्रांच्या मदतीला गेलेले भारतीय सैन्याचे मेडिकल कोअरचे ८० सैनिक आणि अधिकारी अडकले आहेत. या बंडखोरांनी शांती सेनेच्या थ्री फिल्ड हॉस्पिटलच्या परिसरालाही घेरल्याचे सांगितले जात आहे. यामुळे या जवानांचा जीव धोक्यात आला आहे.

  • 29 Jan 2025 05:53 PM (IST)

    29 Jan 2025 05:53 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्याचा दौरा करणार

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच फेब्रुवारी बीड जिल्ह्याच्या दौरा करणार आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील कुंटेफळ तलावाच्या कामाच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

  • 29 Jan 2025 05:26 PM (IST)

    29 Jan 2025 05:26 PM (IST)

    उच्च न्यायालयात नव्याने होणार मराठा आरक्षणाची सुनावणी

    उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुनावणी सुरू होती. मात्र, याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी पूर्णपीठ स्थापन करून सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती केली आहे. ही मागणी मान्य केली असून मराठा आरक्षणाच्या आता पहिल्यापासून पूर्णपीठा पुढे सुनावणी होणार आहे.

  • 29 Jan 2025 05:26 PM (IST)

    29 Jan 2025 05:26 PM (IST)

    जालन्यात मराठा समाजाचा रास्तारोको

     

    मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मराठा समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्गावर मराठा समाजाचा रास्तारोको, रास्तारोको करण्यात महिलांचा मोठा सहभाग

  • 29 Jan 2025 03:54 PM (IST)

    29 Jan 2025 03:54 PM (IST)

    'फडणवीस अन् अजितदादांनी राजीनामा मागितल्यास लगेच देईल'

    'मी नैतिकदृष्ट्या दोषी असल्याचे मला वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोषी वाटत असेल, तर त्यांनी राजीनामा मागावा. तर मी लगेच देईल', अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

  • 29 Jan 2025 03:14 PM (IST)

    29 Jan 2025 03:14 PM (IST)

    धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर

    वाल्मिक कराड प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढतच चालला आहे. दरम्यान त्यांनी, पक्ष आणि अजित दादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन अशी भूमिका घेतली आहे. तर अजित पवार हेच माझ्या विषयी काय करायचे ते ठरवतील असेही मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान ते दिल्ली दौऱ्यावर आहेत.

  • 29 Jan 2025 02:33 PM (IST)

    29 Jan 2025 02:33 PM (IST)

    जेपीसीने वक्फ बोर्डाला दिला हिरवा कंदील, विधेयक उद्या सभापतींना सादर होणार!

    वक्फ बोर्ड विधेयकाबाबत जोरदार राडा झाला असून काही विरोधक खासदारांचे निलंबन झाले होते. यानंतर आता वक्फ बोर्ड विधेयकाबाबतचा अहवालाचा मसुदा आणि सुधारित विधेयक जेपीसीच्या बैठक स्वीकारण्यात आले आहे. तर हे विधेयक उद्या सभापतींना सादर केले जाणार असून यावरून जेपीसी सदस्यांमध्ये मतदान झाले. अहवालाच्या बाजूने 16 आणि विरोधात 11 मते पडली.

  • 29 Jan 2025 01:11 PM (IST)

    29 Jan 2025 01:11 PM (IST)

    आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

    विधानसभा निवडणुकीत भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला जात आहे. त्यांच्याविरोधात भाजपाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती, ज्याला मोहिते पाटील यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तरात त्यांनी पक्षविरोधी कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे सांगितले आहे. तथापि, पक्षाकडून सबळ पुराव्याच्या आधारे त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

  • 29 Jan 2025 12:34 PM (IST)

    29 Jan 2025 12:34 PM (IST)

    एका वर्षात भाजपला 3,967.14 कोटी रुपयांच्या देणग्या

    लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या देणग्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 87% वाढ झाल्याचे समोर आले आहे. भाजपला मिळालेली देणगी 3,967.14 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, ज्यामध्ये निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेली देणगी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. या आकडेवारीचा खुलासा भाजपच्या 2023-24 च्या ऑडिट रिपोर्टमधून झाला आहे.

  • 29 Jan 2025 12:09 PM (IST)

    29 Jan 2025 12:09 PM (IST)

    नांदेड सिटीत केंद्राच्या पथकाला स्थानिकांनी अडवलं

    पुण्यातील  नांदेड परिसरातील दूषित विहिरीची पाहणी कऱण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकाला स्थानिक नागरिकांनी अडवल्याची माहिती समोर आली आहे.  केंद्राच्या पथकाने या विहीरीची पाहणी केलीच नाही, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

  • 29 Jan 2025 11:22 AM (IST)

    29 Jan 2025 11:22 AM (IST)

    सांगलीतही गुइलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव

    पुणे, सोलापूर पाठोपाठ आता   सांगलीतही गुइलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव झाला असून, सांगलीत तीन रुग्ण आढळले आहेत. या तिन्ही रुग्णांवर सध्या खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गुइलेन बॅरी सिंड्रोम एक दुर्लभ, पण गंभीर विकार आहे, जो शरीरातील नर्व्हस सिस्टीमवर परिणाम करतो, आणि या प्रकारच्या रुग्णांची काळजी घेतली जात आहे.

