Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhananjay Munde: “…तरी काही फायदा होणार नाही”; मंत्री धनंजय मुंडे आक्रमक, ‘या’ प्रकरणावर केलं भाष्य

मी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयात सोबत उभा राहिलो. अनेक आंदोलने, मोर्चे यात सहभागी झालो, असे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 19, 2025 | 04:33 PM
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर 'या' नेत्याकडे असणार आता मंत्रिपदाचा भार; महत्त्वाची माहिती समोर...

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर 'या' नेत्याकडे असणार आता मंत्रिपदाचा भार; महत्त्वाची माहिती समोर...

Follow Us
Close
Follow Us:

शिर्डी: शिर्डी येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला पक्षाचे राज्यभरातील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यकक्ष, मंत्री, आमदार उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीत चांगले यश प्राप्त केल्यानंतर आता येणारया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच पक्षाची पुढील वाटचाल याबाबत या शिबिरात चर्चा होण्याची शक्यता आहे. या शिबिराला धनंजय मुंडे उपस्थित होते. त्यांनी यावेळी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.

शिर्डी येथील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या शिबिरातून बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “मी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयात सोबत उभा राहिलो. अनेक आंदोलने, मोर्चे यात सहभागी झालो. संपूर्ण राज्य फिरलो. मात्र आता बीड जिल्ह्यातील एक हत्या प्रकरणाच्या माध्यमातून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महायुतीचे नेते माझ्यावर टीका करत आहेत, याचे वाईट वाटते.”

पुढे बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “माझ्या कठीण काळामध्ये देखील संपूर्ण पक्ष आणि अजित पवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आज मला निराधार आणि बिनबुडाचे कितीही आणि कसले आरोप करून अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला तरी काही फायदा होणार नाही. कारण मी अभिमन्यू नाही तर अर्जुन आहे. अजित पवारांनी बीडचे पालकत्व स्वीकारले याचा आनंद आहे. बीड जिल्ह्यात झालेली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही दुर्दैवी आणि संतापजनक आहे.”
पालकमंत्रीपदाचा पत्ता कट होताच मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

राज्यात मागील वर्षी विधानसभा निवडणूक पार पडली. राज्यात जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. खातेवाटप झाले. मात्र पालकमंत्रीपदाचे वाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राजकीय नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु होती. शेवटी हा तिढा राज्य सरकारने सोडवला आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांना बीड व कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आले नाही. त्यावरून आता मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: Dhananjay Munde On Beed: पालकमंत्रीपदाचा पत्ता कट होताच मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सद्यस्थितीत मला…”

दरम्यान पालकमंत्रीपदाच्या यादीमध्ये स्थान न मिळलयानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान त्यांनी ट्वीटमध्ये काय म्हंटले आहे ते पाहुयात.

“बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे. बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती.

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे. बीड… pic.twitter.com/03SR9zzMXT — Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 18, 2025

त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो. सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.”

Web Title: Minister dhananjay munde statement shirdi ncp adhiveshan beed santosh deshmukh case crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • Santosh Deshmukh
  • shirdi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.