Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: 13 शिक्षकांच्या पदस्थापनेत नेमकं काय घडलं? सामान्य प्रशासन विभागाला डावलल्याचा आरोप

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात खासगी अल्पसंख्याक शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या १३ शिक्षकांच्या जिल्हा परिषदेत समायोजन प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे संबंधित फाईल पडताळणीसाठी आली नसल्याचे समजत असल्याने प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 23, 2026 | 12:20 PM
Jalgaon Teacher Adjustment Row: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon Teacher Adjustment Row: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • १३ शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
  • ३० लाखांच्या कलेक्शनचा सोशल मीडियावर दावा
  • लेखी तक्रारीनंतर चौकशी होणार

 

Jalgaon Teacher Adjustment Row: जळगाव जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या खासगी अल्पसंख्याक शाळांतील १३ शिक्षकांच्या जिल्हा परिषदेत करण्यात आलेल्या समायोजन प्रक्रियेवरून प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य प्रशासन विभागाला बायपास करून परस्पर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेत प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. Jalgaon News:

या प्रक्रियेदरम्यान आपण अनुपस्थित असल्याचा दावा सीईओ करिश्मा नायर यांनी यापूर्वीच केला आहे. त्यामुळे समायोजन नेमके कोणाच्या उपस्थितीत आणि कोणत्या प्रक्रियेनुसार झाले, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडे ही फाईल पोहचलीच नसल्याचे समजले

अतिरिक्त ठरलेल्या नगरपालिका शिक्षकांचे समायोजन नियमानुसार आणि आपल्या उपस्थितीत झाल्याचे सीईओ नायर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, खासगी अल्पसंख्याक शाळांतील १३ शिक्षकांच्या समायोजनाची फाईल सामान्य प्रशासन विभागातील कार्यालयीन अधीक्षक, प्रशासन अधिकारी आणि कनिष्ठ सहाय्यक यांच्याकडे पडताळणी व अभिप्रायासाठी आली नसल्याचे समजते. संबंधित विभागाची पडताळणी टाळून प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास, त्यामागील कारणांचा खुलासा होणे आवश्यक आहे.

Jalgaon News: महिलांच्या हाताला बळ, स्वप्नांना नवी भरारी; ‘उमेद’कडून १ …

शासन धोरणानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना एकशिक्षकी आणि पेसा क्षेत्रातील शाळांना प्राधान्य देणे अपेक्षित असताना, सोयीच्या पदस्थापना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तालुक्यातल्याच तालुक्यात पदस्थापना दिल्याने शिक्षक व सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणात प्राथमिक शिक्षण विभागातील दोन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नावे सोशल मीडियावर चर्चेत आली आहेत.

३० लाखांच्या कलेक्शनचा दावा

समायोजन प्रक्रियेत ३० लाख रुपयांचे कलेक्शन झाल्याचा दावा सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमधून करण्यात आला आहे. या दाव्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, त्याची सत्यता स्वतंत्र चौकशीतून तपासण्याची गरज आहे. मात्र, या आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत …

लेखी तक्रारीनंतर चौकशी

समायोजन प्रक्रियेबाबत शिक्षक व सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शासनाच्या धोरणानुसार पदस्थापना झाल्या का, फाईलची पडताळणी का झाली नाही आणि सोशल मीडियावरील आर्थिक गैरव्यवहाराच्या दाव्यात तथ्य आहे का, याची उत्तरे प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर समायोजन प्रक्रियेची चौकशी करण्यात येईल, असे सीईओ करिश्मा नायर यांनी स्पष्ट केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जळगावमध्ये किती शिक्षकांच्या समायोजनावरून वाद निर्माण झाला?

    Ans: खासगी अल्पसंख्याक शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या १३ शिक्षकांच्या समायोजनावरून वाद निर्माण झाला आहे.

  • Que: ३० लाख रुपयांच्या कलेक्शनचा दावा काय आहे?

    Ans: सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये समायोजन प्रक्रियेत ३० लाख रुपयांचे कलेक्शन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

  • Que: शिक्षक समायोजन प्रकरणाची चौकशी होणार आहे का?

    Ans: सीईओ करिश्मा नायर यांच्या म्हणण्यानुसार, लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर समायोजन प्रक्रियेची चौकशी करण्यात येईल.

Web Title: Jalgaon 13 teachers adjustment controversy inquiry rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Jalgaon News
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Parenting Tips: छोट्या छोट्या गोष्टींवर मुलं चिडचिड करतात? पालकांनो, ‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
1

Parenting Tips: छोट्या छोट्या गोष्टींवर मुलं चिडचिड करतात? पालकांनो, ‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

Peepal Tree Removal Tips: भिंतीच्या भेगेत उगवलेला पिंपळ कसा काढाल? मिठाचा उपाय करण्याआधी ‘हे’ जाणून घ्या!
2

Peepal Tree Removal Tips: भिंतीच्या भेगेत उगवलेला पिंपळ कसा काढाल? मिठाचा उपाय करण्याआधी ‘हे’ जाणून घ्या!

Shruti Marathe Gorgeous Gown Look: श्रुती मराठेच्या अदा पाहून चाहते फिदा! गाऊनमधील लुकची सोशल मीडियावर चर्चा
3

Shruti Marathe Gorgeous Gown Look: श्रुती मराठेच्या अदा पाहून चाहते फिदा! गाऊनमधील लुकची सोशल मीडियावर चर्चा

Karan Tacker New Project: करण टैकरच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा; स्कॉटलंडमध्ये नव्या प्रोजेक्टचं शूटिंग सुरू
4

Karan Tacker New Project: करण टैकरच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा; स्कॉटलंडमध्ये नव्या प्रोजेक्टचं शूटिंग सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.