मुंबईमध्ये (Mumbai) मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक लोक राहतात. स्वातंत्र्य मुंबई निर्माण करण्यासाठी १०४ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. मात्र मुंबईमध्ये राहणाऱ्या मराठी माणसालाच इथे नोकरी नाकारली जात आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईमध्ये घडत असलेल्या प्रकारावरून केंद्रातील नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यामध्ये शिंदे फडणवीसांचे सरकार आहे, मात्र शिवसेना ही मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे. तरीसुद्धा मुंबईतील मराठी माणसाला नोकरी नाकारली जाते, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नकली आणि बुळचट असल्याचे म्हणत त्यांनी शिदेंवर टीका केली आहे.
मराठी माणसाला मुंबईमध्ये राहून नोकरी नाकारण्यात आल्याचे पडसाद राज्यभरात सगळीकडे उमटले आहेत. यावर केंद्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी आक्रमक होत संताप व्यक्त केला आहे. कोणाचा माईका लाल मराठी माणसाला नोकरी नाकारू शकत नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले. दक्षिण मुंबईमधील गिरगाव परिसर हा सांस्कृतिक आणि सणसंस्कृती जपणाऱ्या मराठी लोकांचा परिसर म्हणून मागील कित्येक दशकांपासून ओळखला जात आहे. मात्र याच मराठी वस्तीमधील एका कंपनीतून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमुळे सगळीकडे एकाच संताप व्यक्त केला जात आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये मराठी माणसाने नोकरीसाठी अर्ज दाखल करू नये, असे सांगण्यात आले आहे.
शरद पवारांच्या सभेचा फारसा फरक पडत नाही
मुंबईत मराठी माणसाला नोकरी देणार नाही, असा कोणी माईचा लाल नाही. मुंबईत ८० टक्के नोकरीचा अधिकार पहिले स्थानिकांना असतो, असे गुलाबराव पाटील म्हणाले. शरद पवार यांच्या सभेचा फारसा फरक पडणार नसून प्रत्येक पक्षाचा नेता हा आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करत असतो. मात्र आत्तापर्यंत आम्ही फास्टकलसने पास झालो आहोत. कारण पवार आता ईव्हीएम मशीनबद्दल बोलत आहेत. ईव्हीएम मशीन हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं असून हा त्यांचा रडीचा डाव आहे, असे गुलाबराव पाटलांनी सांगितले.