Megablock
मुंबई : मध्य रेल्वेतर्फे (Central Railway), मुंबई विभागात (Mumbai Division) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी (Maintainance and Repair Work) आपल्या उपनगरीय विभागांवर (Suburban Devision) मेन आणि हार्बर मार्ग (Main and Harbour Line) मेगा ब्लॉक (MegaBlock) तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक (JumboBlock) घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT,Mumbai) येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील(Slow Track) सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन जलद मार्गावर (Down Fast Track) वळवण्यात येतील. या सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचतील.
कल्याण (Kalyan) येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
सकाळी ११.०० ते ५.०० या वेळेत सीएसएमटीहून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा (Wadala) येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४ ४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील (Down Harbour Route) सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करिता डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
सांताक्रुझ आणि गोरेगाव (Santacruz And Goregaon) स्थानकांदरम्यान आज सकाळी १०.०० ते ३.०० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक (Jumbo Block) घेण्यात येईल.
ब्लॉक कालावधीत, सर्व डाऊन धीम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील आणि सर्व अप धीम्या मार्गावरील उपनगरी गाड्या सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालविल्या जातील.
सर्व धीमी उपनगरीय सेवांना विलेपार्ले स्थानकावर दुहेरी थांबा मिळेल आणि जलद मार्गावर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे त्या दोन्ही दिशेने राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. याबाबतची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे.