
चिपळूणमध्ये झाला टेम्पोचा अपघात
सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नाही
लोखंडी साहित्य महामार्गावर पसरले
चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील रावतळे-विंध्यवासिनी रस्त्यानजिक गुरुवारी (दि. २६) सकाळी नऊच्या सुमारास लोखंडी सामान वाहून नेणारा टेम्पो अचानक पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. संबंधित टेम्पोमधील लोखंडी साहित्य गाडीच्या दर्शनी भागाकडून घसरत थेट महामार्गावर पसरले. त्याच वेळी मागून येणारा दुचाकीस्वार या साहित्याच्या अंगावर पडण्यापासून थोडक्यात बचावला.
प्रसंगावधान राखत त्याने वाहन बाजूला घेतले. दरम्यान, शाळेची बसही त्या मार्गान जात होती. रस्त्यावर पडलेल्य साहित्यामुळे बसचालकाला वाहन वळस घालून पुढे न्यावे लागले.
Accident News: भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू; राजापूरमधील घटना
पर्यटकांच्या गाडीचा आडवलीत अपघात
गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. यात पाच पैकी तिघेजण जखमी झाले. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना झाली. पलटी झालेली कार तेथील रहिवासी अतुल मंगेश राणे यांच्या शेतमांगरावर आदळल्याने शेतमांगराचेही मोठे नुकसान झाले. भटवाडी पोलिस पाटील सचिन लाड यांनी सहकाऱ्यांसोबत अपघात स्थळी धाव घेऊन सहकार्य केले. कोल्हापूर येथील ५ पर्यटक कारने कणकवली-आचरा मार्गाने तोंडवली येथे जात होते. आडवली-भटवाडी येथे तीव्र वळणाचा चालकाला अंदाज न आल्याने भरधाव कार अनियंत्रित होऊन पलटी झाली.
भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओणी तिवंदामात परिसरात सकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसन्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने एका चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली, एक ट्रक गोवा ते मुंबई या दिशेने जात असताना ओणी सिकंदामाळ येथील एका धान्यासमोर रस्त्याच्या कडेला उभा होता. याच दरम्यान गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुसन्या भरधाव ट्रकने या उभ्या ट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली.
Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम
Test Drive दरम्यान Accident झाला तर?
Test Drive: जेव्हा कोणी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करतो, तेव्हा कार फायनल करण्यापूर्वी ‘टेस्ट ड्राइव्ह’ घेणे ही एक सामान्य आणि आवश्यक पद्धत आहे. तुम्हीही कार खरेदी करताना स्पीड, कंफर्ट, ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आणि फीचर्स तपासण्यासाठी टेस्ट ड्राइव्ह घेतली असेलच. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जर टेस्ट ड्राइव्ह दरम्यान कारचा अपघात झाला तर तिच्या दुरुस्तीचा खर्च नक्की कोण देणार? चालक, शोरूम मालक की विमा कंपनी? चला जाणून घेऊया…