  • 29 Jan 2025 11:19 AM (IST)

    29 Jan 2025 11:19 AM (IST)

    पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार; PMPMLच्या तिकीटाचे दर वाढणार

    पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एसटीच्या तिकीट दरवाढीच्या नंतर, आता पुण्यातील पीएमपीएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) च्या तिकीट दरवाढीची घोषणा करण्यात आली आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे, वाहनांच्या सुट्या भागांच्या किंमतीत झालेली वाढ आणि कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमुळे पीएमपीएलची संचलन तूट २०१६-१७ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये तब्बल ४९६.४४ कोटी रुपये वाढली आहे. यामुळे पीएमपीएलने तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पुणेकरांना अधिक खर्च येण्याची शक्यता आहे.

  • 29 Jan 2025 10:21 AM (IST)

    29 Jan 2025 10:21 AM (IST)

    धनंजय मुंडे राजीनामा देणार?

    वाल्मिक कराड (Walmik Karad) प्रकरणामुळे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर राजीनामा देण्याबाबत दबाब वाढत आहे. या संदर्भात, धनंजय मुंडे दिल्लीमध्ये आहेत आणि ते केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिल्ली दौरा करत आहेत. आज (29 जानेवारी) दुपारी 12 वाजता धनंजय मुंडे आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांच्यात बैठक होणार आहे

  • 29 Jan 2025 09:41 AM (IST)

    29 Jan 2025 09:41 AM (IST)

    बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दिकींचे गंभीर आरोप

    माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पुत्र, माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी आपल्या जबाबात 10  बिल्डर्स, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब, आणि भाजप नेते मोहित कंबोज यांची नावे घेतली आहेत. झिशान सिद्दिकी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांनी हत्येच्या दिवशी लिहिलेल्या डायरीत मोहित कंबोज यांचे नाव आढळले आहे. त्यामुळे, या सर्व संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी झिशान सिद्दिकी यांनी केली आहे.

  • 29 Jan 2025 08:59 AM (IST)

    29 Jan 2025 08:59 AM (IST)

    इस्रोने इतिहास रचला, अंतराळातील १०० वे अभियान यशस्वी

    भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून सकाळी ६.२३ वाजता NVS-०२ वाहून नेणारे GSLV-F१५ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. देशाच्या अंतराळ केंद्रातून इस्रोचे हे १०० वे प्रक्षेपण आहे. इस्रोचे हे अभियान यशस्वी झाले आहे. या मोहिमेबाबत इस्रोने म्हटले आहे की हे अभियान यशस्वी झाले आहे. भारताने अंतराळ नेव्हिगेशनमध्ये नवीन उंची गाठली आहे.

  • 29 Jan 2025 08:58 AM (IST)

    29 Jan 2025 08:58 AM (IST)

    पाकिस्तानचे कारनामे थांबेनात

    पाकव्याप्त कश्मीरमधील जंगलांमध्ये लागलेल्या आगीने भारतीय हद्दीतील जंगलांनाही वेढले आहे. याद्वारे मेंढरच्या बालाकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर शत्रूची घुसखोरी रोखण्यासाठी लावलेल्या भूसुरुंगांचा स्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. नियंत्रण रेषेच्या आजूबाजूला सुमारे दीड ते दोन किलोमीटर परिसरात भूसुरुंग असल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचण येत आहे. पाकिस्तानव्याप्त प्रदेशातून आग पसरून ती भारतीय जंगलांच्या हद्दीपर्यंत आल्याने  वेढल्यानंतर लष्कर सतर्क झाले आहे.

  • 29 Jan 2025 08:51 AM (IST)

    29 Jan 2025 08:51 AM (IST)

    महाकुंभात चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

    महाकुंभात चेंगराचेंगरीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आता 20  जणांच्या मृत्यूची भीती आहे.

  • 29 Jan 2025 08:48 AM (IST)

    29 Jan 2025 08:48 AM (IST)

    जिथे असाल तिथे गंगेत स्नान करून घरी परता: महंत हरी गिरी यांचे आवाहन

    आखाडा परिषदेचे सरचिटणीस आणि जुना आखाड्याचे संरक्षक महंत हरी गिरी यांनी आवाहन केले आहे की लोकांनी जिथे असाल तिथे गंगेत स्नान करावे आणि त्यांच्या घरी परतावे. महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर महंत म्हणाले की, प्रयागराजच्या हद्दीत असो वा बाहेर, गंगेत स्नान केल्याने समान पुण्य मिळेल.

Web Title: Marathi breaking news today live updates mahakumbhmela 2025 maharashtra politics crime news sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • Maharashtra Mumbai Breaking News Today

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: नाशिकमध्ये थरार! १९ वर्षीय मुलाचा भर रस्त्यात धारधार शस्त्रानं खून
1

Top Marathi News Today: नाशिकमध्ये थरार! १९ वर्षीय मुलाचा भर रस्त्यात धारधार शस्त्रानं खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.