Nitesh Rane On Adtya Thackeray: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळए राज्यात काही नवीन समीकरणे पहायला मिळण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्रित येण्याच्या चर्चा जोर धरत आहेत. त्यातच आज मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
आज मंत्री नितेश राणे हे धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावले त्यांनी एक राज्याचे राजकारण बदलून जाईल असे वक्तव्य केले. त्यांच्या वकतव्याने राजकीय खळबळ उडाली आहे. डिनो मोरिया यांच्या प्रकरणात नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे.
डिनो मारिया प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि या प्रकरणावरून दुर्लक्ष व्हावे यासाठी राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असल्याचे राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगाची वारी करू शकतो असे खळबळजनक वकव्य राणे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच नवीन चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई नालेसफाई प्रकरणात डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. डिनो मोरियाच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. याच प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो असे राणे म्हणाले आहेत.