Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar : शिक्षकांच्या घरात ऐन सणासुदीत आर्थिक अंधार! प्रशासकीय दिरंगाईमुळे 40 कंत्राटी शिक्षक 6 महिन्यांपासून वेतनाविना

Mira Bhayandar Schools Contract Teachers : मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांत अध्यापन करणाऱ्या ४० कंत्राटी शिक्षकांचा सेवा मुदतवाढीचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या लालफितीत अडकल्याने त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून मान मिळालेले नाही.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 09, 2026 | 06:41 PM
शिक्षकांच्या घरात ऐन सणासुदीत आर्थिक अंधार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

शिक्षकांच्या घरात ऐन सणासुदीत आर्थिक अंधार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • शिक्षकांच्या घरात ऐन सणासुदीत आर्थिक अंधार!
  • प्रशासकीय दिरंगाईमुळे 40 कंत्राटी शिक्षक 6 महिन्यांपासून वेतनाविना
  • पालिकेच्या कारभारावर संताप
Mira Bhayandar Schools Contract Teachers : विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांच्याच घरात ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक अंधार पसरला आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांत ज्ञानदानाचे कर्तव्य बजावणाऱ्या ४० कंत्राटी शिक्षकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. शिक्षण विभागातील प्रशासकीय दिरंगाईमुळे सेवा मुदतवाढीचा प्रस्ताव लालफितीत अडकल्याने ही नामुष्की ओढवली असून, पालिकेच्या कारभारावर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.( Mira Bhayandar Schools Contract Teachers )

Nilesh Sambare Case: राजकीय वैमनस्यातून दाखल केला ‘तो’ गुन्हा! नीलेश सांबरे प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे ताशेरे

प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक

पालिकेच्या अखत्यारीत मराठी, हिंदी, उर्दू आणि गुजराती माध्यमांच्या ३६ शाळा कार्यरत असून, त्यात १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कायमस्वरूपी शिक्षकांची पदे रिक्त असल्याने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांच्या अध्यापनासाठी वर्षभरापूर्वी ४० कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. या शिक्षकांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यातच संपुष्टात आला. सेवा नियमानुसार कार्यकाळ संपण्यापूर्वीच मुदतवाढीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते; मात्र शिक्षण विभागाच्या हेळसांडीमुळे हा प्रस्ताव वेळेत मंजूर झाला नाही. पर्यायाने शिक्षकांचे वेतनही अडकले.

प्रशासनाच्या चुकीची शिक्षा प्रामाणिक शिक्षकांना कशासाठी ?

गेल्या सहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. घराचे भाडे, मुलांचे शैक्षणिक शुल्क, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन घरखर्च भागवताना शिक्षकांची मोठी दमछाक होत आहे. पालिकेचे उंबरठे वारंवार झिजवूनही केवळ आश्वासनेच मिळत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही प्रामाणिकपणे शिकवले; मग प्रशासनाच्या चुकीची शिक्षा आम्हाला का? असा सवाल शिक्षक विचारत आहेत.

आयुक्तांच्या आदेशाची प्रतीक्षा

या गंभीर प्रश्नावर महापालिकेच्या शिक्षण, कला, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती स्नेहा पांडे यांनी पालिका आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा पाठपुरावा केला आहे. करून
आयुक्तांकडून लवकरच स्वाक्षरी होऊन आदेश निघेल आणि थकीत वेतन अदा करण्यासोबतच कार्यकाळाला मुदतवाढ दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
आता पालिकेकडून प्रत्यक्षात दिलासा मिळणार की शिक्षकांची दिवाळी आर्थिक विवंचनेतच जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ashram Shala Audit Palghar : अनुदान लाटणाऱ्या आश्रमशाळा सरकारच्या रडारवर! होणार झाडाझडती; त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट सुरु

Web Title: Mira bhayandar contract teachers salary delayed education department marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Teacher

संबंधित बातम्या

Sewerage Project : भुयारी गटार योजनेवर आणखी ४७६ कोटींची उधळपट्टी? पहिल्या टप्प्याचे काम अपूर्ण असतानाच दुसऱ्या टप्प्याला मंजुरी
1

Sewerage Project : भुयारी गटार योजनेवर आणखी ४७६ कोटींची उधळपट्टी? पहिल्या टप्प्याचे काम अपूर्ण असतानाच दुसऱ्या टप्प्याला मंजुरी

Mira Bhayandar News: महासभेतील गोंधळ रोखण्यासाठी SOP; पण त्याच नियमावलीवरून महासभेतच रणकंदन!
2

Mira Bhayandar News: महासभेतील गोंधळ रोखण्यासाठी SOP; पण त्याच नियमावलीवरून महासभेतच रणकंदन!

Central Railway Controversy: महाराष्ट्रात मराठी गाण्यांऐवजी भोजपुरी गाणी का? मध्य रेल्वेच्या निर्णयावर मराठी संघटनांचा संताप
3

Central Railway Controversy: महाराष्ट्रात मराठी गाण्यांऐवजी भोजपुरी गाणी का? मध्य रेल्वेच्या निर्णयावर मराठी संघटनांचा संताप

Mira Bhayandar News: स्वच्छ सर्वेक्षणात मिरा-भाईंदरची घसरण; देशात अव्वल ठरलेल्या शहराची यंदा पिछेहाट!
4

Mira Bhayandar News: स्वच्छ सर्वेक्षणात मिरा-भाईंदरची घसरण; देशात अव्वल ठरलेल्या शहराची यंदा पिछेहाट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.