
:'प्राजक्ता माळी परळीत कशासाठी येतात'; भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितलं खरं कारण
परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदा ताबा मिळवला आहे. विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातं. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणलं जातं. जर कोणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचं असेल, त्यांनी परळीत यावे आणि याचा प्रसार देशभरात करावा, अशी खोचक टीका भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
महाराष्ट्र पोलीस अॅक्शन मोडमध्ये; थेऊरमध्ये राहणाऱ्या बांगलादेशीवर केली कारवाई
“जर कोणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे.” सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रिटी परळीत येत असतात त्यांच्या तारखा कशा मिळविल्या जातात, याबाबतही सुरेश धस यांनी सांगितलं.
बीडमधील केज तालुक्याच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या हत्येच्या कटातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या गोरख धंद्याला चाप बसवावा या मागणीसाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली.यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. परळीत राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झालं आहे. परळी पॅटर्नचाही उल्लेख करत त्यांनी सपना चौधरी, प्राजक्ता माळी आणि रश्मिका मंदाना यांचाही उल्लेख केला.
Dr. Manmohan Singh Death: “…. हे मी अगदी जवळून पाहिले आहे”; पृथ्वीराज चव्हाण यांनी वाहिली आदरांजली
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाला सुरेश धस यांनी आक्रमकपणे लावून धरलं आहे. आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असताना त्यांनी या हत्या प्रकरणातील आका कुठे, कुठे फिरत आहे, याची माहिती पोलिसांना दिली असल्याचे सांगितले. या आकांचा सहभाग ३०२ च्या गुन्ह्यात आहे, असाही आरोप त्यांनी केला.