Raj Thackeray
मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर आज हीप बोनची शस्त्रक्रिया (Hip Bone Operation) होणार आहे. शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी मनसैनिकांकडून गणेश मंदिरात पूजा (Pooja) आणि हनुमान मंदिरात महाआरती (Maha Aarti) करण्यात आली.
मनसे अध्यक्ष यांची जूनच्या पहिल्या आठवड्यात शस्रक्रिया होणार होती. पण त्यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्यावर त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आज लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना काल काही चाचण्या करण्यासाठी लीलावतीत दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी कार्यकर्त्यांकडून आरती करण्यात आली आहे.
राज ठाकरे हे ५ जूनला आयोध्या दौरा (Ayoddhya Tour) करणार होते पण त्यांना अचानक हीपबोनचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला. त्यानंतर त्यांची जूनच्या पहिल्याच आठवड्यात हीपबोनची शस्त्रक्रिया होणार होती, पण त्यांना कोरोनाची लागण झाली आणि शस्त्रक्रिया पुढे ढकलली.