Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; आयसीयूत उपचार सुरु, प्रकृती स्थिर

औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने मंगळवारी तातडीने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 18, 2022 | 09:22 PM
आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; आयसीयूत उपचार सुरु, प्रकृती स्थिर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने मंगळवारी तातडीने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांना दिली. काही दिवसांपासून ते छातीत दुखण्याची तक्रार करत होते. त्यामुळे औरंगाबाद येथील रुग्णालयात त्यांची तपासणी केली. यातून त्यांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान करण्यात आले. त्यामुळे आता मुंबईत हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान आमदार शिरसाट यांना मंगळवारी सकाळी एअर अॅम्बुलन्सने दाखल केले. सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिरसाट उपस्थित राहिल्यानंतर छातीत दुखण्याच्या तक्रारीने ते बैठकीतून निघाले. त्यांनी छातीत दुखण्याची तक्रार केल्याने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील तपासणीतून संजय शिरसाट यांना यापूर्वी सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले.

तसेच रक्तदाब वाढल्याची बाब प्रामुख्याने दिसून आली. म्हणून डॉक्टरांनी शिरसाट यांची अँजिओग्राफी केली. अँजिओग्राफी झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी मुंबईत उपचार घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना मंगळवारी सकाळी एअर अॅम्बुलन्सने मुंबईत आणण्यात आले. सध्या प्रकृती स्थिर असून निव्वळ देखरेखीसाठी मुंबईला हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी देखील काळजीचे कारण नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Mla sanjay shirsat suffered a heart attack treatment started in icu condition is stable nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2022 | 09:22 PM

Topics:  

  • MAL Sanjay Shirsat
  • Mumbai
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देव पाण्यात! तिर्थक्षेत्र गाठून देवाला साकडे, उमेवारांनी जिंकण्यासाठी केली जोरदार मोर्चेबांधणी 
1

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देव पाण्यात! तिर्थक्षेत्र गाठून देवाला साकडे, उमेवारांनी जिंकण्यासाठी केली जोरदार मोर्चेबांधणी 

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..
3

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
4

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.