Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॉकड्रीलमध्ये उघड झाल्या सुरक्षेच्या त्रुटी; अग्निशमन यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे स्पष्ट

तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात युद्ध झाल्यास काय काळजी घ्यावी, यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महापालिकेत देखील ही ड्रिल आयोजित करण्यात आली होती.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 09, 2025 | 11:51 AM
Mock drills again in Rajasthan Jammu Kashmir Gujarat and Punjab, on India-Pakistan border

Mock drills again in Rajasthan Jammu Kashmir Gujarat and Punjab, on India-Pakistan border

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात युद्ध झाल्यास काय काळजी घ्यावी, यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महापालिकेत देखील ही ड्रिल बुधवारी (दि.६) आयोजित करण्यात आली होती. मात्र, या मॉकड्रिलमुळे पालिकेच्या यंत्रणेतील अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेत आपत्ती व्यवस्थापना बाबत अनेक त्रुटी असल्याने दुरुस्ती करावी लागणार आहे. तसेच पालिकेच्या आवारात यंत्रांना सतर्क करण्यासाठी सायरण नसल्याने इमारतीत अनुचित प्रकार घडल्यास सूचना देणे कठीण होऊ शकते. यासोबतच अग्निशामक यंत्रणा देखील योग्य पद्धतीने काम करत नसल्याचेही समोर आले आहे.

युद्धजन्य स्थितीत काय करावे यासाठी मॉक ड्रिल पालिका मुख्य इमारतीत येथे पार पडली. यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) नागरी संरक्षण दलाचे (सिव्हील डिफेन्स) अधिकारी उपस्थित होते. या मॉक ड्रिलमध्ये एनडीआरएफ, नागरी संरक्षण दल, अग्निशमन दल, वैद्यकीय अधिकारी, पोलीस विभाग, पालिकेचा सुरक्षा विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी योग्य समन्वय साधून मॉक ड्रील घेतली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मॉक ड्रीलबाबत सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना सविस्तर माहिती दिली व आपत्ती परिस्थितीत कशी काळजी घ्यावी, सर्व यंत्रणांना कसे सहकार्य करावे याबाबत मार्गदर्शन केले.

मात्र, या मॉक ड्रील दरम्यान, पालिकेत आणीबाणीच्या स्थितीत अनेक यंत्रणा काम करत नसल्याचे समोर आले आहे. पालिकेत रोज शहरांशी संबंधित अनेक कामे करण्यासाठी माजी नगरसेवक यांच्यासह शहरातील आमदार, मंत्री देखील येत असतात. तसेच सामान्य नागरिकांची देखील पालिकेत येण्याची संख्या मोठी आहे. अशा परिस्थिती पालिकेत आग लागली तर अग्निशामक यंत्रणा चोख असणे गरजचे असते. मात्र, पालिकेतील स्प्रींकल यंत्रणा काम करत नसल्याचे समोर आले आहे. तर काही भागात ही यंत्रणांच बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे आग लागली तर पालिकेत मोठी दुर्घटना होऊ शकते. तसेच एखादी दुर्घटना झाल्यास सायरण वाजवून याची माहिती इतर कर्मचारी व नागरिकांना दिली जाते. मात्र, ही सतर्क यंत्रणा देखील काम करत नसल्याचे यावेळी समोर आले. दुर्घटना झाल्यास योग्य समन्वय ठेवून नागरिकांना पालिकेच्या बाहेर काढण्यासाठी पालिकेच्या सुरक्षा रक्षाकांकडे संपर्क यंत्रणाचं नसल्याचे समोर आले. तीन वर्षांपासून वॉकी टॉकी देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही.

पालिकेत आज मॉकड्रील घेण्यात आली. यावेळी काही यंत्रणा काम करत नसल्याचं दिसून आले आहे. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी या सर्व त्रुटींची पाहणी केली जाणार असून योग्य उपाययोजना केल्या जातील. – ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: Mock drill reveals security flaws in pune municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • Cmomaharasahtra
  • Mock Drill
  • PM Narendra Modi
  • Pune mahapalika
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
1

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
2

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
3

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर
4

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.