टेंभुर्णी :कुर्डूवाडी ता.माढा येथे सन १९९७ पासून चेक नका परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा अस्तित्वात असून सदरील चौकास अण्णाभाऊ साठे चौक असे नामकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज एकवटला असून सकल मातंग समाजाच्या वतीने कुर्डवाडी नगरपरिषदेवर हलगी मोर्चा काढण्यात आला.
प्रारंभि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राजमाता अहिल्याबाई होळकर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत हलग्यांच्या गजरात नगरपरिषदेवर मोर्चा धडकला.रेल्वे गेट जवळील चेक नाका परिसरात सण १९९७ पासून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अस्तित्वात आहे. त्यानुसार चेक नाका परिसरातील चौकास अण्णाभाऊ साठे चौक असे नाव देण्यात यावे. या मागणीसाठी ११ मे रोजी मातंग समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी नगरपरिषद प्रशासनाने सकल मातंग समाज बांधवांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हलगी मोर्चा विसर्जित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते दत्ता अडसूळ, वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते बाळासाहेब लांडगे, प्रदीप सोनटक्के, सुरज अस्वरे, रवी पाटोळे, बंटी अस्वरे, लक्ष्मण आस्वारे, दलित स्वयंसेवक संघाचे अशोक चव्हाण, माजी नगरसेवक किसन हानवते आनंद हानवते, भाजपा अल्पसंख्यांचे बालाजी गायकवाड, मातंग एकता आंदोलन चे रोहित कांबळे विजय देवकते, लहुजी शक्ती सेनेचे श्रीकांत शिरसागर, दीपक कांबळे , आकाश खिलारे, लक्ष्मण कांबळे, ईश्वर कांबळे, सतीश साठे, मधु चांदणे, एमबी कांबळे, अभिजीत अस्वरे, मोहन लोंढे, संजय साठे, रतन खवळे, मीना चांदणे, दिपा महिते पूजा शिरसागर, पुजा गायकवाड अधिका अवघडे जोति असवरे सखुबाई आडसुळ धाबाई साठे सुनिता अस्वरे सुनिल कसबे अमोल ढावरे यांच्यासाह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.