Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी चिंचवडमध्ये “कमळ”च फुलणार! आगामी महापौर भाजपाचाच; आमदार महेश लांडगेंचा दावा

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा 'जैसे थे' ठेवून येत्या चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जाहीर करा, असेदेखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 06, 2025 | 09:55 PM
पिंपरी चिंचवडमध्ये "कमळ"च फुलणार! आगामी महापौर भाजपाचाच; आमदार लांडगेंचा दावा

पिंपरी चिंचवडमध्ये "कमळ"च फुलणार! आगामी महापौर भाजपाचाच; आमदार लांडगेंचा दावा

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात भाजपच्या माध्यमातून विकासाची गंगा आली.  समाविष्ट गावांमध्ये अनेक महत्त्वाची कामे करण्यात आली. प्रशस्त रस्ते चांगल्या मूलभूत सुविधा व सार्वजनिक वाहतूक सेवेला प्राधान्य यामुळे नागरिकांनी पिंपरी-चिंचवड शहराला निवासी करण्यासाठी पसंती दिली हे वाढत्या गृहनिर्माण संस्थांमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिक भाजपा सोबतच राहतील. महापालिकेत भाजपचाच महापौर असेल, असा विश्वास भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेली पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अखेर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याचे आता स्पष्ट झाले आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ‘जैसे थे’ ठेवून येत्या चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जाहीर करा, असेदेखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड ही उद्योग नगरी आहे. अनेकांच्या हाताला काम देणारे औद्योगिक नगरी आहे. त्यामुळे या शहरात येणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळतील. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल. प्रशस्त रस्ते असतील आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक मिळेल या दृष्टीने नियोजन करण्यात आले. 2014 नंतर या शहरांमध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगा अवतरली आहे.

गेल्या दहा वर्षांमध्ये साडेबारा टक्के परतावा देऊन भूमिपुत्रांना न्याय दिला. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी
आंद्रा आणि भामा आसखेड धरणांमध्ये पाणी आरक्षित केले. अतिरिक्त पाणी आपल्याला उपलब्ध झाले. निगडी ते पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर असा मेट्रोचा मार्ग प्रशस्त केला. संविधान भवन, संतपीठ, आरटीओ, न्यायालय संकुल, धर्मवीर संभाजी महाराजांचा सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा, औद्योगिक प्रदर्शन केंद्र अशा अनेक योजनांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहर प्रगतीपथावर आणले आहे. त्यामुळे नागरिकांचा भाजपावर मोठा विश्वास आहे. भाजपाच्या कामाची पोचपावती नागरिक देणार आहेत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

टीपी स्कीम रद्द करण्यासाठी पाठपुरावा!

नगर नियोजन योजनेवरून (टीपी) सध्या संभ्रम निर्माण झाला आहे.भूमिपुत्र आंदोलनाच्या भूमिकेत आहे. प्रशासकीय राजवटीत असा एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही. याबाबत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. चिखली, कुदळवाडी, चऱ्होली संदर्भात कोणत्याही प्रकारचा टीपी लादला जाऊ नये. हा रद्द व्हावा अशी मागणी यापूर्वीच केलेली आहे. 2019 मध्ये महापालिका सभेच्या मान्यतेनुसार “टीपी “ची अंमलबजावणी सुरू झाली होती. दरम्यानच्या काळात याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. आगामी सहा महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणुका होतील आणि भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळामध्ये या पुढील काळात अशा प्रकारे मनमानीपणे निर्णय लादता येणार नाही, अशी नियमावली करणार आहोत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार मानतो. गेल्या दहा वर्षांमध्ये शहरांमध्ये भाजपाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा नियोजनबद्धरित्या विकास झाला. या शहरातील नागरिकांना आणि भूमिपुत्रांना न्याय देत शहर विकासाची भूमिका ठेवली आहे ती आगामी काळातही तशीच राहील. संघटनात्मक पातळीवर पिंपरी चिंचवड आणि भोसरी अशा तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने प्रभावीपणे काम केले आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा ‘कमळ’ फुलेल यात शंका नाही.

– महेश लांडगे
आमदार, भाजपा,  पिंपरी-चिंचवड, पुणे.

Web Title: Mla mahesh landage said mayor of pcmc corporation will from bjp in the local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • Local Body Elections
  • mahesh landge
  • PCMC News

संबंधित बातम्या

Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी
1

Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी

आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोडवर, भुजबळ चौक ते भूमकर चौकातील कामं करणार ‘फास्ट ट्रॅक’वर
2

आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोडवर, भुजबळ चौक ते भूमकर चौकातील कामं करणार ‘फास्ट ट्रॅक’वर

Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…
3

Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…

Indrayani : वारकऱ्यांच्या पवित्र इंद्रायणीला मिळणार नवे रुप; नदी सुधार प्रकल्पाला मिळाली मंजूरी
4

Indrayani : वारकऱ्यांच्या पवित्र इंद्रायणीला मिळणार नवे रुप; नदी सुधार प्रकल्पाला मिळाली मंजूरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.