Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Ganeshotsav 2026: मीरा-भाईंदर शहरात गणेश विसर्जन सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावे यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यंदा मुंबईच्या धर्तीवर ‘झेडपी’च्या माध्यमातून मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, एकावेळी चार मूर्ती नेणे शक्य होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 25, 2026 | 01:52 PM
गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज

गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज

Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या धर्तीवर मीरा-भाईंदरमध्ये नवी व्यवस्था
  • ‘जेट्टीमधून एकावेळी चार गणेशमूर्तींचे विसर्जन
  • मीरा-भाईंदरमध्ये विसर्जनाला मिळणार वेग, गर्दी कमी करण्यासाठी विशेष नियोजन
विजय काते, मीरा-भाईंदर : गणेशोत्सवाच्या सांगतेला होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. शहरातील विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, वेगवान आणि सुरळीत पार पडावी यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या विसर्जन व्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मुंबईच्या धर्तीवर ‘जेट्टीमधून’च्या माध्यमातून मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची करण्यात आलेली व्यवस्था. मोठ्या मूर्तींचे विसर्जन करताना लागणारा वेळ आणि मनुष्यबळ लक्षात घेता ही विशेष यंत्रणा उपयोगी ठरण्याची अपेक्षा आहे.

या व्यवस्थेच्या माध्यमातून एकावेळी चार गणेशमूर्ती नेणे शक्य होणार आहे. त्यामुळे एका पाठोपाठ मोठ्या मूर्तींचे विसर्जन अधिक वेगाने करता येईल. परिणामी विसर्जनस्थळांवर मोठ्या गणेशमूर्तींच्या रांगा लागणे, भाविकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणे आणि गर्दी वाढणे अशा समस्या कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील प्रमुख विसर्जनस्थळांवर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणाही सज्ज राहणार आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे.

मोठ्या गणेशमूर्तींसोबत येणारे मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक यांची गर्दी नियंत्रित करणे, विसर्जनस्थळांवरील प्रक्रिया नियोजनबद्ध ठेवणे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देणे, यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाने गणेश मंडळे आणि नागरिकांना निश्चित केलेल्या विसर्जनस्थळांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच विसर्जनावेळी पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. एकूणच, मोठ्या गणेशमूर्तींसाठी ‘झेडपी’ची विशेष व्यवस्था आणि एकावेळी चार मूर्ती नेण्याची सुविधा यामुळे यंदा मीरा-भाईंदरमधील गणेश विसर्जन प्रक्रिया अधिक वेगाने पार पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

गणेशोत्सवातील अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा विधी म्हणजे गणपती विसर्जन. घराघरांत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विराजमान झालेल्या गणरायाला ठरलेल्या दिवशी भक्तिभावाने निरोप दिला जातो. *‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’*च्या जयघोषात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.

गणेशोत्सवात दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस तसेच गौरी-गणपतीनंतर अनेक भाविक आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. सार्वजनिक मंडळांच्या आणि अनेक घरगुती गणपतींच्या विसर्जनाचा मोठा सोहळा अनंत चतुर्दशीला होत आहे.

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप

Web Title: Mira bhayandar municipal corporation ready for ganesh idol immersion special zp system for large idols

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • maharashtra
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
2

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
3

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
4

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.