Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक

शहरातील पार्किंग समस्येचे कारण पुढे करून दस्तुरी येथील वाहन तळाच्या ठिकाणी बेकायदा जेसीबी मशीन यांचे सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 14, 2026 | 05:52 PM
Matheran News : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक
Follow Us
Follow Us:
  • वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन;
  • वन आणि महसूल विभागाची डोळेझाक
माथेरान/संतोष पेरणे : माथेरानमध्ये वन विभागाने डोळ्यावर पट्टी बांधली असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर बेकायदा उत्खनन सुरू आहे. शहरातील पार्किंग समस्येचे कारण पुढे करून दस्तुरी येथील वाहन तळाच्या ठिकाणी बेकायदा जेसीबी मशीन यांचे सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले. दरम्यान तेथील मालवाहू घोड्यांचे उभे राहण्याचे ठिकाण हिरावले गेले असून घोड्यावालयांचे तबेले तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन येणारे वन विभाग आता आहे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण वसले असुन या ठिकाणी विविध देशातील तसेच राज्यातून पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येत आहेत. माथेरान हे पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरण पूरक थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाहनाला बंदी आहे व या ठिकाणी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. मात्र हेच माथेरान पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. माथेरानमध्ये असणारे वाहन तळ हे या पर्यटकांचे वाहन पार्किंग करण्यासाठी अपुरे पडते पडत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक काही पर्याय एक माथेरान घाट रस्त्यात आपले वाहने पार्किंग करून यांना माथेरानला जावे लागते. तर काही पर्यटकांना जुम्मापट्टी या आदिवासी वाढीमध्ये आपली वाहने पार्किंग करून पुढे माथेरान येथे प्रवासी टॅक्सीने माथेरानला जावे लागते.

Matheran News : रस्त्यांसाठी वन जमीन देण्याचा निर्णय; डोंगरातील आदिवासी वाड्यांची विकासाकडे वाटचाल

माथेरानच्या वाहन तळाला लागून असलेला एमपी 93 हा प्लॉट शासनाच्या मालकीचा आहे.माथेरान मध्ये वाहन तळाच्या लगत असलेला एमपी ९३ या शासनाच्या मालकीच्या भूखंडाचे सपाटीकरण जेसीबी मशीन यांचा वापर करून करण्यात आले. महाराष्ट्र शासन महसुल विभाग आणि नगरपालिका हस्तांतरण झालेले नाही.तरी देखील जेसीबी मशीन लावून उत्खनन करण्याची हिंमत दाखवण्यात आल्याने खळबळ माजली आहे.हा भूखंड नगरपालिका यांच्याकडे हस्तांतरण झालेला नाही आणि तरीदेखील खोदकाम केले गेले आहे. त्याबाबत वन विभाग आणि महसूल विभाग यांनी कोणतीही कारवाई केली नाही. वाहन तळाच्या नावाखाली सपाटीकरण सुरू काम चालू असल्याचे पाहायला मिळत आहे.

मात्र एम पी 93 या प्लॉटमध्ये एक जुने इमारत आपल्याला पाहायला मिळत होते मात्र ही इमारत आता वाहन तळाच्या जागेसाठी तीन जेसीपी यांच्या सहाय्याने पाडण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन करताना सुद्धा झाले वन आणि महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.एम पी 93 हा प्लॉट महसूल विभागाच्या ताब्यात असून माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या ताब्यात नाही.मात्र तरी देखील या प्लॉटमध्ये सध्या काम चालू असल्याने शासन कोणतीही कारवाई करीत नाही या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.या ठिकाणी जे मालवाहतूक घोडेस्वार होते यांना या ठिकाणी हटवून तेथे पार्किंग करण्यात येत आहे. या प्लॉटमध्ये नगरपालिकेचे हस्तांतर नसतानाही कशाप्रकारे काम चालू आहे व या कामासाठी नगरपालिका कुठल्या प्रकारे बंधने नाहीत का?असा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येत आहे. तसेच माथेरानमध्ये कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात खोडकामाला परवानगी नसल्याने या ठिकाणी नगरपालिकेने एमपी ९३ या वाहनतळाच्या जागेसाठी जो प्लॉटचे काम चालू आहे त्याच्यासाठी कोणत्या प्रकारे परवानगी आहे याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

पर्यटकांची वाढती गर्दी, पण सुविधा अपुऱ्या! नागाव समुद्र किनाऱ्यावर अंधार, स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर

Web Title: Matheran news illegal soil excavation in the name of parking lot forest and revenue department turn a blind eye

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Marathi News
  • matheran news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.