Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Railway Controversy: महाराष्ट्रात मराठी गाण्यांऐवजी भोजपुरी गाणी का? मध्य रेल्वेच्या निर्णयावर मराठी संघटनांचा संताप

Central Railway Controversy: रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्याच्या निर्णयावरून मीरा-भाईंदरमध्ये वाद निर्माण झाला आहे. मराठी संघटनांनी मध्य रेल्वेच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. गोवर्धन देशमुख आणि सिद्धेश राणे यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत रेल्वे प्रशासनाला सवाल केले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2026 | 04:58 PM
महाराष्ट्रात मराठी गाण्यांऐवजी भोजपुरी गाणी का? मध्य रेल्वेच्या निर्णयावर मराठी संघटनांचा संताप

महाराष्ट्रात मराठी गाण्यांऐवजी भोजपुरी गाणी का? मध्य रेल्वेच्या निर्णयावर मराठी संघटनांचा संताप

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवल्याने वादंग
  • मीरा-भाईंदरमधील मराठी संघटना आक्रमक
  • गोवर्धन देशमुख आणि सिद्धेश राणे यांचा मध्य रेल्वेच्या निर्णयाचा तीव्र निषेध
  • महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला सवाल
विजय काते, भाईंदर : मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील रेल्वे स्थानकांवर छटपूजेच्या निमित्ताने भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकाराचा मीरा-भाईंदर शहरातील मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख तसेच प्रजा हित संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश राणे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. (Central Railway Controversy)

मध्य रेल्वेच्या भूमिकेवर नाराजी

महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी मध्य रेल्वेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. छटपूजेनिमित्त उत्तर भारतात जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वेकडून देण्यात आले आहे. मात्र, रेल्वेच्या या स्पष्टीकरणानंतरही मराठी संघटनांचा संताप कमी झालेला नाही.

Mumbai News : मुंबईत भोजपुरी गाण्यांचा वाद पेटला! दररोज 60 हजार प्रवासी म्हणून भोजपुरी गाणी? रेल्वेचं अजब स्पष्टीकरण

रेल्वे प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का?

मराठी एकीकरण समिती आणि प्रजा हित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत, ‘तुम्ही महाराष्ट्रात आहात, याचे भान ठेवा. मुंबई रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणी लावणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला.
या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधण्यात आला. मतांच्या राजकारणासाठी महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे का? महाराष्ट्राचे बिहार का करत आहात? महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे? अशा शब्दांत गोवर्धन देशमुख आणि सिद्धेश राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

रेल्वे प्रशासनाने स्थानिक भाषेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा विचार करावा, अशी भूमिका या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. रेल्वे स्थानकांवरील भोजपुरी गाण्यांचा मुद्दा आता राजकीय आणि भाषिक वादाचे स्वरूप धारण करण्याची शक्यता असून, मध्य रेल्वे प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: रेल्वे स्थानकांवर कोणत्या गाण्यांमुळे वाद निर्माण झाला आहे?

    Ans: रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवल्याने वाद निर्माण झाला आहे.

  • Que: . या निर्णयाला कोणत्या संघटनांनी विरोध केला आहे?

    Ans: मीरा-भाईंदरमधील मराठी संघटनांनी मध्य रेल्वेच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

  • Que: या निर्णयाविरोधात कोण आक्रमक झाले आहेत?

    Ans: गोवर्धन देशमुख आणि सिद्धेश राणे यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध करत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

Web Title: Bhojpuri songs railway stations mira bhayandar marathi organisations protest sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • central railway
  • mira bhayandar
  • railway

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: स्वच्छ सर्वेक्षणात मिरा-भाईंदरची घसरण; देशात अव्वल ठरलेल्या शहराची यंदा पिछेहाट!
1

Mira Bhayandar News: स्वच्छ सर्वेक्षणात मिरा-भाईंदरची घसरण; देशात अव्वल ठरलेल्या शहराची यंदा पिछेहाट!

Megablock: कसारा मार्गावरील प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा १३ आणि १४ नोव्हेंबरला मध्यरात्री विशेष ब्लॉक
2

Megablock: कसारा मार्गावरील प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा १३ आणि १४ नोव्हेंबरला मध्यरात्री विशेष ब्लॉक

Mira Bhayandar: मीरा-भाईंदरमध्ये आगींचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग
3

Mira Bhayandar: मीरा-भाईंदरमध्ये आगींचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!
4

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.