Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी

मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी वसंत कानेटकर यांच्या सुख पाहता या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. यासाठी त्यांनी मुखपृष्ठ केल्याचे सांगितले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 23, 2026 | 11:08 AM
MNS Raj Thackeray social media post of drew cover page of sukh pahata by Vasant Kanetkar

MNS Raj Thackeray social media post of drew cover page of sukh pahata by Vasant Kanetkar

Follow Us
Close
Follow Us:
  • राज ठाकरेंची सोशल मीडिया पोस्ट
  • पुस्तकांबाबत केल्या आठवणी ताज्या
  • वसंत कानेटकर यांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकासाठी केलं मुखपृष्ठ
MNS Raj Thackeray : मुंबई : मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ओळख फक्त एक राजकारणी नाही तर व्यंगचित्रकार, कलेची जाण आणि वाचन-लिखाण करण्याची आवड असलेला व्यक्ती म्हणून आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या एका पुस्तकाची माहिती देत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करुन मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे अशी इच्छा प्रकट केली आहे. (Political News)

मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी वसंत कानेटकर यांच्या सुख पाहता या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. याबाबत राज ठाकरेंनी लिहिले आहे की, काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक ‘सुख पाहता’ या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत कानेटकर. तर हे पुसतक पाहताना पटकन मी भूतकाळात गेलो , कारण याचं मुखपृष्ठ मी केलं होतं !

हे देखील वाचा : भाजपाने पुण्याचा तालिबान केला; पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चढला पारा

पुढे त्यांनी लिहिलं की, घडलं असं की १९८९ साली, माझे सासरे, ज्येष्ठ नाट्यनिर्माते श्री. मोहन वाघ हे माझ्या घरी आले आणि म्हणाले की मी वसंत कानेटकरांचं ‘सुख पाहता’ नाटक करतोय. त्याचं पुस्तक काढावं अशी कानेटकरांची इच्छा आहे आणि त्यांची अजून एक इच्छा आहे की त्याचं मुखपृष्ठ तू करावं. मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता की नाटक हा नाट्यानुभव पण त्याची पुस्तकं पण निघायची आणि लोकं ती आवडीने विकत घेऊन वाचायची. असो. मी तेव्हा सामना , मार्मिक, लोकसत्ता यांच्यासाठी व्यंगचित्रं करायचो.

काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक ‘सुख पाहता’ या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत… pic.twitter.com/OUyXCR4Yto — Raj Thackeray (@RajThackeray) February 23, 2026

पण नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे माझ्यासाठी नवीन होतं. मी मोहन वाघांना म्हणलं की मी नाटक बघतो, आणि सांगतो. माझ्यासाठी एक आनंदाची बाब होती ती म्हणजे यशवंत दत्त ज्यांचा मी खूप मोठा फॅन होतो त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बघणार होतो. नाटक शिवाजी मंदिरला होतं. नाटकांत यशवंत दत्त यांनी सहा पात्र उभी केली होती ती पाहून थक्क झालो. घरी आलो आणि मोहन वाघांना कळवलं की मी करतो मुखपृष्ठ.

हे देखील वाचा : आता १० वर्षांच्या हवामानाचा अंदाज वर्तवणे शक्य; मान्सून संशोधनात मोठे यश

एका दिवसांत हे मुखपृष्ठ तयार झालं. ते मी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखवलं, ते दोघांना प्रचंड आवडलं. माझ्यासाठी हा तेंव्हा मिळालेला आशीर्वाद पण होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती पण होती. आज त्या इतिहासाला पुन्हा उजळणी मिळाली. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही आठवण सांगावी आणि हे मुखपृष्ठ दाखवावं. मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे हीच सदिच्छा…, अशा शब्दांत मनसे नेते राज ठाकरे यांनी ‘सुख पाहता’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या आठवणी सांगितल्या आहेत.

Web Title: Mns raj thackeray social media post of drew cover page of sukh pahata by vasant kanetkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • MNS
  • political news
  • raj thackeray

संबंधित बातम्या

‘कुठल्याही पक्षाचे खासदार फोडणे सोपे नाही’; ‘ऑपरेशन टायगर’वर अनिल देशमुख यांचं मोठं विधान
1

‘कुठल्याही पक्षाचे खासदार फोडणे सोपे नाही’; ‘ऑपरेशन टायगर’वर अनिल देशमुख यांचं मोठं विधान

Satara News : बहुमत असूनही प्रशासकीय हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा भाजपवर थेट आरोप
2

Satara News : बहुमत असूनही प्रशासकीय हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा भाजपवर थेट आरोप

शासकीय त्रासदायक कामं सोपी केली..; शासन आपल्या दारी कार्यक्रमात मंत्री बावनकुळेंचे केले कौतुक
3

शासकीय त्रासदायक कामं सोपी केली..; शासन आपल्या दारी कार्यक्रमात मंत्री बावनकुळेंचे केले कौतुक

Baramati By Election : मुख्यमंत्री फडणवीस करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार; पडळकरांचेही स्टार प्रचारकांमध्ये नाव
4

Baramati By Election : मुख्यमंत्री फडणवीस करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार; पडळकरांचेही स्टार प्रचारकांमध्ये नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.