पुणे : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांनी परवा रात्री सुरत मध्ये भेट घेतली अशी चर्चा आहे. त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदे गट व भाजप परत सत्तेवर येते काय
असे सगळ्यांना वाटत आहे. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मला तुमच्याकडून कळत आहे. मी प्रवासात व्यस्त आहे. देवेंद्रजींचा स्पीड आहे. ते जेव्हा अपॅाईंटमेंट मिळेल. तेव्हा भेटी घेतात. असे पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन भाजप राज्यात स्थिर सरकार द्यायला पुढे येणार का?, त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट घडली नाही ज्यात भाजपाने भूमिका स्पष्ट करावी. आमचं निरिक्षण सुरु आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यात जे शिवसेनेचे चालले आहे. त्यावर भाजपची भूमिका काय आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यावर पाटील म्हणाले, भाजपाचं रूटीन काम सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे का. असा सवाल भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्यावर अशी कोणतीही गोष्ट घडली नाही, ज्यात भाजपाने भूमिका स्पष्ट करावी. आमचं निरिक्षण सुरु आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
[read_also content=”नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वात अगणित लघुपट निर्मितीची ताकद; चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन https://www.navarashtra.com/maharashtra/the-power-of-narendra-modis-production-of-countless-short-films-statement-of-chandrakant-patil-nrdm-297211.html”]