Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद
“हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे…”; अजितदादांच्या आठवणींने सुनीलकुमार मुसळे भावूक
प्राधिकरणाच्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) मेट्रो-१२ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. कल्याण तळोजा मार्गावर सुरू असलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी कल्याण-शिळ रस्त्यावर विविध ठिकाणी मोठ्या आकाराचे गार्डर बसविणे, पिलर उभारणे तसेच जड यंत्रसामग्री उभी करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे काही ठिकाणी रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत असल्याने वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाहतुकीची सुरक्षितता आणि सुरळीतता राखण्यासाठी वाहतुक निबंध लागू केले आहेत. (फोटो सौजन्य – AI Created)
या सर्व टप्प्यांमध्ये वाहतुकीचे नियोजन करून वाहतूक पोलिसांकडून आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्बंधांचा परिणाम मुख्यत्वे रात्रीच्या वाहतुकीवर होणार असला तरी वाहनचालकांनी संबंधित कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा, पोलिस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
टप्या १- ६ मार्च ते १० मार्च या कालावधीत दररोज रात्री ११.५५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कल्याण – शिळ रोडवरून शिळफाटा ते कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सोनारपाडा पिलर क्रमांक १८० येथे प्रवेशबंदी करण्यात येणार आहे, या काळात संबंधित वाहने सोनारपाडा पिलर परिसरातून डावीकडे वळून सर्विस रोडमार्गे पुढे जाऊन डी. एन. एस. चौक मार्गे आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकतील.
टप्पा २- ११ मार्च ते १८ मार्च या कालावधीत त्याच वेळेत विक्रमानगर पिलर क्रमांक १०५ येथे वाहतूक रोखण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनचालकांनी विक्रमानगर परिसरातून सर्विस रोडचा वापर करून पुढील मार्गक्रमण करावे.
Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक
टप्पा ३ – १९ मार्च ते २५ मार्चदरम्यान मानपाडा चौक पिलर क्रमांक २०० परिसरात वाहतुकीवर निबंध लागू राहतील. या काळातही वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
टप्पा ४ – २६ मार्च ते ३१ मार्चदरम्यान सोनारपाडा पिलर क्रमांक १४६ येथे रात्रीच्या वेळेत प्रवेशबंदी लागू राहणार आहे. या काळात वाहनचालकांना सर्विस रोडचा वापर करून डी. एन. एस. चौकमार्गे पुढे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.






