Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून दिशाभूल; काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांची टीका

सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात काही कामे मंजूर केल्याचे जाहीर केले. परंतु, आम्ही मंजूर केलेल्या काही कामांचे श्रेय लाटण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला आहे. ते सांगलीकर जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पृथ्वीराज पाटील यांनी केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 01, 2022 | 05:19 PM
आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून दिशाभूल; काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांची टीका
Follow Us
Close
Follow Us:

सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ (MLA Sudhir Gadgil) यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात काही कामे मंजूर केल्याचे जाहीर केले. परंतु, आम्ही मंजूर केलेल्या काही कामांचे श्रेय लाटण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला आहे. ते सांगलीकर जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी उपमहापौर उमेश पाटील, मंगेश चव्हाण उपस्थित होते.

ते म्हणाले, विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी महाविकास आघाडीने केलेल्या आणि मी आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी सुचवलेल्या कामांचे श्रेय घेतलं आहे. गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेत आहे. पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगली शहर आणि विधानसभा मतदार संघात निधीसाठी कधीही हात आवडता घेतला नाही.

खोतवाडी गावाजवळच्या ओढ्यावरील पुलासाठी १ कोटी ९० लाख रूपयांच्या कामाला, माजी सैनिकाच्या मागणीनुसार त्रिकोणी बागेत शहीद स्मारक उभारले आहे, बिसूर तासगाव रस्ता इजीमा ९६ रस्ता सुधारणा करण्यासाठी, नावरस वाडी ते कर्नाळ रस्त्यावरील लहान पुलासाठी निधी तसेच इनाम धामणी ते स्फुर्ती चौक या रस्त्याच्या २ कोटीच्या कामाला मी स्वतः सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे जाऊन मंजूरी आणलेली आहे.

तसेच माधवनगर नाका ते रेल्वे ओव्हर ब्रीजसाठी २ कोटीचा निधी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी मंजूर करून आणला आहे. याशिवाय पालकमंत्री जयंत पाटील यांनी सागंली सिव्हिल हॉस्पिटलच्या खुल्या जागेत मंजूर असलेले मिरज येथे स्थलांतरीत करण्यात आलेले नवजात शिशू रुग्णालय बांधकाम करणे, ४६ कोटी ७४ लाख मंजूरी आणलेली आहे आणि सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या शिफारसीने मंजूर झालेल्या कामांचा यामध्ये समावेश आहे.

तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने शिफारस केल्यानंतर मंजूर झालेली कामे गाडगीळ यांनी स्वतःच्या नावावर खपविण्याचा उद्योग चालविला आहे. ही जनतेची दिशाभूल आहे. ती त्यांनी थांबवावी, असेही पाटील यावेळी म्हणाले.

महापालिका क्षेत्रासाठी दहा कोटींचा निधी

महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५६ कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाकडून मंजूर झाला असल्याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, या कामांसाठी निधी मंजूर व्हावा अशी मागणी आपण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी या कामांची शिफारस करून ती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करून घेतली. तसेच याकामी सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचेही सहकार्य लाभले.

प्रमुख कामे अशी…

सहकार तपस्वी खा. गुलाबराव पाटील स्मृती उद्यान विकसित करण्याच्या कामाचा समावेश आहे. विश्रामबाग परिसरामध्ये ते विकसीत केले जाणार आहे. याशिवाय सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील रस्ते डांबरीकरण, हॉटमिक्स, आरसीसी गटार, ओपन स्पेस विकसित करणे, उद्यानांचे सुशोभीकरण अशा विविध कामांचा समावेश आहे. त्यानुसार ही कामे मंजूर झाली असून हा निधी ३१ मार्च, २०२३ अखेर खर्च करून सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत.

Web Title: Misleading by mla sudhir gadgil criticism of prithviraj patil in sangli nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2022 | 05:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.