Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Murder Case : कृष्णा आंधळेला पोलिसांनी मित्र बनवले होते का? धनंजय देशमुख यांचा गंभीर सवाल

बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये धनंजय देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी अन्नत्याग आंदोलन झेडले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 25, 2025 | 11:26 AM
Beed Murder Case : कृष्णा आंधळेला पोलिसांनी मित्र बनवले होते का? धनंजय देशमुख यांचा गंभीर सवाल
Follow Us
Follow Us:

बीड : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण होऊन दोन महिने झाले असून अद्याप पूर्ण न्याय मिळालेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडसह संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. दरम्यान, अद्याप एक आरोपी फरार आहे. कृष्णा आंधळे याला अटक करण्यात यावी यासाठी मस्साजोग गावाच्या लोकांनी अन्नत्याग आंदोलन केले आहे.

बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि फरार आरोपींना अटक करण्यात यावी. अशी मागणी मस्साजोग गावाचे लोक करत आहेत. न्यायासाठी मस्साजोग गावकरांनी आक्रमक पवित्रा घेत अन्नत्याग आंदोलन केले आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत न्यायाची मागणी केली आहे. धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना बीडमधील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय म्हणाले धनंजय देशमुख?

मस्साजोग गावातील लोकांनी न्यायासाठी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “स्थानिक पोलीस स्टेशनने सीआयडीकडे काय तपास दिला? तो योग्य आहे का..? सीआयडी सोसायटी चांगल्या दिशेने तपास करत आहेत. परंतु बेसिक तपास जो आहे तो समाधानकारक झालेला नाही. त्यावर आम्ही चर्चा केली धक्कादायक माहिती अशी समोर आली ली की SP यांनी याबाबतची कुठलीही माहिती पुरवली गेली नव्हती. सहा डिसेंबर रोजी का ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला नाही.सगळे गुन्हे दाखल झाले ते वेळ निघून गेल्यावर झाले. पोलिसांनी कृष्णा आंधळेला का आश्रय दिला होता. लोकांचे खून करण्यासाठी. अपहरण करण्यासाठी? त्याला पोलिसांनी मित्र बनवले होते का?” असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “आम्ही आंदोलनावर ठाम आहोत गावकरी देखील आंदोलनावर ठाम आहेत. दोन दिवस हे अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार आहे. त्यानंतरही दखल घेतली नाही तर अन्नपान देखील घेणार नाहीत. सीआयडी आणि एसआयटी तपास करत आहेत. ते कशा पद्धतीने काम करत आहेत ही माहिती आम्हाला नाही. केज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना सांगायला हवं होतं की यापूर्वीच्या तपास कशा पद्धतीने झाला आहे परंतु त्यांनी ते सांगितले नाही. मनोज जरांगे पाटील हे देखील या ठिकाणी दुपारी येणार आहेत. या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. परंतु त्यांना आम्ही आंदोलनात सहभागी न होण्याची विनंती केली आहे कारण त्यांची प्रकृती साथ देत नाही,” असे मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Massajog villages food boycott movement for justice in santosh deshmukh murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • Beed Crime
  • Dhnanjay Munde
  • Santosh Deshmukh Murder

संबंधित बातम्या

Beed Crime: लग्नात मानपान कमी, ‘स्कॉर्पिओ’साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ
1

Beed Crime: लग्नात मानपान कमी, ‘स्कॉर्पिओ’साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन
2

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

Beed Crime: बीडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; सावकारी परवाना देण्यासाठी 13 हजारांची लाच घेताना तिघे जाळ्यात
3

Beed Crime: बीडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; सावकारी परवाना देण्यासाठी 13 हजारांची लाच घेताना तिघे जाळ्यात

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…
4

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.