Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये आगीचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग; फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mira Bhayandar News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर शहरात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शनिवारी रात्री २२, तर रविवारी रात्री तब्बल १०७ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. दोन दिवसांत एकूण १२९ घटनांची नोंद झाल्याने अग्निसुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 09, 2026 | 03:03 PM
मीरा-भाईंदरमध्ये आगीचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग; फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मीरा-भाईंदरमध्ये आगीचा भडका! दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग; फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Follow Us
Follow Us:
  • मीरा-भाईंदर शहराला आगीच्या घटनांची धोक्याची घंटा!
  • दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग लागल्याच्या घटना
  • फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
विजय काते, मिरा-भाईंदर : दिवाळीच्या सणात फटाक्यांच्या आतषबाजीचा उत्साह मीरा-भाईंदर शहरासाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरात अवघ्या दोन दिवसांत तब्बल १२९ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये रविवारी रात्री सर्वाधिक १०७ घटनांची नोंद झाली, तर शनिवारी रात्री २२ ठिकाणी आग लागली होती. आगीच्या घटनांमध्ये अचानक झालेल्या या वाढीमुळे शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Mira Bhayandar News)

रविवारी रात्री आगीच्या १०७ घटना

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री मीरा-भाईंदर शहरातील विविध भागांत आगीच्या घटनांची नोंद झाली. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, सहा फायर स्टेशनच्या हद्दीत एकूण १०७ घटनांची नोंद झाली आहे.

फायर स्टेशननिहाय घटनांची आकडेवारी पुढीलप्रमाणे

फायर स्टेशन आगीच्या घटना
उत्तन फायर स्टेशन  २
नवघर फायर स्टेशन  १४
कनकिया फायर स्टेशन ३०
सिल्वर पार्क फायर स्टेशन १९
पेणकर पाडा फायर स्टेशन  १५
स्व. कल्पना चावला फायर स्टेशन २७
एकूण  १०७
– –

या आकडेवारीनुसार कनकिया फायर स्टेशनच्या हद्दीत सर्वाधिक ३० घटनांची नोंद झाली. त्यापाठोपाठ स्व. कल्पना चावला फायर स्टेशनच्या हद्दीत २७, तर सिल्वर पार्क फायर स्टेशनच्या हद्दीत १९ घटना घडल्या.

Dharashiv: “पुण्याहून सणाला घरी आली अन्…” फटाक्यांच्या की शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने घेतला ६ जणांचा बळी; गावकऱ्यांनी JCB ने…

शनिवारीही २२ ठिकाणी आगीच्या घटना

रविवारच्या तुलनेत शनिवारी आगीच्या घटनांची संख्या कमी असली, तरी त्या रात्रीही शहरात २२ ठिकाणी आग लागली होती. शनिवारी आणि रविवारी घडलेल्या घटनांची एकत्रित संख्या १२९ वर पोहोचली आहे. सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडल्याने अग्निशमन विभागाच्या यंत्रणेवरही ताण निर्माण झाल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

नियमबाह्य फटाक्यांच्या दुकानांवर कारवाई कधी?

शहरात अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने फटाक्यांची दुकाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. फटाक्यांची विक्री करण्यासाठी आवश्यक परवानग्या, अग्निसुरक्षेची साधने आणि सुरक्षिततेच्या नियमांची तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र, अशा दुकानांवर प्रभावी कारवाई होत नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, निवासी भाग आणि सार्वजनिक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत फटाके फोडले जात आहेत. काही ठिकाणी पहाटेपर्यंत आतषबाजी सुरू राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषणासोबतच आगीच्या दुर्घटनांचा धोकाही वाढत आहे.

मोठी दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का?

दोन दिवसांत १२९ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडत असताना महापालिका आणि पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनधिकृत फटाक्यांच्या दुकानांवर तातडीने कारवाई करावी, नियमबाह्य आतषबाजी रोखावी आणि अग्निसुरक्षेच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

दिवाळीचा आनंद साजरा करताना नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही मीरा-भाईंदरमधील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Fire Incidents: “लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबई अन् ठाण्यात कुठे काय घडलं? १७ मजली इमारतीला आगीसह अनेक ठिकाणी अग्नितांडव…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मीरा-भाईंदर शहरात दोन दिवसांत किती आगीच्या घटना घडल्या?

    Ans: मीरा-भाईंदर शहरात दोन दिवसांत एकूण १२९ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. शनिवारी रात्री २२, तर रविवारी रात्री १०७ घटनांची नोंद झाली.

  • Que: रविवारी रात्री सर्वाधिक आगीच्या घटना कोणत्या फायर स्टेशनच्या हद्दीत घडल्या?

    Ans: कनकिया फायर स्टेशनच्या हद्दीत सर्वाधिक ३० घटनांची नोंद झाली. त्यानंतर स्व. कल्पना चावला फायर स्टेशनच्या हद्दीत २७ घटना घडल्या.

  • Que: मीरा-भाईंदरमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होण्यामागे कोणत्या बाबींवर प्रश्न उपस्थित होत आहेत?

    Ans: दिवाळीतील फटाक्यांची आतषबाजी, पहाटेपर्यंत फटाके फोडणे आणि नियमबाह्य फटाक्यांच्या दुकानांमुळे आगीचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या अग्निसुरक्षा उपाययोजनांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Web Title: Mira bhayandar fire incidents 129 cases in two days diwali fireworks sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Diwali
  • Fire
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

BhauBeej 2026: ओवाळणीच्या ताटात पैसे का ठेवतात? जाणून घ्या त्यामागील धार्मिक महत्त्व आणि कारणे
1

BhauBeej 2026: ओवाळणीच्या ताटात पैसे का ठेवतात? जाणून घ्या त्यामागील धार्मिक महत्त्व आणि कारणे

BhauBeej 2026: भाऊबीजेला बाजारातील मिठाईऐवजी बनवा हे पौष्टिक लाडू; चविष्ट आणि आरोग्यासाठीही फायदेशीर
2

BhauBeej 2026: भाऊबीजेला बाजारातील मिठाईऐवजी बनवा हे पौष्टिक लाडू; चविष्ट आणि आरोग्यासाठीही फायदेशीर

Shambhuraj Desai: शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद! पालकमंत्री शंभूराज देसाई यांची शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी
3

Shambhuraj Desai: शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद! पालकमंत्री शंभूराज देसाई यांची शेतकऱ्यांसोबत बांधावर दिवाळी

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम
4

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.