
MLA Anil Patil melava contest in Mahayuti for local body elections 2025 Jalgaon Political News
अमळनेर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमुळे राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. जळगावसह संपूर्ण राज्यात नेत्यांच्या सभा आणि बैठकांचे सत्र वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर अमळनेरमध्ये राजकीय कार्यक्रम पार पडला. भूमिपुत्र माणून मला कार्यकत्यांनी दोन वेळा आमदारकीची संधी दिली, स्मिता वाघांना देखील खासदार केले, आता कार्यकत्यांची निवडणूक असताना आम्ही भांडत न बसता एकदिलाने सोबत राहून काम करू आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देऊ, महायुतीचा पैटर्न राबविला जाईल, असे मत माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अमळनेर तालुका शहर विकास आघाडी पुरस्कृत भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा शहरातील कलागुरु मंगल कार्यालयात पार पडला.
आमदार अनिल पाटील यांनी स्पष्ट केले की, “या निवडणुका महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार लढविण्यात येणार असून, इतर पक्षातील चांगल्या कार्यकत्यांनाही संधी देण्याचा प्रयत्न राहील, जनतेच्या मनात असणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यांनी कार्यकत्यांना विश्वास दिला की, उमेदवार निवड प्रक्रियेसाठी विशेष समिती गठीत करून जनतेच्या मनातील आणि लोकाभिमुख उमेदवारालाच तिकीट दिलं जाईल. खासदार स्मित्ता बाघ तसेच शिवसेना व महायुतीच्या नेत्यांशीही पॉझिटिव्ह चर्चा झाली आहे. यापुढे महायुतीचा मेळावा आपण कदाचित घेऊ,” असे त्यांनी सांगितले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील म्हणाले की, अमळनेरची जनता उदार आहे. मी अपक्ष निवडून आलो आणि माझ्या पत्नीला नगराध्यक्षा चनवले, अनिल पाटलांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी मीच प्रयत्न केले. आम्ही दोघं तसेच खासदार स्मिता वाघ आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याशी चर्चा केली तर अमळनेरमध्ये बिनविरोध निवडणूक होणे अशक्य नाही. वाटल्यास मी माजी आमदार चौधरी यांच्याशी चर्चा करतो, असे सांगून त्यांनी यापुढे मी आणि माझी पत्नी कोणतीही निवडणूक लढवणार नाही मात्र राजकारणात सक्रिय राहील, असेही सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, इम्रान खाटिक, माजी जि.प. सदस्य अशोक पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील आणि माजी नगराध्यक्षा भारती चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
व्यासपीठावर हे होते मान्यवर…
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, भारती चौधरी, विनोद पाटील, नाना रतन चौधरी, तसेच कृउबा सभापती अशोक पाटील, जितेंद्र सावक प्रभाकर पाटील, अशोक आधार पाटील, तिलोतमा पाटील, डॉ. अशोक पाटील, बिरजू लांबोले, गिरीश पाटील, प्रमीण साहेबराव पाटील सतार मास्तर शाम जबीराण आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भागवत पाटील यानी केले, तर सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले आणि आभार जिल्हाध्यक्ष संजय प्यार यांनी मानले.