Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा ! ICU मध्ये असलेल्या महिलेचा हात उंदराने कुडतरला; प्रतिष्ठीत रुग्णालयाचा भोंगळ कारभार

हॉस्पीटलमधील ICU मध्ये रुग्णांची विशेष काळजी घेतली जाते. मात्र हाच ICU आता जीवावर बेतण्याचं कारण ठरला आहे. मीरा भाईंदरमधील नामांकित हॉस्पीटलचा हलर्जीपणा समोर आला असून संताप व्यक्त केला जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 16, 2026 | 01:32 PM
अरे देवा ! ICU मध्ये असलेल्या महिलेचा हात उंदराने कुडतरला; प्रतिष्ठीत रुग्णालयाचा भोंगळ कारभार
Follow Us
Follow Us:
  • ICU मध्ये असलेल्या महिलेचा हात उंदराने कुडतरला
  • प्रतिष्ठीत रुग्णालयाचा भोंगळ कारभार
हॉस्पीटलमधील ICU मध्ये रुग्णांची विशेष काळजी घेतली जाते. मात्र हाच ICU आता जीवावर बेतण्याचं कारण ठरला आहे. मीरा भाईंदरमधील नामांकित हॉस्पीटलचा हलर्जीपणा समोर आला असून संताप व्यक्त केला जात आहे. भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) ८९ वर्षीय वृद्ध महिलेला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. अतिदक्षता विभागात सामान्य माणसांना जाण्यास परवानगी मिळता मिळत नाही त्या ICU मघ्ये या वृद्ध महिलेचा हात उंदराने कुडतरल्याची घटना समोर आली आहे. या रुग्णालयाच्या ICU मध्ये उंदरांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. अक्षरशः या उदंरामुळे रुग्णांच्या जीवावर बेतलं जात असून देखील रुग्णालयातील आरोग्य विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. ICU सारख्या अतिदक्षता विभागात होणाऱ्या या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुहासिनी माठेकर (वय 89 वर्ष) असं या वृद्ध महिलेचे नाव आहे. तब्येत चिंताजनक असल्यामुळे हा महिलेला पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल रात्रीच्या सुमारास ICU मधल्या एका उंदिराने या महिलेच्या हाताला कुडतडण्यास सुरुवात केली. सकाळी जेव्हा नातेवाईक भेटण्यासाठी आले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद

अक्षरश: या उंदराने कुडतडल्यामुळे य़ा महिलेच्या हाताला जखम देखील झाली. हाताला नेमकं झालं तरी काय म्हणून जेव्हा पाहायला नातेवाईक गेले तेव्हा उंदिर पळून गेला. अतिदक्षता विभागात 24 तास डॉक्टर आणि नर्स रुग्णांच्या सेवेसाठी असतात. मात्र तरी देखील रात्रभर एका वृद्ध महिलेला उंदीर कुरतडत होता ही एवढी गंभीर बाब कर्मचाऱ्यांच्या साधी लक्षात देखील आली नाही. याबद्दल नातेवाईकांनी हॉस्पीटलच्या प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
“जर आयसीयूमध्ये रुग्ण सुरक्षित नसतील, तर मग उपचार घ्यायचे कुठे?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या घटनेने रुग्णालयातील अस्वच्छता आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे पितळ उघडे पडले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे..पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Bhayander News : मानवी वस्तीत मगरीचा मुक्त संचार; मांडवी पाडा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 

 

Web Title: Mira bhayander woman in the icu had her hand bitten by a rat shocking incident at pandit bhimsen joshi hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Health News
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Health: ‘औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची…’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले ‘हे’ स्पष्ट निर्देश
1

Health: ‘औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची…’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले ‘हे’ स्पष्ट निर्देश

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन
2

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स
3

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार
4

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.