Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामस्वच्छता अभियानात म्हाते खुर्द सातारा जिल्ह्यात व्दितीय  ; माझी वसुंधरा अभियानात तालुक्यात अव्वल

सातारा जिल्ह्यातील मौजे म्हाते खुर्द या गावाने महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सातारा जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला. या जिल्हास्तरीय यशानंतर म्हाते खुर्द गाव पुणे विभागीय तपासणीसाठी सज्ज झाले आहे. म्हाते खुर्द गावाने महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात देखील जावली तालुक्यात अव्वल स्थानी राहुन जिल्ह्यात दुसरा तर राज्यात सोळाव्या क्रमांकाचे मानांकन मिळविण्याचा बहुमान पटकाविला होता.

  • By Aparna
Updated On: Jun 26, 2023 | 08:57 PM
ग्रामस्वच्छता अभियानात म्हाते खुर्द सातारा जिल्ह्यात व्दितीय  ; माझी वसुंधरा अभियानात तालुक्यात अव्वल
Follow Us
Close
Follow Us:

मेढा : सातारा जिल्ह्यातील मौजे म्हाते खुर्द या गावाने महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सातारा जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला. या जिल्हास्तरीय यशानंतर म्हाते खुर्द गाव पुणे विभागीय तपासणीसाठी सज्ज झाले आहे. म्हाते खुर्द गावाने महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात देखील जावली तालुक्यात अव्वल स्थानी राहुन जिल्ह्यात दुसरा तर राज्यात सोळाव्या क्रमांकाचे मानांकन मिळविण्याचा बहुमान पटकाविला होता. सातारा जिल्ह्यात पाणीदार गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हाते खुर्द गावच्या लौकिकात या यशस्वी कामगिरीमुळे आणखी एका वैभवाची भर पडली आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्वावर आधारित म्हाते खुर्द गावाने कृतीशील पध्दतीने या अभियानात भाग घेऊन ग्रामस्थांच्या अमुल्य सहभागातून हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. जलसंधारण, शेततळी, सार्वजनिक विहीर, दोन पुल निर्मित रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय व सांस्कृतिक भवन इमारत, शाळा इमारत, स्मशानभुमी सुशोभिकरण, झरे बळकटीकरण नविन झऱ्यांची निर्मिती, घरोघरी नळ विस्तार इत्यांदी विकास कामांचा यामध्ये समावेश आहे. म्हाते खुर्द या गावाने गावच्या डोंगरमाथ्यावर स्वेच्छानिधीतून १५० × १०० फुट आयताकृती आकाराचे ३० फुट खोलीचे  व ६० लाख लीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या शेततळ्याची निर्मिती करुन जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. रेन वाँटर हारवेस्टींग व परकोलेशनचा देखील प्रयोग या गावाने राबविण्याचा प्रयत्न केला आहे. सौरउर्जेवर चालणारे एलईडी दिव्यांची निर्मिती केली गेली आहे. वृक्षारोपनाच्या माध्यमातून हरित आच्छादन वाढविण्यासाठी भर दिला गेला आहे.

या अभियानाच्या माध्यमातून गावच्या सौंदर्यात व सुशोभीकरणात परिणामकारक बदल झाला आहे. हागंणदरी मुक्त गाव, तंटामुक्त सोबतच विद्या मंदिरही आयएसओ मानांकन करून शाळेला ‘अ’ दर्जा श्रेणी प्राप्त आहे.

जिल्ह्यातील माँडेल गाव बनले
रोजगार हमी सारखा कायदा भारत सरकारने निर्माण केला. आर्थिक सुबत्ता समानतेसाठी रोजगार हमी सारख्या योजनेसाठी म्हाते खुर्द गाव सातारा म्हणून नावारूपाला आले आहे. म्हाते खुर्द गावच्या या विकसनशील वाटचालीत सातारा जावली विधानसभेचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रांजणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

 सार्वजनिक मंडळाचा सहभाग

म्हाते खुर्द गावच्या या यशात ग्रामस्थ मंडळ, नवयुग विकास मंडळ, नवयुग विकास पतपेढी, नेहरु युवा मंडळ, भजन मंडळ, भैरवानाथ क्रिकेट क्लब, महिला मंडळ, श्री भैरवनाथ जलयुक्त शिवार कमिटी आदी सामाजिक वाहिन्यांनी भरीव काम केले. या अभियानाचे यश गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या अमुल्य सहकार्याच्या जोरावर शक्य झाल्याची भावना सरपंच राजाराम दळवी यांनी बोलुन दाखविली..

Web Title: Mhate khurd in satara district in village swachhta mission my vasundhara abhiyan tops the taluka nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2023 | 08:57 PM

Topics:  

  • maharashtra
  • Medha
  • Swachhta Mission

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.