Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: काम केलं नाही तर मंत्री बदलणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ताकीद

Maharashtra Breaking News Live Updates : राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन यांसह देश-विदेशातील अनेक घडामोडींचे अपडेट्स आता एका क्लिकवर...ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2025 | 06:56 PM
Top Marathi News Today Live : अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार मदत

Top Marathi News Today Live : अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार मदत

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Live Updates : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सक्त ताकीद दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांपूर्वी वादग्रस्त वक्तव्ये टाळा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. जरी स्थानिकमध्ये यश मिळाले नाही तर मंत्र्यांचे खाते काढण्याचा इशारा देखील शिंदेंनी दिल्याची चर्चा आहे.

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार मदत

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी अगदी तुरळक पाऊस झाल्याचे पाहिला मिळत आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याबाबत पत्रातील माहिती, अहवाल तपासून सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने पंचनामे करण्याबाबतचे आदेश प्रशासनास दिले आहेत. परंतु, पंचनामे करणे शक्य नाही. कारण दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वच ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे.

The liveblog has ended.
  • 07 Aug 2025 06:50 PM (IST)

    07 Aug 2025 06:50 PM (IST)

    भारत रशियातून तेलाची आयात खरंच बंद करणार का? ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफ घोषणेचा किती परिणाम?

    रशिया युक्रेन युद्ध भडकल्यानंतर भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करत आहे. भारताची कच्च्या तेलाची गरज मोठी आहे. त्यामुळे रशियाकडून कमी दरात मिळणाऱ्या तेलाची आयात सुरू केली आहे. त्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भडकले असून भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. रशिया-युक्रेन युद्धबंदी करण्यासाठी रशियावर निर्बंध आणणं गरजेच आहे. त्यामुळेच ट्रम्प यांचा हा खटोटोप सुरू असून भारतासाठी मोठे धोरणात्मक आव्हान उभं राहिलं आहे.

  • 07 Aug 2025 06:11 PM (IST)

    07 Aug 2025 06:11 PM (IST)

    Wheat Benefits: पौष्टिकतेचा खजिना आहे ‘गव्हाची पोळी’, हार्ट हेल्थपासून डायबिटीसपर्यंत मिळतो फायदाच फायदा

    Wheat roti Benefits: आजकाल प्रत्येकाचे जीवन हे धावपळीचे बनले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण कामच करत असतो. आपल्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे बऱ्याचदा आपले जेवण वेळेत होत नाही. त्यामुळे कमी वयातच अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. अनेकांना हृदयरोग आणि मधुमेहाचा त्रास झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे धावपळीच्या जीवनात पौष्टीक आणि सकस आहार असणे आवशयक आहे. वरण-भातासोबत पोळी भाजीचा देखील समावेश असणे आवश्यक आहे.

  • 07 Aug 2025 05:43 PM (IST)

    07 Aug 2025 05:43 PM (IST)

    Uttarakhand cloudburst : तीन तासांच्या विध्वंसात अख्खे गाव झाले बेचिराख

    केदारनाथ धाम येथे १६-१७ जून २०१३ च्या रात्रीचा उल्लेख करताच लोक थरथर कापतात. जेव्हा आकाशात वीज चमकत होती आणि खाली मंदाकिनी नदी भयानक रुप धारण करुन वाहत होती. ५ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तरकाशीतील तीन गावांमध्ये अशीच भयानक आपत्ती पुन्हा आली. प्रथम, धाराली येथील हृदयद्रावक दृश्याने ३४ सेकंदात सर्व काही उद्ध्वस्त केले. गंगोत्रीच्या मार्गावरील मुख्य मुक्कामाचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे धाराली गाव अवघ्या ३४ सेकंदांच्या पुरात उद्ध्वस्त झाले. १५० हून अधिक घरे, ३० हॉटेल रिसॉर्ट्स आणि २५ होमस्टे असलेल्या या गावात अवघ्या अर्ध्या मिनिटात अर्ध्याहून अधिक घरे, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचा कोणताही मागमूस उरला नाही. या घटनेंमधील मृतांची संख्या खूप जास्त असू शकते.

