कल्याण : साठ वर्षात (Sixty Years) जे झालं नाही ते मोदी सरकारने (Modi Government) आठ वर्षात केलं असून जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला पाचव्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे स्थान मिळालं (India got the fifth position in the world economy because of Prime Minister Narendra Modi) असल्याचं मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Union Information and Broadcasting Minister Anurag Thakur) यांनी व्यक्त केलं.
ठाकूर हे पक्ष संघटना वाढीसाठी आजपासू तीन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेत केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभा प्रभारी तथा आमदार संजय केळकर, आमदार कुमार आयलानी, निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर मुंबई व कल्याण लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. त्यांचा हा तीन दिवसीय दौरा आहे. भाजपाने देशभरात १४४ लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. २०१४ मध्ये ३० वर्षांनी २७२ जागा जिंकल्या.
गेल्या ३ वर्षात मोदी सरकारने अभूतपूर्व कामे केली. राममंदिराचे (Ram Mandir) भूमिपूजन करण्यात आले. जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir) विशेष दर्जातून मुक्त केलं. कोविड कालावधी नंतर १ लाख करोड टॅक्स जमा झाला. जनधन खात्याद्वारे (Jan Dhan Account) गरिबांना मदत करण्यात आली असल्याचा उल्लेख यावेळी अनुराग ठाकूर यांनी केला.
[read_also content=”मच्छरची बॅट हातात घेऊन समाजात परिवर्तन होत नसतं – नीलम गोऱ्हे https://www.navarashtra.com/maharashtra/a-society-does-not-change-with-a-mosquito-bat-in-hand-neelam-gorhe-criticise-on-mla-nitesh-rane-nrvb-324800.html”]
कोरोना पादुर्भावासह भुकेने जनता व्याकूळ झालेला असताना ८० कोटी लोकांना मोफत अन्न वाटप केलं. २०० कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. जगात भारत देश अर्थ व्यवस्थेत पुढे असून जगातील पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. नागरिकांचा मोदींना प्रतिसाद वाढत असून २०२४ ला ३०३ हून अधिक जागा जिंकण्याचा मानस व्यक्त केला.
भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपल्याकडे नागरिकांच्या अडीज हजार चिठ्ठ्या आल्या असून पोलिंग बूथ लेव्हलला काम सुरू आहे. प्रत्येक पोलिंग बूथ (Polling Booth) जिंकेल तो निवडणूक जिंकेल असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं.
मोदी सरकार खेळाडूंच्या पाठीशी असून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम सरकार करत आहे. खेलो इंडिया अंतर्गत खेळाडूंना अनेक सुविधा दिल्या जात असून कल्याण लोकसभेत देखील खेलो इंडिया अंतर्गत केंद्र सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर देखील टीका केली.
जे पार्टीला जोडू शकत नाही ते देशाला काय जोडतील असा सवाल उपस्थित करत भारत जोडो यात्रेत या तुकडा तुकडा गँगचे सदस्य सहभागी आहेत. भारत तेरे तुकडे होंगेचे नारे देणाऱ्यांना राहुल गांधी (Rahul Gandhi) रात्री जाऊन जेएनयूमध्ये (JNU) भेटत असल्याची टीका देखील अनुराग ठाकूर यांनी यावेळी केली.