Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tuljapur Temple: तुळजापूरच्या भवानी माता मंदिराच्या जिर्णोद्धारासंदर्भात लवकरच समन्वय बैठक; आशीष शेलार

आई तुळजाभवानीच्या मंदिरात देखील भाविकांनी पारंपारिक पोशाख परिधान कारावा अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून निवेदनद्वारे मागणी करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 15, 2025 | 11:33 PM
Tuljapur Temple: तुळजापूरच्या भवानी माता मंदिराच्या जिर्णोद्धारासंदर्भात लवकरच समन्वय बैठक; आशीष शेलार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: तुळजापुरच्या भवानी माता मंदिराची स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कामे ठरविण्यापुर्वी देवस्थानाचे पुजारी, तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, स्थानिक आमदार यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले. यासंदर्भात सर्व संबंधित घटकांशी चर्चा करुन कामाची आखणी करण्यात येईल असेही ॲड शेलार यांनी सांगितले. त्या संदर्भात आज मंत्रालय येथील दालनात बैठक झाली.

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पुरातत्व विभागामार्फत तुळजापुरच्या भवानी मातेचे मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला असून त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. हा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. तसेच मंदिराच्या परिसरात सध्या दोन एजन्सीमार्फत दुरुस्ती आणि डागडुजीचे काम सुरु आहे. यामध्ये समन्वय साधून त्यांच्याकडून कालबद्ध नियोजन घेण्याचे निर्देश ॲड.शेलार यांनी दिले.

तुळजाभवानीच्या मंदिरात देखील ड्रेस कोड लागू करण्याची मागणी
काही दिवसांपूर्वी सिद्धीविनायक मंदिरात प्रेवश करतााना भाविकांनी पारंपारिक पोशाख परिधान करुन यावं असा निर्णय मंदिराच्या व्यवस्थापनाने दिला. धार्मिक स्थळांना भेट देताना आपल्या संस्कृतीचं पालन व्हावं हा हेतू असल्याचं मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितलं आहे. याचपार्श्वभूमीवर आता आई तुळजाभवानीच्या मंदिरात देखील भाविकांनी पारंपारिक पोशाख परिधान कारावा अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून निवेदनद्वारे मागणी करण्यात आली आहे.

विविध तीर्थक्षेत्र विकासासाठी 305 कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदीर परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी दर्शन मंडप व दर्शन रांग सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. भगूर (जि. नाशिक) येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क साकारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या 40 कोटी रुपयांच्या प्रस्तावास तसेच पहिल्या टप्प्यातील 15 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. अमळनेर (जि. जळगांव)येथील देशातील एकमेवाद्वितीय अशा मंगळग्रह देवस्थानाच्या 25 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.

हेही वाचा: विविध तीर्थक्षेत्र विकासासाठी 305 कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी! पंढरपुर मंदिरामध्ये भाविकांना मिळणार ‘ही’ सुविधा

सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशय-मौजे मुनावळे येथील जलक्रीडा पर्यटन सुविधा (ता.जावळी, जि.सातारा)साठी 47 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली. हे सर्व प्रस्ताव पर्यटन विभागाने सादर केले. त्याबाबत सविस्तर सादरीकरण व त्यातील प्रकल्प आणि सुविधांची माहिती सादर केली. ग्रामविकास विभागाने सादर केलेल्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी ऋणमोचन येथील 18 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच श्री क्षेत्र गहिनीनाथगड (जि. बीड) च्या विकास आराखड्यातील 2 कोटी 67 लाखांच्या कामांस मान्यता देण्यात आली.

Web Title: Minister ashish shelar sadi coordination meeting soon regarding the renovation of tuljabhavani mata mandir tuljapur latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 11:33 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Tuljabhavani
  • tuljapur news

संबंधित बातम्या

Navratri 2025 : कुठे आई माऊली तर कुठे आई राजा देवीच्या जषघोषाचा नेमका अर्थ काय ?
1

Navratri 2025 : कुठे आई माऊली तर कुठे आई राजा देवीच्या जषघोषाचा नेमका अर्थ काय ?

Sharadiya Navratri 2025 : रंग राखाडी; बुद्धीमत्ता आणि साहस देवी कात्यायनीचं महात्म्य
2

Sharadiya Navratri 2025 : रंग राखाडी; बुद्धीमत्ता आणि साहस देवी कात्यायनीचं महात्म्य

“डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र…”; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?
3

“डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र…”; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?

Ahilyanagar : बुऱ्हाणनगर तुळजाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना
4

Ahilyanagar : बुऱ्हाणनगर तुळजाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.