  • 07 Aug 2025 05:25 PM (IST)

    07 Aug 2025 05:25 PM (IST)

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने काँग्रेस पक्षात केला प्रवेश

    ष्ट्रवादी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षाचे परभणी जिल्ह्यातील तीन वेळचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. बाबाजानी दुर्राणी यांच्यासह परभणीतील माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, जिल्हा बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक व हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

  • 07 Aug 2025 05:07 PM (IST)

    07 Aug 2025 05:07 PM (IST)

    मोठी बातमी! नागरिकांचं आरोग्य महत्वाचं; हायकोर्टाकडून कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी कायम

    Kabutar Khana News: दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला आहे. हजारो कबुतरे असणाऱ्या या परिसराची ओळख याच कुबतरखान्यामुळे निर्माण झाली होती. मात्र मानवी जीवाला असणाऱ्या कबुतरांच्या विष्ठेमधील धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याला जैन समाजाकडून तीव्र विरोध करण्यात आला असून लावण्यात आलेली ताडपत्री काढून टाकण्यात आली आहे. दरम्यान हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. यावर आज सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टाने कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे.

  • 07 Aug 2025 04:55 PM (IST)

    07 Aug 2025 04:55 PM (IST)

    Tata Harrier आणि Safari अ‍ॅडव्‍हेंचर X व्हेरिएंट लाँच,

    टाटा मोटर्सने आज त्यांच्या दोन लोकप्रिय एसयूव्ही हॅरियर आणि सफारीचे नवीन अ‍ॅडव्हेंचर एक्स व्हेरिएंट लाँच केले. हॅरियरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १८.९९ लाख रुपये आहे आणि सफारीची एक्स-शोरूम किंमत १९.९९ लाख रुपये आहे.

  • 07 Aug 2025 04:50 PM (IST)

    07 Aug 2025 04:50 PM (IST)

    आता फक्त 13 हजार रुपयांच्या EMI वर मिळेल देशातील सर्वात स्वस्त EV

    देशात इलेक्ट्रिक कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच मागणीकडे लक्ष देत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. मात्र, मार्केटमध्ये अशा अनेक कार आहेत, ज्यांची किंमत सर्वसामन्यांना परवडत नसते. म्हणूनच अनेक कंपन्या बजेट फ्रेंडली किमतीत Evs ऑफर करण्याचा प्रयत्न करत आहे.

  • 07 Aug 2025 04:45 PM (IST)

    07 Aug 2025 04:45 PM (IST)

    अलिबाग शहरातून रूट मार्च

    गोपाळकाला सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, अलिबाग शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अलिबाग पोलिसांनी सडेतोड रूट मार्च करत शक्तिप्रदर्शन केले. सायंकाळी साडेसहा वाजता हा रूट मार्च शहरातील विविध वर्दळीच्या भागातून काढण्यात आला.या रूट मार्चचे नेतृत्व अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी केले. त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षेची भावना निर्माण करण्यासोबतच, कायदा मोडणाऱ्यांना स्पष्ट इशारा देणे, हा या रूट मार्चचा उद्देश होता.

  • 07 Aug 2025 04:35 PM (IST)

    07 Aug 2025 04:35 PM (IST)

    बंद स्ट्रीट लाईटमुळे शहरातील रस्त्यांवर अंधार

    अंबरनाथ शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबात राज्यातील सत्ताधारी भाजपनेच थेट अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरात बंद स्ट्रीट लाईटमुळे रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अंधार असून त्यामुळे चोरी, दरोडे ,अपघात, सोनसाखळी खेचण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्त्यांवर पसरलेला अंधार तात्काळ दूर करण्याबाबत पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता, मात्र त्यावर काही उपाययोजना न झाल्याने येत्या ११ ऑगस्ट रोजी पालिकेवर जण आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

  • 07 Aug 2025 04:35 PM (IST)

    07 Aug 2025 04:35 PM (IST)

    माथेरानमधील हातरिक्षांवर 'सर्वोच्च न्यायालयाची ' बंदी

     

    माथेरान मधील हात रिक्षा ओढण्याची अमानवीय पद्धत बंद करून ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिले आहेत.त्यामुळे माथेरान मधील सर्व 94 हात रिक्षा चालक यांच्या हाती इ रिक्षा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
    देशाच्या स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही हाताने ओढणाऱ्या रिक्षांचा (हातरिक्षा) वापर सुरू असल्याबद्दल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच माथेरानमधील ही 'अमानवी' प्रवासी सेवा सहा महिन्यांत बंद करण्याचे आणि त्याऐवजी ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले.

  • 07 Aug 2025 04:25 PM (IST)

    07 Aug 2025 04:25 PM (IST)

    कोपरखैरणे येथील माजी नगरसेवकाचा साखळी उपोषण

    प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने अखेर कोपरखैरणे विभागातील विविध प्रलंबित जन समस्या घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक रविंद्र म्हात्रे हे महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिके विरोधात कोपरखैरणे येथील अण्णासाहेब पाटील उद्यानात साखळी उपोषणावर बसले आहेत ,फक्त रवींद्र म्हात्रेच नव्हे तर विभागातील नागरिक आणि अबाल वृद्ध ही त्यांच्या या साखळी उपोषणात सामील झाले आहेत.

  • 07 Aug 2025 04:19 PM (IST)

    07 Aug 2025 04:19 PM (IST)

    जुलै महिन्यातच हापूस आंब्याच्या कलमांना मोहर

    मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांच्या आंब्याच्या बागेत देवगड हापूस कलमांना मोहर आला आहे. चक्क जुलै महिन्यातच हा मोहर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. थंडीच्या हंगामात नोव्हेंबर महिन्यात येणारा मोहोर जुलै महिन्यात आल्यामुळे कुतूहलाचा विषय बनला आहे. हा मोहर फोंडेकर यांनी औषध फवारण्या करून भर पावसाच्या हंगामातही टीकवून ठेवला आहे. नोव्हेंबर महिन्यात हा आंबा तयार होणार असून आंबा पेटीला १० हजारापर्यंत भाव मिळणार आहे. फोंडेकर हे प्रगतशील शेतकरी असून या अगोदर सुद्धा त्यांनी गेल्यावर्षी मालवण तालुक्यातून पहिलीच पाच डझनाची हापूस आंब्याची पेटी गोव्याला पाठवली होती.

  • 07 Aug 2025 03:46 PM (IST)

    07 Aug 2025 03:46 PM (IST)

    India Rain News: घराच्या बाहेर जाताय? मग ही बातमी वाचाच; IMD ने दिला ‘या’ राज्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा

    Heavy Rain In India: गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. पर्वतीय राज्यांमध्ये आणि दक्षिण भारतात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या राज्यांमध्ये भुसखलन आणि पूरस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. उत्तरकाशीत ढगफुटी झाल्याने स्थिती गंभीर झाली आहे. दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने कोणकोणत्या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

  • 07 Aug 2025 03:38 PM (IST)

    07 Aug 2025 03:38 PM (IST)

    हेलिकॉप्टरचा आवाज अन् त्यातून आले NSG कमांडो; IT पार्कमध्ये भीतीचे वातावरण, नेमके काय घडले?

    हिंजवडी हा परिसर राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असा भाग आहे. हिंजवडीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयटी कंपन्या स्थित आहेत. या ठिकाणची सुरक्षा महत्वाचा विषय आहे. दरम्यान काल दुपारच्या सुमारास हिंजवडीच्या फेज २ मध्ये अचानक सैन्य दलाचे जवान हेलिकॉप्टरच्या मदतीने एका कंपनीच्या टेरेसवर उतरले त्यामुळे त्या परिसरात असणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र हे एनएसजी कमांडो का उतरले हे कोणालाही लक्षात येत नव्हते.

  • 07 Aug 2025 03:01 PM (IST)

    07 Aug 2025 03:01 PM (IST)

    लोकप्रिय कोरियन अभिनेत्री Lee Min चे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन

    कोरियन मनोरंजन उद्योगातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘अ‍ॅज वन’ फेमची प्रसिद्ध अभिनेत्री ली मिन यांचे निधन झाले आहे. मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी लिन यांनी जगाचा निरोप घेतला. अभिनेत्री ४६ वर्षांच्या होत्या. राहत्या घरी अभिनेत्रीचा मृतदेह आढळला आहे. सध्या पोलिस यासगळ्या प्रकरणाचा शोध घेत आहे. ली मिन यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांच्या मीडिया एजन्सीने केली आहे.

  • 07 Aug 2025 03:01 PM (IST)

    07 Aug 2025 03:01 PM (IST)

    पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या

    पुणे : राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • 07 Aug 2025 03:00 PM (IST)

    07 Aug 2025 03:00 PM (IST)

    आता पर्यावरण पूरक ई रिक्षा चालवल्या जाणार

    माथेरान / संतोष पेरणे : आगामी सहा महिन्यांत माथेरान मधील हात रिक्षा ओढण्याची अमानवीय पद्धत बंद करून ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.त्यामुळे माथेरान मधील सर्व 94 हात रिक्षा चालक यांच्या हाती इ रिक्षा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.देशाच्या स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही हाताने ओढणाऱ्या रिक्षांचा (हातरिक्षा) वापर सुरू असल्याबद्दल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच माथेरानमधील ही ‘अमानवी’ प्रवासी सेवा सहा महिन्यांत बंद करण्याचे आणि त्याऐवजी ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले.

  • 07 Aug 2025 03:00 PM (IST)

    07 Aug 2025 03:00 PM (IST)

    ‘या’ PSU शेअरमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता

    BHEL Share Target Price Marathi News: गुरुवारी शेअर बाजार उघडल्यानंतर सरकारी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) चे शेअर्स 6.95 टक्के घसरून 222 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आले. बुधवारी हा शेअर 239 रुपयांवर बंद झाला. गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये हा सरकारी शेअर 10% ने घसरला आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या जून तिमाहीच्या निकालांच्या प्रसिद्धीनंतर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये ही विक्री दिसून येत आहे. मोठ्या पातळीवर, या सरकारी कंपनीचे जून तिमाहीचे निकाल निराशाजनक आहेत.

  • 07 Aug 2025 02:59 PM (IST)

    07 Aug 2025 02:59 PM (IST)

    भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

    भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात दोन्ही संघांमध्ये २ अनधिकृत कसोटी सामने खेळवले जातील. त्यानंतर ३ अनधिकृत एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. दोन्ही चार दिवसांचे कसोटी सामने लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळवले जातील. त्यानंतर कानपूरमधील ग्रीन पार्क येथे एकदिवसीय मालिका होणार आहे. अ‍ॅशेस मालिकेसाठी कसोटी संघात स्थान टिकवून ठेवण्याचा सॅम कॉन्स्टसचा मार्ग आता थोडा कठीण झाला आहे.

  • 07 Aug 2025 02:58 PM (IST)

    07 Aug 2025 02:58 PM (IST)

    बुध ग्रह कर्क राशीमध्ये करणार प्रवेश

    बुध ग्रहाला बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. बुध ग्रहाचा अधिपती सोमवार, 11 ऑगस्ट रोजी कर्क राशीमधून बदलणार आहे. तर 22 जून रोजी बुध कर्क राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रह 11 ऑगस्ट रोजी दुपारी 12.59 वाजता कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाने कर्क राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर 30 ऑगस्ट रोजी सिंह राशीमध्ये संक्रमण करणार आहे. कर्क राशीमध्ये बुध गेल्याने त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होऊ शकतो. कोणत्या राशीच्या लोकांवर बुध ग्रहाच्या संक्रमणाचा परिणाम होणार आहे, जाणून घ्या

  • 07 Aug 2025 02:58 PM (IST)

    07 Aug 2025 02:58 PM (IST)

    पालिका आयुक्तांच्या बंगल्यातील सामान चोरी प्रकरणावर मनसेची मागणी

    MNS VS PMC : पुणे : पुणे महापालिका आयुक्तांच्या घरातील सामान चोरीला गेल्याची घटना घडली आहे. यावरुन आता मनसे आणि पालिकेमध्ये वाद निर्माण झाला आहे. पालिका आयुक्तांच्या घरातील अनेक किमती वस्तूंची चोरी झाल्याचे समोर आले आहे. यानंतर जवळपास 20 लाखांचे सामान पुन्हा घेण्यात येत असल्यामुळे मनसेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यावरुन पालिका आय़ुक्त नवल किशोर राम आणि मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यानंतर आता मनसेने अधिकृत पत्र जारी करत माहिती दिली आहे.

  • 07 Aug 2025 02:57 PM (IST)

    07 Aug 2025 02:57 PM (IST)

    अरे बाप रे! कोहलीबद्दल एमएस धोनी काय बोलून गेला?

    भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याची क्रेज थोडी देखील कमी झालेली नाही. अजून देखील धोनी क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय असतो. तयच प्रमाणे भारतताचा महान फलंदाज विराट कोहलीची चर्चा देखील वारंवार होत असते. विराट कोहलीने टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतासाठी तो एकदिवसीय क्रिकेटसाठी उपलब्ध असणार आहे. एम एस धोनी आणि विराट कोहली भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी नावे आहेत. विराट आणि धोनी यांच्यामधील नाते खूप गोड असल्याचे मानले जाते. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल खूप आदराची भावना आहे. अशातच धोनीने विराटबाबत केलेल्या खुलाशाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • 07 Aug 2025 02:26 PM (IST)

    07 Aug 2025 02:26 PM (IST)

    तरुणीला रस्त्यात गाठत तरुणाने केली I Love Youची मागणी

    राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने तरुणीला रस्त्यात गाठले. तिला I Love You म्हण असे धमकावले. तरुणी हे बघून एकदम घाबरली. तरुणीने I Love You बोलण्यास थेट नकार दिला. तिने मुलाला चांगलेच सुनावले. मात्र तरुणाला या गोष्टीचा राग होताच. तरुणाने राग मनात ठेवून असे काही केले की ते थरकाप उडवणार होत.

  • 07 Aug 2025 02:26 PM (IST)

    07 Aug 2025 02:26 PM (IST)

    मासेप्रेमींसाठी पर्वणी, कोळंबीचे दर गडगडले

    श्रावणात मासांहार सोडल्याने आता कोळंबीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. नारळी पौर्णिमेनंतर समुद्रात मासेमारी करण्यासाठी कोळी बांधव सुरुवात करतात. पावसामुळे खोल समुद्रात जाण्यास बंदी असलेले कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करुन मासेमारीला सुरुवात करतात. याच नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आता कोळंबी माश्याचे दर गडगडले असल्याचं दिसून येत आहे.

  • 07 Aug 2025 02:25 PM (IST)

    07 Aug 2025 02:25 PM (IST)

    डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्रीच का फोडला टॅरिफ बॉम्ब?

    Donald Trump Tarrif News : वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ट्रम्प यांनी ९० हून अधिक देशांवर टॅरिफ लागू केले आहे. पण याच वेळी ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, रेसिप्रोकल टॅरिफ मध्य रात्री लागू केल्यामुळे अमेरिकेला याचा अब्जावधींचा फायदा होईल. त्यांच्या या पोस्टने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

  • 07 Aug 2025 02:25 PM (IST)

    07 Aug 2025 02:25 PM (IST)

    रक्षाबंधनाच्या दिवशी 297 वर्षांनंतर घडणार दुर्मिळ योगायोग

    ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी काही योगायोग घडणार आहेत त्या शुभ मानल्या जातात. यावेळी रक्षाबंधन 9 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी 297 वर्षांनी एक शुभ योगायोग घडणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये हे योग खूप शुभ मानले जातात. या दिवशी सूर्य कर्क राशीमध्ये, गुरु आणि शुक्र मिथुन राशीमध्ये, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत असणार आहे.

  • 07 Aug 2025 02:10 PM (IST)

    07 Aug 2025 02:10 PM (IST)

    मासेप्रेमींसाठी पर्वणी, कोळंबीचे दर गडगडले

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासेमारी हंगामाला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोळंबी माशाचा बंपर कॅच मच्छिमारांना मिळत आहे. वेंगुर्ला समुद्रात मच्छिमारांच्या जाळीत रोजच कोळंबी मासा सापडत आहे. हंगामाच्या सुरुवातीला महागडी कोळंबी व मोरी मासा सापडत असल्यामुळे मच्छीमार आनंदीत झाला आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे या कोळंबीला दर कमी आहे. एरवी ३०० ते ४०० रूपये किलोला विकली जाणारी कोळंबी सध्या १५० ते २०० रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे मासे प्रेमींची चंगळ झाली आहे.

  • 07 Aug 2025 02:10 PM (IST)

    07 Aug 2025 02:10 PM (IST)

    दागिने आणि टेक्सटाइल क्षेत्राला सर्वाधिक फटका!

    India-US Trade Deal Marathi News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली होती, त्याचा पहिला टप्पा आजपासून लागू झाला आहे. व्हाईट हाऊसने गेल्या आठवड्यात ३० जुलै रोजी घोषणा केली होती की भारताला २५ टक्के कर भरावा लागेल. त्यानंतर, ट्रम्प यांनी एक कार्यकारी आदेश जारी केला होता, ज्यामध्ये जगभरातील विविध देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिका किती कर लावेल याची यादी होती. ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशात सुमारे ७० देशांसाठी कर दर जाहीर केले होते.

