मुंबई : कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो ३ (Metro 3) ची उद्या ट्रायल होणार आहे. आरेच्या सारीपुत नगर येथील ट्रॅकवर ११ वाजता ही चाचणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत ही ट्रायल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध सुरु असताना मेट्रो ३ च्या ट्रायलचा घाट घालण्यात आला आहे. या मेट्रोसाठी दोन रॅक मुंबईत दाखल झाले आहेत.
[read_also content=”ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरासांठी दूध महागलं! https://www.navarashtra.com/maharashtra/during-the-festive-season-milk-became-expensive-for-mumbaikars-nrps-320564.html”]
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो-३ चे मे २०२१ अखेरपर्यंत भुयारीकरणाचे काम ९६ टक्के पूर्ण झाले आहे. तर एकूण प्रकल्पाचे काम ६७ टक्के झाले आहे. मात्र, कारशेडबाबत निर्णय झालेला नसल्याने मेट्रो-३ चे भवितव्य अंधारातच आहे. कारशेड निर्णयाच्या विलंबामुळे मेट्रो – ३ ची मुदत साधारण दोन-तीन वर्षे पुढे जाण्याची भीती आहे.
आरेतील मेट्रो ३ चं कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय होताच केंद्र सरकारनंही कांजूरमार्गच्या या जागेवर स्वतःचा मालकी हक्क दाखवला होता. ही जागा ही मिठागराची असल्यामुळे त्यावर केंद्राचा अधिकार आहे असं नमूद करून त्यावर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा बोर्ड लावला होता. दरम्यान एका बांधकाम व्यवसायिकानंही ती जागा आपण मिठागराकडून भाडे तत्त्वावर काही वर्षांपूर्वी घेतलेली आहे. तसा आमच्यात करार झाला असून सध्या एमएमआरडीएनं तिथं मेट्रो कारशेडसाठी जे खोदकाम सुरू केलं आहे ते तात्काळ थांबवावं असा उल्लेख असणारी नोटिसच महेशकुमार गरोडीया यांनी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांना पाठवली आहे.