
मोठी बातमी! 'दादां'च्या आणखी एका मंत्र्याची विकेट; 'त्या' प्रकरणात Manikrao Kokate यांचा राजीनामा
माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार
कोकाटे यांनी घेतली हायकोर्टात धाव
अखेर कोकाटे यांनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा
मुंबई: राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे असणारी सर्व खाती अजित पवारांकडे सोपवण्यात आली आहेत. नाशिक जिल्ह्यातील सदनिका घोटाळा प्रकरण माणिकराव कोकाटे यांना चांगलेच भोंवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांची खाती अजित पवार यांच्याकडे सोपवावी अशी शिफारस केली होती असे समोर येत आहे. त्यानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत अजित पवार यांच्याकडे खात्यांचा कारभार सोपवला आहे.
राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता असताना त्यांची तब्येत बिघडली असल्याचे समोर येत आहे. मुंबईतील एका रूग्णालयात ते उपचार घेत आसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर हायकोर्ट काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
माणिकराव कोकाटे आजारी असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील रूग्णालयात ते उपचार घेत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान कोर्टाने त्यांना अटकेचे आदेश काढण्यात आले आहेत. तातडीने अटक करावी किंवा पोलिसांना शरण जावे असे आदेश देण्यात आले आहेत. २ वर्षांपेक्षा जास्तीची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. त्यामुळे कोकाटे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.