  • 07 Aug 2025 02:09 PM (IST)

    07 Aug 2025 02:09 PM (IST)

    IND vs ENG मालिकेनंतर बेन स्टोक्स नव्या भूमिकेत

    भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्याची मालिका झाली आहे. यामध्ये भारताच्या संघाने त्याचबरोबर इंग्लिश खेळाडूंनी त्याचा जोर दाखवला आहे. काही खेळाडू या मालिकेचे चार सामने खेळले तर काही खेळाडू हे तीन. लाॅर्ड्स कसोटीमध्ये झालेल्या दुखापतीमुळे इंग्लडचा कर्णधार बेन स्टोक्स हा पाचव्या कसोटी सामन्यामधुन बाहेर झाला. त्याने संपुर्ण मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली होती. त्यानंतर लगेचच इंग्लडचे काही खेळाडू हे द हंड्रेड 2025 मध्ये सामील झाले आहेत.

  • 07 Aug 2025 01:55 PM (IST)

    07 Aug 2025 01:55 PM (IST)

    आंबेगाव तालुक्यातील 22 जण उत्तराखंडमध्ये अडकले, कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण

    मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने हाहाकार माजला. ही घटना दुपारी 1.45 ला घडली आणि सर्व होत्याचे नव्हते झाले. गंगोत्री पर्वतातून वाहणाऱ्या खीर गंगा नदीला मोठा पूर आला. वेगाने वाहणाऱ्या पाण्यासोबतच मोठा ढिगारा देखील आला आणि 34 मिनिटांमध्येच धराली गावात काहीच राहिले नाही. या घटनेत 4 जणांचा जीव गेला. तर या दुर्घटनेमध्ये आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील सुमारे २२ नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती समजली असून, हे सर्व पर्यटक मागील २४ तासांपासून संपर्कात नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.

  • 07 Aug 2025 01:50 PM (IST)

    07 Aug 2025 01:50 PM (IST)

    सलमान खान आणि अरबाजच्या बहिणींसाठी मलायका अरोराने ठेवली पार्टी

    मलायका अरोरा आणि अरबाज खान या दोघांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. अरबाज शुरा खानसोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. मलायका तिच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहे. अरबाजपासून घटस्फोट झाला असला तरी, मलायकाचे त्याच्या कुटुंबाशी असलेले नाते अबाधित आहे. अलीकडेच, मलायकाने अरबाजच्या बहिणींसाठी जेवणाचे आयोजन केले होते. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संपूर्ण खान कुटुंबातील महिला या पार्टीत एकत्र दिसल्या आहेत.

  • 07 Aug 2025 01:45 PM (IST)

    07 Aug 2025 01:45 PM (IST)

    न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

    न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना त्यांच्या घरातून जळालेल्या अवस्थेत रोख रक्कम आढळून आली होती. या प्रकरणात तपास समितीचा अहवाल अवैध घोषित करण्याची मागणी न्यायमूर्ती वर्मा यांनी केली होती. यासोबतच, तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी वर्मा यांना पदावरून काढून टाकण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवलेल्या शिफारशीलाही न्यायमूर्ती वर्मा यांनी आव्हान दिले होते.

  • 07 Aug 2025 01:40 PM (IST)

    07 Aug 2025 01:40 PM (IST)

    इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरेंचे दिल्लीमधून सूचक वक्तव्य

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. माहाराष्ट्रामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी केलेला दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो आहे. उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांच्यासोबत देखील बैठक पार पडली आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांचा इंडिया आघाडीसोबत देखील स्नेहभोजनचा कार्यक्रम आहे. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.

