पुणे: पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) यांच्या पत्नीबाबत ही प्रकार घडला असून, उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाने प्रथम दहा लाख रुपये जमा करा, तरच दाखल करून उपचार सुरू केले जातील अशी भूमिका घेतली. या प्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात घडलेल्या प्रकरणावर बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, “मंगेशकर रूग्णालयात घडलेला प्रकार हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असतील त्यांची जात, धर्म न पाहता कारवाई करावी. रूग्णाकडे 10 लाखांची मागणी करणाऱ्या मंगेशकर रूग्णालयावर मनपा आणि इन्कम टॅक्स विभाग काय कारवाई करणार हे देखील स्पष्ट केले जावे.”
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे स्वतंत्र वैद्यकीय कक्ष कार्यरत आहेत. मात्र त्याचा काय फायदा? मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जाऊन देखील त्या महिलेला उपचारांसाठी दाखल करून घेतले नाही. रूग्णालय प्रशासन इतके मग्रूर का आहे याबद्दल सरकारने उत्तर द्यावे. राज्य सरकार हे रूग्णालय ताब्यात घेणार हे देखील सरकारने स्पष्ट करावे.”
The incident at the Deenanath Mangeshkar Hospital in Pune is shocking and needs more urgent attention from Chief Minister directly.
As per all news reports, the hospital refused a lady, in emergency, pregnant with twins, against a demand of fees worth 10,00,000 for admission.…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 5, 2025
भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू
सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी मोनाली या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांना क्रिटीकल परिस्थिती असून, डिपॉझिट म्हणून १० लाख रुपये भरा असे सांगितले. तरच पुढील प्रक्रिया सुरू करू म्हणून उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. त्यांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. नंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला संपर्क देखील करण्यात आला.
Pune News: मंगेशकर रुग्णालयाच्या बेफिकरीमुळे गर्भवतीचा मृत्यू; बावनकुळे म्हणाले, “… ही तर मुघलशाही”
मात्र, तरीही रुग्णालय प्रशासनाने याबाबत काहीही पावले उचलली नाही. सकाळी ९ वाजता आलेली महिला दुपारी दोनपर्यंत त्याच ठिकाणी होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. नंतर महिला अतिरक्तस्त्राव होत असल्याने वाकड येथील एका रुग्णालयात दाखल झाली. त्याठिकाणी उपचार सुरू झाल्यानंतर महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या. परंतु, मोनाली यांचा मृत्यू झाला.