
Purandar News, IT Park, Pune IT, Vijay Shivtare, MIDC, Maharashtra Infrastructure,
Purandar IT Park: पुण्यातून आयटी कंपन्यांचे परराज्यात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुरंदर तालुक्यात आयटी पार्कला जागा देण्याची तयारी आमदार विजय शिवतारे यांनी दर्शवली होती. त्या अनुषंगाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी महसूल विभागाकडे प्रस्तावित ५७२ हेक्टर म्हणजेच जवळपास दीड हजार एकर जागा हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील चांबळी, दिवे, कोडीत बु, कोडीत खु. या गावांतील शिल्लक गायरान क्षेत्र विनामूल्य एमआयडीसी ला मिळावी यासाठी राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.
पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यातील गायरान जमिनीत आयटी पार्कची मागणी केली होती. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ जुलै २०२४ रोजी तत्वतः मान्यता दिली होती. पुढे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपलब्ध जागेचा अहवाल मागवला.
Maval News : सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अन् शासकीय कार्यालयाला टाळं; मावळात कामकाज ठप्प
त्यानंतर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विजय शिवतारे यांनी पुढील कार्यवाही होण्याची मागणी केली होती. त्यावर उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी वाहतूक कोंडी व अन्य समस्यांमुळे पुण्यातील कंपन्यांचे स्थलांतर होत असल्याची बाब चिंताजनक असल्याने शिवतारे यांची मागणी रास्त आहे. असे सांगून पुरंदर आयटी पार्कसाठी ३ एप्रिल २०२५ रोजी उद्योग मंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आयटी पार्क बाबतचा अंतिम प्रस्ताव कॅबिनेट समोर लवकरच आणला जाईल असे सांगून पुरंदर आयटी पार्कची घोषणा अधिवेशनात केली होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वी महसूल विभागाच्या जमिनीवर अशा पद्धतीने उद्योग उभारणीचे काम केलेले आहे. त्यांच्याशी चर्चा करून महसूल विभागाची जागा हस्तांतरण प्रक्रिया वेगवान करण्याबाबत सरकार हालचाली करणार असल्याचेही सामंत यांनी जाहीर केले होते.
प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीत भाजपचे वर्चस्व; 13 जागांवर
त्या अनुषंगाने शासकीय पातळीवर अत्यंत जलद गतीने हालचाली सुरु करण्यात आल्या असून पुरंदर तालुक्यातील चांबळी, दिवे, कोडीत बु, कोडीत खु, या गावांतील शिल्लक गायरान जमिनीत जिथे आयटी पार्क उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे अशा महसूल विभागाच्या गायरान जमिनी महामंडळास ( एमआयडीसी ) विनामूल्य देण्यात याव्यात अशी राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.
चांबळी – ९६६. १८५.६८ हेक्टर
दिवे – २, ३, १३६७ १८८.८३ हेक्टर
कोडीत बु – ६३८, ७००, ७१३ १२४.१ हेक्टर
कोडीत खु – १७७, १७२, १७३, ७३.९३ हेक्टर
एकूण क्षेत्र – ५७२.५४ हेक्टर (१४८४ एकर).
सर्वोच्च न्यायालयाच्या विविध आदेशानुसार शासकीय जागेवर शासनाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारणी करताना फारशा अडचणी येत नाहीत. त्यामुळे येत्या तीन चार महिन्यात आयटी पार्कसाठी लागणारी जागा महसूल विभागाकडून एमआयडीसी कडे वर्ग होईल. त्यानंतर कंपन्यांचे प्लॉटींग करण्यात येईल. आयटी पार्क मुळे पुरंदर तालुक्यातील किमान एक लाख तरुणांना नोकऱ्या लागतील. भविष्यात पुरंदरचे चित्र फार वेगळे आणि सकारात्मक पद्धतीने बदलले असल्याचे पाहायला मिळेल, असे मत, आमदार विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.