  • 07 Aug 2025 01:35 PM (IST)

    07 Aug 2025 01:35 PM (IST)

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त मुंबईत पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव

    मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त कौशल्य विकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबईत ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे’ आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथे जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात, मुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिम, फुगडी, लगोरी आणि विटी-दांडूसह शिवकालीन पारंपरिक खेळांना पुनर्वैभव मिळवून देणार असल्याचे  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

  • 07 Aug 2025 01:25 PM (IST)

    07 Aug 2025 01:25 PM (IST)

    SIR चा मुद्दा तापला! बिहारच्या निवडणुकीपूर्वी दिल्लीत ‘या’ दिवशी विरोधक काढणार मोर्चा

    बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी जोरदार राजकारण तापले आहे. बिहारच्या मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) वरून वातावरण तापले आहे. याचा परिणाम दिल्लीपर्यंत पोहचला असून पावसाळी अधिवेशनामध्ये देखील SIR चे परिणाम दिसून आले आहेत. बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या सुधारणांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी सरकारवर संसदेत या मुद्द्यावर चर्चा करण्यापासून पळ काढत असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर आता विरोधकांनी या निर्णयाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

  • 07 Aug 2025 01:15 PM (IST)

    07 Aug 2025 01:15 PM (IST)

    बाजार घसरताना एफआयआयची नजर स्मॉल-कॅप स्टॉक्सवर

    पारंपारिक गुंतवणूकदारांना स्मॉल-कॅप स्टॉक धोकादायक वाटत असल्याने त्यांच्याकडे सहसा फारसे लक्ष वेधले जात नाही. या कारणास्तव, बरेच गुंतवणूकदार त्यांना टाळतात असे दिसते. तथापि, जर तुम्ही योग्य संशोधन केले आणि स्मार्ट रणनीती अवलंबली तर स्मॉल-कॅप स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात. जोखमीपेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता काही गुंतवणूकदारांना स्मॉल-कॅप स्टॉक आकर्षक बनवते.

  • 07 Aug 2025 01:05 PM (IST)

    07 Aug 2025 01:05 PM (IST)

    उधमपूरमध्ये CRPF जवानाचे वाहन खोल दरीत कोसळले, दोन जवानांचा मृत्यू, १६ जखमी

    जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. बसंतगड येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ( CRPF) जवानांना घेऊन जाणारे एक वाहन खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली. कांडवा परिसराजवळ ही दुर्दैवी दुर्घटना घडली. या अपघातात दोन सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर १६ जवान जखमी आहेत. या अपघातानंतर सर्व जखमींना कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. तसेच बचाव पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले.

  • 07 Aug 2025 01:05 PM (IST)

    07 Aug 2025 01:05 PM (IST)

    पुणे विभागात ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत

    राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः पुणे विभागात मागील सात महिन्यामध्ये रूग्णांना तब्बल ५४ कोटी ९१ लाख ३७ हजार रूपयांची मदत दिली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही.

  • 07 Aug 2025 12:55 PM (IST)

    07 Aug 2025 12:55 PM (IST)

    लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला

    लातुरमध्ये 66 हजार 379 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला, 24 हजार लाभार्थिनी अपात्र असल्याचे समोर आले आहे. एकाच घरात दोन महिला लाभ घेत आहेत का, सरकारली नोकरी असूनही देखील लाभ घेतला जात असल्याबाबत पडताळणी करण्यासाठी लाडक्या बहिणींचा लाभ थांबण्यात आल्याची माहिती आहे.

  • 07 Aug 2025 12:45 PM (IST)

    07 Aug 2025 12:45 PM (IST)

    महायुतीलवादावर शिंदेंची शहांकडे तक्रार

    महायुतीमधील अंतर्गत वादाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाहांकडे तक्रार केल्याची चर्चा आहे. पालकमंत्रिपदाबाबतदेखील शहांनी मध्यस्थी करण्याची विनंती शिंदेनी केल्याचे बोलले जात आहे.

  • 07 Aug 2025 12:35 PM (IST)

    07 Aug 2025 12:35 PM (IST)

    15 ऑगस्टला चिकन, मटन शाॅप बंद

    कल्याण-डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटण शाॅप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून छोट्या आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 07 Aug 2025 12:25 PM (IST)

    07 Aug 2025 12:25 PM (IST)

    शिवेंद्रराजे भोसले आज रायगड दौऱ्यावर

    मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामांवरून सध्या टीकेची झोड उठते आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे रायगड दौऱ्यावर येत असून, पळस्पे फाटा येथून महामार्गाच्या पाहणीला सुरुवात होणार आहे.

