Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण

Maharashtra Politics : राज ठाकरे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यानंतर पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राजकारणामध्ये काहीही कायमस्वरुपी नसते या आशयाचे वक्तव्य त्यांनी केले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 20, 2026 | 02:41 PM
MNS Raj Thackeray party leader meeting on the future political move and upcoming event

MNS Raj Thackeray party leader meeting on the future political move and upcoming event

Follow Us
Close
Follow Us:
  • मनसे पक्षाचा मुंबईमध्ये पदाधिकारी मेळावा
  • राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यंना मोलाचा सल्ला
  • काहीही कायमस्वरुपी नाही – राज ठाकरे
MNS Raj Thackeray : मुंबई : राज्यामध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या आहेत. यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा फटका बसला. मुंबई महापालिकेसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना मुंबईकरांनी पाठ दाखवली (Maharashtra Politics) बीएमसीवरील 25 वर्षांची ठाकरेंची सत्ता गेली असून यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी सूचक वक्तव्यं केली असून पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

मनसे नेते राज ठाकरे यांनी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाची पुढील राजनीती आणि रोडमॅप याबाबत माहिती दिली आहे. तसेच राज ठाकरेंनी सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागले. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, अविनाश अभ्यंकर, गजानन काळे, अमेय खोपकर आणि अमित ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : राज्यसभा खासदारकीवरुन महाविकास आघाडीमध्ये वादंग? शरद पवार की उद्धव ठाकरे कोणाला मिळणार संधी?

यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले की, आजची महाराष्ट्रातील जी सर्व परिस्थिती आहे. महाराष्ट्र हा सध्या आता आयसीयूमध्ये आहे. सध्या जी काही परिस्थिती आहे, त्याला आपण बाळसं म्हणू शकत नाही. त्याला आपण सूज म्हणू शकतो. ही इतकी विचित्र घाणेरडी सूज आहे की ज्यात अनेकांना असं वाटतं की जे काही सुरु आहे हे कायमस्वरुपी आहे. कायमस्वरुपी काहीही नसतं, असे सूचक वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनामध्ये नक्की काय सुरु आहे याची चर्चा सुरु झाली आहे.

मनसे नेते राज ठाकरे पुढे म्हणाले की, सलमान खानचे वडील सलीम खान नेहमी सांगतात की प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते. त्यामुळे आता जे सत्तेत आहेत, त्यांना एक्सपायरी डेट असणारच आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट कायमस्वरुपी नसते. काँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा अनेकांना असं वाटत होतं की काँग्रेसला कोण हलवणार, पण ती हलली. साधारण ५७ ते ५८ वर्ष ज्यांनी या देशावर राज्य केलं, तो पक्ष आज तुम्हाला चाचपडताना दिसतोय, तीच परिस्थिती यांचीही होणार हे निश्चित आहे. होणार म्हणजे होणार यात काही दुमत नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये विश्वास निर्माण केला.

हे देखील वाचा :  “हा घात की अपघात…”; संजय शिरसाटांचे पवारांच्या विमान अपघातावर भाष्य

मनसे नेते राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना यापूर्वी तुम्ही अनेक आंदोलने केली यानंतर निवडणूकांकडे लक्ष द्या, आपल्याला प्रत्येक जिल्ह्यासाठी संपर्क प्रमुखांची निवड करायची आहे. पक्षाचा कार्यक्रम निवडणूक हाच आहे. आता पुढची 3 वर्ष निवडणूक नाही, त्यामुळे आता पक्ष बांधणीला सुरुवात करा. तसेच येत्या २७ फेब्रुवारी रोजी येणारा मराठी भाषा दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करा, असे आदेश मनसैनिकांना दिले आहेत.

Web Title: Mns raj thackeray party leader meeting on the future political move and upcoming event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Bhiwandi Mayor Election: भाजपला मोठा धक्का! भिवंडी महापौरपदी नारायण चौधरी विराजमान
1

Bhiwandi Mayor Election: भाजपला मोठा धक्का! भिवंडी महापौरपदी नारायण चौधरी विराजमान

Maharashtra Politics: “हा घात की अपघात…”; संजय शिरसाटांचे पवारांच्या विमान अपघातावर भाष्य
2

Maharashtra Politics: “हा घात की अपघात…”; संजय शिरसाटांचे पवारांच्या विमान अपघातावर भाष्य

Rohit Pawar News: रोहित पवारांच्या जिवाला धोका कुणाकडून; नेमकं चाललंय काय?
3

Rohit Pawar News: रोहित पवारांच्या जिवाला धोका कुणाकडून; नेमकं चाललंय काय?

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.