Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! धाराशिव तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेसंदर्भात कारवाई सुरू

धाराशिव तालुक्यात २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत झालेल्या मार्गदर्शन बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 22, 2026 | 02:02 PM
dharashiv

dharashiv

Follow Us
Follow Us:
  • धाराशिव तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेसंदर्भात कारवाई
  • ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भातील प्रभाग रचनेमागे उद्देश काय?
  • महत्त्वाच्या बैठकीत कोणाची उपस्थिती?
Dharashiv Gram panchayat Election News: 2026 वर्षी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून प्रभाग रचनेस सुरवात करण्यात आली आहे. शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील एकूण ६५ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेसंदर्भात जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत यशवंतराव चव्हाण सभागृहात संबंधित अधिकाऱ्यांची सविस्तर मार्गदर्शन बैठक पार पडली. या बैठकीत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग रचना ही कायदेशीर तरतुदींनुसार, लोकसंख्येच्या निकषांनुसार व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काधाराटेकोरपणे करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.

१७८ कोटींच्या आरोपांचा ‘नाट्यमय’ शेवट!, “चुकीची माहिती…”; संजय राऊतांनी अखेर स्पष्टच सांगितलं!

ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भातील प्रभाग रचनेमागे उद्देश काय?

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार आणि ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीतील प्रभागांची नव्याने आखणी करणे आवश्यक असते. लोकसंख्येतील बदल, नव्याने निर्माण झालेली वसाहत, तसेच भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन प्रभागांची रचना केली जाते. यामुळे प्रतिनिधित्वामध्ये समतोल राखला जाऊन लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम होते, असा उद्देश या प्रभाग रचनेमागे असतो.
प्रत्येक ग्रामपंचायतीची अद्ययावत लोकसंख्या आकडेवारीचा आधार घेतला जातो. प्रभाग रचनेत भौगोलिक सलगता व नैसर्गिक सीमांचा विचार करावा लागतो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व महिला आरक्षणाबाबत शासनाच्या धोरणांचे पालन करावे. कोणत्याही गावात अन्यायकारक किंवा पक्षपाती पद्धतीने प्रभाग आखणी होणार नाही याची दक्षता घ्यावी. निश्चित कालमर्यादेत प्रारूप प्रस्ताव तयार करून सादर करावेत.बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच प्रभाग रचना करताना उद्भवणाऱ्या तांत्रिक व कायदेशीर अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महत्त्वाच्या बैठकीत कोणाची उपस्थिती?

या बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार उपस्थित होते. त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव ठेवून पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. ज्या ६५ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना होणार आहे, त्या ग्रामपंचायतींची यादी प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रारूप प्रसिद्ध करून हरकती व सूचनांसाठी मुदत देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे संबंधित नागरिकांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन या बैठकीत  करण्यात आले आहे.

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन

Web Title: Dharashiv taluka 65 gram panchayat election ward formation news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Election
  • grampanchayat election result

संबंधित बातम्या

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन
1

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Dharashiv Zilla Parishad: महिला उद्योजकतेला बळ! प्रत्येक कर्जप्रकरणासाठी सीआरपींना ₹१ हजार; धाराशिवचा राज्यात पहिला प्रयोग
2

Dharashiv Zilla Parishad: महिला उद्योजकतेला बळ! प्रत्येक कर्जप्रकरणासाठी सीआरपींना ₹१ हजार; धाराशिवचा राज्यात पहिला प्रयोग

Maharashtra Politics: भाजप-राष्ट्रवादीला धक्का! संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटेंची ठाकरे गटात एन्ट्री; धाराशिवच्या राजकारणात खळबळ
3

Maharashtra Politics: भाजप-राष्ट्रवादीला धक्का! संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटेंची ठाकरे गटात एन्ट्री; धाराशिवच्या राजकारणात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.