  • 07 Aug 2025 12:15 PM (IST)

    07 Aug 2025 12:15 PM (IST)

    चौकशीसाठी हजर रहा..किशोर शिंदे यांच्यासह मनसैनिकांना नोटीस

    शिवाजीनगर पोलिसांकडून किशोर शिंदे यांच्यासह मनसैनिकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्या प्रकरणी किशोर शिंदे आणि मनसे निकाने विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी या सर्वांना हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

  • 07 Aug 2025 12:00 PM (IST)

    07 Aug 2025 12:00 PM (IST)

    दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे स्नेहभोजन

    ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. उद्धव ठाकरे यांची अनेक नेत्यांसोबत बैठका सुरु आहेत. दरम्यान, दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे स्नेहभोजन ठेवण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांमुळे हे स्नेहभोजन महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

  • 07 Aug 2025 11:50 AM (IST)

    07 Aug 2025 11:50 AM (IST)

    मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग, कोकणात रेड अलर्ट

    गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज मुंबईसह कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.  मुंबईतील विविध भागांत, विशेषतः दक्षिण मुंबईतील कुलाबा, मरिन ड्राइव्ह तसेच मध्य मुंबईतील दादर, सायन आणि पश्चिम उपनगरांमधील अंधेरी, विलेपार्ले या ठिकाणी आज पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

  • 07 Aug 2025 11:40 AM (IST)

    07 Aug 2025 11:40 AM (IST)

    "याची मोठी किंमक चुकवावी लागली तरी चालेल - पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आमच्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचे हित हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. मला माहित आहे की आम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि मी त्यासाठी तयार आहे. भारत त्यासाठी तयार आहे..." असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

  • 07 Aug 2025 11:35 AM (IST)

    07 Aug 2025 11:35 AM (IST)

    आमचा निर्णय घेण्यास आम्ही दोन्ही बंधू खंबीर - उद्धव ठाकरे

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. यावरुन महायुतीमधील नेते टीका करत आहे. याबाबत दिल्लीमधील पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही दोन्ही बंधू आमचा निर्णय घेण्याबाबत समर्थ आहोत. अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे.

  • 07 Aug 2025 11:25 AM (IST)

    07 Aug 2025 11:25 AM (IST)

    काम केलं नाही तर मंत्री बदलणार - एकनाथ शिंदे

    एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सक्त ताकीद दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांपूर्वी वादग्रस्त वक्तव्ये टाळा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. जरी स्थानिकमध्ये यश मिळाले नाही तर मंत्र्यांचे खाते काढण्याचा इशारा देखील शिंदेंनी दिल्याची चर्चा आहे.

  • 07 Aug 2025 11:22 AM (IST)

    07 Aug 2025 11:22 AM (IST)

    माधुरी हत्तीणीवरुन रोहित पवारांनी केले कोल्हापूरकरांचे कौतुक

    कायद्याच्या चौकटीमध्ये राहून वनतारामधून महाराणी माधूरी हत्तीणीला परत आणण्यात येणार आहे. यावरुन संपूर्ण राज्यभरातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोल्हापूरकरांचे कौतुक केले आहे.

    कोल्हापूरकर मानलं राव तुम्हाला!!!
    शेवटी तुम्ही विषयाचा कंडका पाडलाच..
    कोल्हापूरकरांच एकदा ठरलं की ठरलं!!!

    अखेर नांदणी मठातील महादेवी हत्ती परत येणार ही बातमी ऐकून माझ्यासारख्या राज्यातील लाखोंना निखळ आनंद झाला. विषय अस्मितेवर आला की मराठी माणूस कसा एकजुटीने मोठा लढा देतो हे… pic.twitter.com/0torgeEogi

    — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2025

     

     

  • 07 Aug 2025 11:12 AM (IST)

    07 Aug 2025 11:12 AM (IST)

    नाशिक जिल्हा रुग्णालयात मोठा घोटाळा

    कोरोना काळात नाशिक जिल्हा रुग्णालय आणि आणि मालेगाव सामान्य रुग्णालयातील मॉड्युलर आयसीयू उभारणीचे काम एका बनावट परवानाधारक कंपनीकडे देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates political lifestyle business breaking news national crime sports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 09:14 AM

Topics:  

  • maharashtra news
  • navarashtra breaking news

संबंधित बातम्या

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार
1

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल
2

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

शनिशिंगणापूर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना बंदी
3

शनिशिंगणापूर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना बंदी

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.